Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

sharad pawar – प्रतिभाताईंचे योगदान 

1 Mins read
  • sharad pawar - प्रतिभाताईंचे योगदान 

sharad pawar – प्रतिभाताईंचे योगदान 

प्रतिभाताईंचे योगदान 

महाराष्ट्र लाखो कार्यकर्त्यांच्या आक्रोशामध्ये या माऊलीच्या भावना कुणालाच ऐकायला आल्या नाही. गेली ५५ वर्ष प्रतिभा काकींनी साहेबांना कधीही कुठेही थांबविले नाही. गाडीचे चाक वळेल तिकडे sharad pawar – साहेब जात राहिले काकींनी कधी ब्रेक लावला ही नाही. नवऱ्याच्या प्रतिष्ठेचा गैरफायदा सोडा कधी या माऊलीने फायदाही घेतला नाही.

sharad pawar – साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाही काकींनी आनंदाश्रूंनी काढता पाय घेतला. आज धीरोप्तपणे जागच्या हल्ल्या देखील नाही, खरे सांगायचे म्हणजे संपूर्ण सभागृहात त्यांच्या इतक्या मोठ्याने बोलण्याचा अधिकार कोणाचाच नव्हता परंतु नेहमी प्रमाणे त्या अबोल राहिल्या. आयुष्याच्या तिन्हीसांजेला पतीचा जास्तीत जास्त सहवास लाभावा असे त्या माऊलीला वाटत असेल, तो हक्क हिरावून घेणारे तुम्ही आम्ही कोण ? पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या नेत्यांनी कुटुंब मित्रपरिवार नातेवाईक यांना नेहमीच गृहीत का धरावे?

डॉक्टर म्हणाले होते- साहेब फक्त ६ महिने जगतील,आज कॅन्सरवर मात करून महाराष्ट्राचे सर्वात उंच नेते म्हणून साहेब ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले – तुम्ही महत्वाचे काम पूर्ण करा, तुमच्याकडे फक्त ६ महिने वेळ आहे. त्यावेळेस काकींची अवस्था काय झाली असेल.

sharad pawar – साहेबांनी एका कार्यक्रमात सांगितले की, २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले.उपचारासाठी न्यूयॉर्कला गेलो होतो. तेथील डॉक्टरांनी भारतातीलच काही तज्ज्ञांकडे जाण्यास सांगितले.

कृषीमंत्री असताना ३६ वेळा रेडिएशन उपचार घ्यावे लागले. ते खूप वेदनादायक होते.साहेब सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मंत्रालयात काम करायचे. त्यानंतर २.३० वाजता ते अपोलो रुग्णालयात केमोथेरपी घेत होते.वेदना इतक्या होत्या की घरी जाऊन झोपावे लागत. दरम्यान, एका डॉक्टरने त्यांना आवश्यक काम पूर्ण करण्यास सांगितले. तुम्ही आणखी फक्त ६ महिने जगू शकाल. sharad pawar – पवारांनी डॉक्टरांना सांगितले की, मला आजाराची काळजी नाही, तुम्हीही कोणी काळजी करू नका.त्या वेळेस काकींची झालेली अवस्था शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

sharad pawar – पवार साहेब यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, लग्नाआधी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासमोर एकच मूल होण्याची अट ठेवली होती.
ते म्हणाले होते आपल्याला एकच मूल होईल, मग तो मुलगा असो वा मुलगी. यानंतर सुप्रियाचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला.४४ वर्षांपूर्वी हा निर्णय घेणे खूप अवघड होते, पण साहेबांच्या विचारांशी काकींनी आपली सहमती दाखवली व त्यांनी ते करून दाखवले.

अशा मोकळ्या मनाच्या कुटुंबात जन्मलेल्या सुप्रिया यांना लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. घरच्यांचा कधीच दबाव नव्हता, मग ते शिक्षण असो किंवा लग्न.

तुम्हाला मला जसे घर असते तसे त्यांनाही घर असतेच ना! याचा कधी कोणी विचार केला आहे का? आपली ती अर्धांगिनी आणि नेत्याची ती रुक्मिणी असे विचार कायम असता कामा नये!.आजचा प्रतिभा काकींचा अबोला हा सर्वात मोठा आक्रोश आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.आपल्याला तो ऐकता आला पाहिजे.हे सगळं घडत असताना प्रतिभा काकी sharad pawar – शरद पवार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून शेजारी बसून सर्व काही शांतपणे पहात होत्या.आमचे सगळ्यांचे राजीनामे घ्या, पण तुम्ही बाजूला जाऊ नका, जयंत पाटील धायमोकलून रडत होते.कार्यकर्ते आक्रोश करत होते.

परंतु आपला निर्णय योग्यच आहे. हा निर्णय घ्यावाच लागणार होता. तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहा, कार्यकर्ते नेत्यांच्या मागणीवर निर्णय मागे घेऊ नका, असं प्रतिभाकाकी शरद पवार यांना सांगत राहिल्या. कार्यकर्ते रडत होते. पण प्रतिभा काकी sharad pawar – शरद पवार यांना स्मितहास्याने साथ देत होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत शरद पवार यांनी नेते कार्यकर्त्यांचं न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
त्या माऊलीसाठी साहेबांना आता तरी थोडी मोकळीक दिलीच पाहिजे.

जय राष्ट्रवादी

डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!