umaji naik – क्रांतिकारक उमाजी नाईक पुण्यस्मरण
umaji naik – पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे आज पुण्यस्मरण.
पहिलेक्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे आज पुण्यस्मरण. उमाजिंचे चरित्र जाणून घ्या. (जन्म ७ सप्टेम्बेर १७९१) (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजींचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही ?
तर टोस म्हणतो,उमाजींपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्यांना फाशी दिली नसती तर पुन्हा मराठेशाही सारखी दुसरीराजवट आली असती .हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे … जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजींचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.
जसा umaji naik उमाजी मोठा होत गेले तसे त्यांननी दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुऱ्हाडी, तीरकामठी, गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख ही जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या अधिपत्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरी च्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
Also Visit : https : //www.postboxindia.com
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजे बनले . या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले . आणि त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजींनी एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमाजींची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण ही फितूर झाला आणि त्यांनी umaji naik उमाजींची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना umaji naik उमाजींना इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजींची सर्व माहिती लिहून ठेवली. या नरवीर उमाजींना न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले.अशा या उमाजींचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजींबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
अभिवादन
माधव विद्वांस
The post umaji naik – क्रांतिकारक उमाजी नाईक पुण्यस्मरण appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.