Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

first cm of Maharashtra – शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब

1 Mins read

yashwantrao_chavan_saheb – शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब

 

 

yashwantrao_chavan_saheb – शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला स्वाभिमानाची, स्वसामर्थ्याची आणि स्वत्त्वाची धगधगती ओळख पटवून दिली. महात्मा फुलेंनी या महाराष्ट्रात बहुजनांची अस्मिता आणि अस्तित्व जागवले. लोकमान्य टिळकांनी या महाराष्ट्राला देश पातळीवर नेतृत्व करायला शिकवले. त्यांनी “स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळविणारच” अशी देशाला हाक दिली. बाबासाहेबांनी शोषितांच्या लढ्याला विचारांची खोली आणि उंची दिली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी झोपडीपर्यंत शिक्षणाचा दीप नेला आणि यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत, सभ्य आणि बेरजेचे समाजकारण – राजकारणाचे पाठ दिले. मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, उपपंतप्रधान, साहित्यिक, रसिकवक्ता, उत्तम माणूस, व्यासंगी, वाचक, दर्दी श्रोता, उत्तम पती, अभ्यासक, विश्लेषक, दूरदृष्टीचा नेता या सर्व भूमिकांना yashwantrao_chavan_saheb यशवंतराव चव्हाणांनी जो न्याय दिला त्याला तोड नाही.

आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाणांचे योगदान केवळ अमूल्य आहे. कोयना धरण असो, उजनी धरण असो, पंचायत राज-जिल्हा परिषद निर्मिती असो, साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना असो, शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ-औरंगाबाद असो, साहित्य सहवासाची निर्मिती असो किंवा दिन-दलित आणि सामान्य बहुजन समाजातील अनेकांना राजकारणात आणण्याचे काम असो, कै.‘यशवंतराव बलवंतराव चव्हाण’ या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड ठसा या महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पटलावर उमटलेला आहे…. आणि नेहमीच उमटत राहणार हे निश्चित. असे हे आपल्या first cm of Maharashtra आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार..!!

Download Unlimited 3d Games  

मुख्यमंत्री असलेल्या yashwantrao_chavan_saheb यशवंतराव चव्हाणांना ९ नोव्हेंबर १९६२ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक फोन केला आणि देशाचा संरक्षणमंत्री होण्यासाठी विनंती केली. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’ हे त्यावेळचे यथार्थ वर्णन होते. कारण चीनच्या आक्रमणानंतर आणि कृष्णमेनन यांच्या कार्यपद्धतीमुळे सेना पूर्णपणे निराश आणि विखंडित, पराभूत मानसिकतेत होती. अशा वेळी पंडितजींना यशवंतराव चव्हाणांचीच आठवण झाली, यात महाराष्ट्राचा आणि यशवंतराव चव्हाणांचा सन्मान होता. पण हे सिंहासन काटेरी होते. सैन्याचे मनोबल वाढवायचे होते आणि चीनबरोबरच्या पराभवाची कारणे शोधून त्यावर दूरदर्शी उपाययोजना करायची होती. २२ नोव्हेंबर, १९६६ ला यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षणमंत्री झाले.

एक वर्षाच्या काळात yashwantrao_chavan_saheb यशवंतराव चव्हाण यांनी सेनादलप्रमुख, संरक्षण सचिव, अर्थसचिव यांच्यासमवेत अखंड बैठका घेतल्या आणि ६२ च्या पराभवाची कारणे अधोरेखित झाली. काश्मीर, नेपाळ, राजस्थान बॉर्डरला यशवंतराव चव्हाण स्वतः फिरले. ते सैनिकांसमवेत राहिले, बोलले. सैन्यदल आणि अधिकाऱ्यांत परस्पर विश्वास सामंजस्य आणि प्रेम यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच वाढले. नाशिकजवळ ओझरला मिग निर्मितीचा कारखाना काढला. रशियाबरोबर संरक्षण विषयक करार केले. आणि त्याचा परिणाम २४ एप्रिल १९६५ ला दिसून आला. पाकिस्तानने जेव्हा कच्छच्या रणात हल्ला केला त्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वोच्च विजय संपादित केला. श्री. लाल बहादुर शास्त्रीजी त्यावेळी पंतप्रधान होते. त्यांनी ‘दुष्मन के लिए तलवार है चौहान’ हे उद्गार जाहीरपणे काढून यशवंतराव चव्हाणांचा गौरव केला.

Download Unlimited 3d Games  

yashwantrao_chavan_saheb यशवंतराव चव्हाणे मनाने हळवे होते. ७ मार्च १९६६ ला चंद्रभागेवर उजनी धरणाचे उद्घाटन होते. ते करण्यापूर्वी first cm of Maharashtra यशवंतराव चव्हाणं पंढरपूरला गेले. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांच्या डोळयांत जणू चंद्रभागा तरळली, त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेले होते…. डोळ्यांच्या कडा पाण्याने भरलेले असतांना ते उच्चारते झाले…

हे ‘पांडुरंगा, तुझी क्षमा मागतो. तुझी चंद्रभागा आज मी आडवलेली आहे. पण ह्यात आडवलेले पाणी एक दिवस दुष्काळी भागात पसरेल आणि कणसाच्या दाण्या-दाण्यातून पांडुरंगा, तुझे रूप दिसेल.’ कोयना धरणाच्या बाबतीतही यशवंतराव साहेबांची भूमिका भगीरथाची होती. १९४७ साली गांधी हत्येनंतरच्या दंगलीत होरपळलेल्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय साहेबांचाच होता.

मुख्यमंत्री first cm of Maharashtra असतांना एकदा त्यांना सहचारिणी आणि त्यांच दैवत पत्नी वेणुताईने १०० रुपये पाठवुन द्यावे असे पत्र लिहले. उत्तर आले, आजतरी माझ्याकडे नाहीत “शेजारच्या कडुन घ्यावे” आल्यावर परत करु, स्वत:ची काळजी घ्यावी….!!
अशी ही यशवंतराव चव्हाणांच्या जीवनाची आणि मनाची दुर्मिळ श्रीमंती….!! असे हे ‘उत्तुंग सह्यगिरी व्यक्तिमत्व’ आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ‘यशवंतराव’

या “यशवंत-कीर्तिवंत” दैवतासाठी कवी “राजा मंगसुळीकर” यांच्या काही ओळी आज आठवणे सहाजिकच आहे.

Download Unlimited 3d Games  

“हिमालयावर येता घाला सह्यगिरी हा धावून गेला,
मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला,
या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने,
जोवर भाषा असे मराठी यशवंतांची घुमतील कवने.”

 

 

first cm of Maharashtra yashwantrao_chavan_saheb यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन

 

डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!