Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIASANSKRITISANSKRITI DHARA

Diwali 2022 – दीपोत्सव विशेष पर्व

1 Mins read
  • Diwali 2022 - दिवाळी DIPAWALI 2022

Diwali 2022 – दीपोत्सव विशेष पर्व

 

 

 

⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🪔 Diwali 2022 – दीपोत्सव विशेष पर्व 🪔
⚜️⚜️⚜️⚜️⚜️

🌹⚜🚩🔆🪔🔆🚩⚜️🌹

Diwali 2022 – आनंदी पहाट 🌻

Diwali 2022 – दीपपर्व शुभारंभाची

आज वसुबारस
गोवत्स पूजन
आज रमा एकादशी

भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठ्या हर्षोल्हासी पर्वाचा.. Diwali 2022 – दीपोत्सवाचा आज प्रारंभ.

असत्यावर सत्याचा विजय एवढा सुखद.. आनंददायी.. स्फुर्तीदायक असतो की त्या विजयाचे स्मरण हजारो वर्षे प्रेरणादायी ठरते. प्रभू श्रीरामानी रावणावर विजय प्राप्त केल्याचा आनंद त्रिभूवनाला झाला. लंकेतून प्रभू अयोध्येला परत येणार म्हणून लोकांनी स्वयंस्फुर्त साजरा केलेला स्वागतोत्सव म्हणजेच हे अत्यानंदी Diwali 2022 – दिवाळी पर्व.

मानवी जीवनात कमालीचे सौख्य, समृद्धी, चैतन्य आणणारे हे Diwali 2022 – दीपपर्व. मनोमनीचा अंधार दूर झाला तरच हे जीवन उजळणार. संपूर्ण जगातील मानवी मनातील हा अंधःकार दूर होण्यासाठी हे स्नेहभावी प्रकाश पर्व.

आज देशभरातील घरे सजलीत.. अंगणात गोमयाने सडासमार्जन झालेय. दारासमोर.. गोमातेच्या गोठ्यासमोर रंगीबेरंगी रांगोळी आहेत. दारोदार आकाशदिवे.. तेवत्या पणत्या.. दिव्यांच्या माळां लुकलुकत आहेत. अनेक घरासमोर ज्यांच्या पराक्रमाने दिवाळी साजरी होत आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षीदार किल्ले तयार केले आहेत. घराघरातील दिवाळी फराळाचा सुवास सांगतोय की आली दिवाळी.. आली.
ही संस्कृती जिच्या दुधावर उभी आहे त्या कामधेनुच्या.. गोवत्स पूजनाने आज दिवाळीचा प्रारंभ. आमच्या ऋषींनीच नाही तर प्रत्यक्ष श्रीकृष्णानं गायीच्या संगोपनाचे महत्व सांगितलेय. तो गोपालकृष्ण ठरला.

संपन्न राष्ट्राचा मापदंड हा तिथे असणाऱ्या गोधनावर ठरतो. सारे जग आज आरोग्यासाठी शुद्धतेचा शोध घेत आहे. आमच्या निरामय आरोग्यात गायींच्या दुग्धजन्य पदार्थचाच नाही तर सेंद्रिय शेतीसाठी गोमुत्र.. शेणाचा मोठा वाटा आहे. देशी गायीचे दुध सोनेच. या गायींच्या दुधात सोन्याचा अंश सापडलाय. विषमुक्त अन्न देणाऱ्या या देशी गायीचा पुरवठादार ही देशाची ओळख ठरणार. आज देशभर या गायीचे वत्सासह पूजन होणार.
आज रमा एकादशी. रमा म्हणजे लक्ष्मी. समुद्र मंथनातून पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी. या लक्ष्मीची पूजा करुन उपवास केला जातो. आज विष्णुंना प्रिय अशा तुळशीला प्रदक्षिणा घालतात.

या एकादशी पूजनाने सुखाच्या आड येणाऱ्या भावना विनाशासाठी प्रार्थना केली जाते. पापक्षालन करणारी.. कामधेनू प्रमाणे इच्छा पूर्ती करणारी ही रमा एकादशी म्हणजे श्रीविष्णु आणि लक्ष्मीच्या पूजेचे व्रत. आज वारकरी मंडळीं विठ्ठल नामाच्या संकीर्तर्नात दंग होणार.
आमची दिवाळी आनंदी व्हावी म्हणून बहुमुल्य योगदान देणारे सीमेवरील सैनिक.. पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा तसेच आमच्या सुखसोईसाठी राबणाऱ्या सर्वच यंत्रणेतील योध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करू या.
साजरी करू या सुरक्षित..

प्रदुषणमुक्त Diwali 2022 – दिवाळी. या तेजोमय दीपपर्वाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा !!

🏮⚜️🌸🔆🪔🔆🌸⚜️🏮

1️⃣
आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

मंद चांदणे धुंद श्वास हा,
मी तर त्यात भिजावे
जन्म जन्म रे तुझ्या संगती
एकरुप मी व्हावे
प्रीत नयनी वसे,
लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

पाऊल पडता घरी मुकुंदा,
गोकुळ हरपून गेले
उटी लाविता अंगी देवा,
सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी,
नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

नक्षत्रांचा साज लेऊनी,
रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या
ही तर दीपावली
संग होता हरी जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

गीत : मधुसुदन कालेलकर ✍
संगीत : अनिल-अरुण
स्वर : अनुराधा पौडवाल
चित्रपट : अष्टविनायक (१९७९)

 

🌹🪔🌷🏮🔆🏮🌷🪔🌹

2️⃣
विसांवा विठ्ठल सुखाची साउली
प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी

दाखवीं चरण दाखवीं चरण
दाखवीं चरण नारायणा

विठ्ठल आचार विठ्ठल विचार
दावीं निरंतर पाय आतां

नामा ह्मणे नित्य बुडालों संसारीं
धांवोनियां धरीं हातीं मज

रचना : संत नामदेव ✍️
संगीत : स्नेहल भाटकर
स्वर : स्नेहल भाटकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹
२१.१०.२०२२

⚜ शुभ दीपावली ⚜

🌻🏮🎊🔆⚛🔆🎊🏮🌻

 

 

माधव विद्वांस 

Leave a Reply

error: Content is protected !!