Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSSANSKRITISANSKRITI DHARA

Vishwas Patil विश्वास पाटील लिखित – महासम्राट

1 Mins read

Vishwas Patil  श्री.विश्वास पाटील लिखित ” महासम्राट “

 

 

या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कादंबरीचा हस्तलिखित हस्तांतरण सोहळा मेहता पब्लिशिंग हाऊस सदाशिव पेठ पुणे येथे दिमाखात पार पडला.

” महासम्राट” शिवरायांच्या जीवनावरील कादंबरीमाला !
Vishwas Patil विश्वास पाटील यांच्या लेखणीतून अवतरणार !!

Vishwas Patil विश्वास पाटील लिखित - महासम्राट

Vishwas Patil विश्वास पाटील लिखित – महासम्राट

       धाडसी योद्धे आणि युगपुरुष इतिहास निर्माण करतात, तर कवी, नाटककार आणि साहित्यिक त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनगाथेला आपल्या शब्दशिल्पाद्वारे आकार देतात.

छत्रपती शिवरायानी महाराष्ट्रात आकाराने छोटंसं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं .

परंतु त्यांच्या काळापासूनच त्यांनी आपल्या महान कर्तृत्वाने जगभरातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या हृदयावर एकाद्या महासम्राटासारखं राज्य केलं आहे .

याच विषयावर कादंबरीकार Vishwas Patil विश्वास पाटील “महासम्राट” या नावाची एक कादंबरीमाला लिहीत आहेत.

Also Visit : https://www.postboxlive.com

       या कादंबरीचा पहिला खंड मराठीमध्ये” झंझावात” या नावाने लवकरच मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित होत आहे.

Vishwas Patil विश्वास पाटील

Vishwas Patil विश्वास पाटील

तर हिंदीमध्ये भारतातील दिल्लीची ज्येष्ठ प्रकाशन संस्था राजकमल ही कादंबरी प्रकाशित करत आहे. श्री पाटील यांना वयाच्या 32 व्या वर्षी त्यांच्या “झाडाझडती” या कादंबरीस मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.

अलीकडेच त्याना आसामच्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . त्यांच्या “झाडाझडती” व “नागकेशर” या कादंबऱ्या त्यासाठी प्रामुख्याने विचारात घेण्यात आल्या होत्या.

          १९९१ मध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वाचनात “पानिपत” ही मराठी कादंबरी आली.

या कादंबरीने श्री राव हे इतके प्रभावित झाले की त्यांनी तात्काळ या कादंबरीचा हिंदी अनुवाद भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत प्रकाशित केला. तेव्हा नरसिंह राव हे भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष होते.

श्री पाटील यांच्या पानिपत, महानायक ,झाडाझडती ,लस्ट फाॅर लालबाग आधी कादंबऱ्यांनी मराठी मनावर गारुड घातले आहेच.

परंतु त्यांच्या अनेक कादंबऱ्या बहुतांशी सर्व भारतीय भाषांमध्ये व इंग्रजीतही प्रकाशित झाल्या असून त्याना अनेक आवृत्त्यांमध्ये प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले आहे.

अलीकडेच Vishwas Patil श्री. पाटील यांनी लिहिलेल्या “अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान” या संशोधनात्मक वांडग्मयीन चरित्रग्रंथानेही वाचकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.

               प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार व कवी श्री सुनील गंगोपाध्याय यांनी तर “महानायक” कादंबरीवर “देश “या प्रसिद्ध बंगाली नियतकालिकात एक स्वतंत्र लेख लिहून ह्या कादंबरीचा गौरव केला होता.

गेली कित्येक वर्ष छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाने Vishwas Patil  श्री. पाटील यांना भारून टाकले होते. शिवाय श्री पाटील यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या अनेक रसिक वाचकांकडून त्यांनी छत्रपती शिवरायांवर कादंबरी लिहावी असा सातत्याने पाठपुरावा केला होता.

Vishwas Patil विश्वास पाटील information

Vishwas Patil विश्वास पाटील information

          Vishwas Patil श्री.विश्वास पाटील यांनी गेल्या काही वर्षात स्वतः शिवरायांच्या महाराष्ट्रातील २४० किल्ल्यांना समक्ष त्या त्या स्थळी जाऊन भेटी दिल्या आहेत.

तसेच कर्नाटक ,तामिळनाडू, आगरा, सुरत अशा अनेक ठिकाणी संशोधनासाठी त्यांनी भ्रमंती केली आहे. त्यांच्या “महासम्राट ” कादंबरीच्या दुसऱ्या खंडाचे नाव “रणखैंदळ” असून तोही ते लवकरच लिहून हातावेगळे करतील.

Also Read :https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/

शिवाय या पुढचे आणखी काही खंड येत्या काही वर्षात यथावकाश प्रकाशित होणार आहेत.
सध्या “चंद्रमुखी” हा मराठी चित्रपट खूप चर्चेत आहे.

Vishwas Patil विश्वास पाटील संपूर्ण माहिती

Vishwas Patil विश्वास पाटील संपूर्ण माहिती

राजकारण आणि तमाशा सुंदरी यांच्यामधील अवीट प्रेमाची कहाणी सांगणारी चंद्रमुखी ही कादंबरीही श्री. पाटील यांच्याच लेखणीतून उतरली आहे.

             आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.संमेलनाध्यक्ष श्री.श्रीपाल सबनीस म.सा.प.कार्यध्यक्ष श्री.मिलिंद जोशी. मेहता पब्लिकेशनचे श्री.अखिल मेहता व अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

अत्यंत सुरेख आणि देखणा कार्यक्रम पार पडला. वाचकांना आता पुस्तकाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!