Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

work and economic life – कामं आणि जीवन ह्याचा समतोल

1 Mins read

work and economic life – कामं आणि जीवन ह्याचा समतोल

 

 

work and economic life – कामं आणि जीवन ह्याचा समतोल 

 

 

 

रमा गेला पूर्ण  आठवडा आपल्या ऑफिसच्या कामात इतकी व्यस्त होती की  तिची ऑफिस व्यतिरिक्त  इतर महत्वाची कामे तशीच राहिली.

ती दररोज ठरवायची कि आज ऑफिसचे काम लवकर आटपून इतर कामे करूया.पण ठरवणं फक्त होत राहिलं प्रत्यक्ष  कामं काही झालं नाही.

आपल्या सोबत पण असं बरयाचदा होतं, हो ना ??

ऑफिसच्या कामाशिवाय पण आयुष्य असतं हे आपण विसरुनच  जातो. कामाच्या पाठी इतके व्यस्त होतो की आपणं आपलं आयुष्य जगणंच विसरतो.

दात आहे पण चणे नाही आणि चणे आहे पण दात नाही ही परस्थिती येऊ द्यायची नांही  असं आपलं कामाचं – स्वतःचे आणि ऑफिसचे नियोजन असावं.

कुठलं पण अति – वाईटच ना ?मग आपण काय करतो त्याचा समतोल साधायचा प्रयन्त करतो. कुठेतरी मध्य साधने महत्वाचे असते .कुटुंब,

आपले मित्र आपली तब्येत ह्याकडे दुर्लक्ष केले आणि कामं एके कामं केले तर त्याचा आपल्या work and economic life सगळ्याचं गोष्टीवर  परिणाम होऊ शकतो. 

चांगलं,आनंदी आणि समाधानी आयुष्यासाठी आपले व्यायसायिक आणि वैयक्तिक कामाचा, जगण्याचा समतोल साधने गरजेचे आहे.

समतोल  ढळला तर त्याचा परिणाम नकळतपणे कामावर होईल. आपल्या कामं आणि आयुष्याच्या समतोलासाठी आपण काय निवडतो

ते महत्वाचे आहे. ह्या सगळयात जास्त ओढाताण होते ती नोकरी करणाऱ्या महिला वर्गाची. घर कामं मुलं, घरचे आणि नातेवाईक मंडळींच्या

  तिच्या कडून असलेल्या अपॆक्षा, नोकरीचे तणाव यामुळे होणारी मानसिक घालमेलं ह्यात ती स्वतःचं वेगळं अस्तित्वंचं  विसरून जाते .

ह्यावर पण काहीतरी तोडगा काढणे महत्वाचे आहे. घरचे सदस्य आणि ऑफिसमधले सहकारी ह्यांनी तिला समजून घेणे अपेक्षीत आहे.

वेगळी काही सूट नका देऊ पण शक्य झाल्यास मदतीचा हात तर द्या.

कामं आणि जीवन  work and economic life हा समतोल आपल्याला साधायचा असतो ,त्याचं असं काही गणित नाही  की

समीकरण नाही जे जुळवलं की  झालं. Perfect होण्या पेक्षा त्या वेळी काय म्हत्वाचे ते ठरवावं. काही गोष्टी,प्रसंग शक्यता आहे आपण

नंतर नाही अनूभवू शकू. उदारणार्थ – आपल्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस . त्यामुळे हा समतोल तुम्ही कसा साधता ते ठरवा.

कसं बरं हे शक्य होईल ? 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

1. कामाच्या वेळेस  कामं करा , २४ तास काम डोक्यात ठेवू नका .

2. स्मार्ट कामावर भर द्या. कामाचं तंत्र समजून घ्या .

3. कुटुंब हे महत्वाचे आहे त्यानां वेळ द्या.

4. घरच्या इतर  कामाची पण जबाबदारी तुमची असते.

5. फोन / Social मीडिया ह्या पासून जरा ब्रेक घ्या .

6. स्वतःला वेळ द्या, छंद / आवड जोपासा .

7. तुम्ही काय निवडता ते महत्वाचे . आपली निवड हे समतोल साधण्यासाठी महत्वाची असणारं आहे.

8. आपला प्राधान्यक्रम ठरवा. त्यानुसार आपले वेळापत्रक बनवा.

9. नाही म्हणायला शिका. त्यामुळे तुम्ही महत्वाच्या  कामाला वेळ देऊ शकाल .

10. व्यायाम ,योग हे आपल्या निरोगी जीवन शैली साठी महत्वाचे, त्यासाठी तुम्हाला वेळ दयायला हवा .

11. व्यवस्थित झोप आणि योग्य आहार ह्याकडे लक्ष देणे महत्वाचे.

12. वेळेचं, तणावाचे व्यवस्थापन ह्यांवर काम करा . 

काम आणि आपलं आयुष्य ह्याचा समतोल साधला तर तुम्ही अजून कार्यक्षम व्हाल, तुमचे मानसिक आरोग्य जपल्या जाईल . जर आपले शारीरिक

आरोग्य  चांगले राहील तरच आपण अजून मस्त  काम करू शकू. हे सर्व जरी आव्हानात्मक वाटतं तरी ते अशक्य नाही हे लक्षात ठेवा. सुखी

आयुष्यासाठी हे आपल्याला करायचे आहे आणि हे आपल्याचं  हातात आहे. Seesaw – फळीवर बसून वर-खाली जाण्याचा खेळ आपणं

लहानपणी सगळेच खेळलो आहे. एक बाजू जडं  झाली तर दुसरी खाली जाणार तसंच हे आहे, ते समान होण्यासाठी काय करायचे हे

आता तुमच्या लक्षात आले असेलचं, जमेल ना ?

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

Leave a Reply

%d bloggers like this: