My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंत फडके 

1 Mins read
  • Vasudev balavant phadke

Vasudev balavant phadke – क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके 

यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

आद्य क्रांतिकारक Vasudev balavant phadke – श्री. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला .लहानपणापासूनच वासुदेव बंडखोर वृत्तीचे होते. लहानपणीच वासुदेव फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या ही प्रभावात होते. त्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे Vasudev balavant phadke – फडक्यांना पटवून दिले होते.

Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी व ट्रेझरर होते .१८७३ मधे स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतली होती. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य ,समन्वय निर्माण करण्यासाठी ‘ऐक्यवर्धिनी’ संस्था त्यांनी सुरू केली. पुण्यामध्ये १८७४ मध्ये ‘ पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी कार्यालयात नोकरी केली. आई आजारी असताना त्यांना भेटण्यास रजा मिळाली नाही.त्यांच्या मनात प्रश्न आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत नसेल तर त्या नोकरीचा काय ऊपयोग ? पुढे त्यातच आईचे निधन झाले व शेवटी भेट घेता आली नाही. या घटनेने वासुदेव फडके यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जीपणामुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप Vasudev balavant phadke – वासुदेव फडके यांच्या मनात उफाळून आला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. १८५७ च्या अयशस्वी क्रांती पर्वानंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा जो सशस्त्र प्रयत्न झाला तो वासुदेव फडके यांच्या पुढाकारानेच .त्यात त्यांना रामोशी, भिल्ल, आगरी, आणि कोळी तरुणांचा पाठिंबा मिळाला.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील तुरूंगात डांबुन रहावे लागले होते. त्यांचा मुक्त आत्मा रोगांनी जर्जर झालेल्या शरिरात तडफड करीत होता. दोन वर्षांपूर्वीच तूरूंगातून पळुन जाण्याचा धाडसी प्रयत्न Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंतांनी केला होता. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अधिकच बंधने घातली होती. जीवन अधिक कष्टदायक झाले होते. मन व शरिर खंगुन गेल्याने उत्साह पार मावळला होता. दुर्धर अशा क्षयरोगाने त्यांना पछाडले होते. तेथील अधिकारी त्यावेळी फलटन येथील डॉ. बर्वे हे होते. ओळखीचे, जवळचे आणि मायेचे एकच व्यक्ती म्हणजे डॉ. बर्वे. वासुदेव बळवंतांना आता फक्त मृत्युची आशा राहिली होती. घरदार शेकडो मैलांवर राहिले होते.

मृत्युची वाटचाल करणारे वासुदेव इंग्रज सरकारवर मनातुन चरफडत होते. नोकरी करत असताना वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले.

१८७६–७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकऱ्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाःकार उडाला. Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.

या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली.

पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले.
२२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले.

पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवान’ करून सोडावयाचे, असा Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंतांचा विचार होता. रामोशी लुटालूट करण्यात निष्णात होते; पण पैशापलीकडे त्यांना राष्ट्रभक्ती, देशप्रेम इ. काही ठाऊकच नव्हते. जी लूट मिळाली, ती घेऊन ते आपापल्या गावी पांगले. मार्चच्या शेवटी वासुदेव बळवंतांजवळ जेमतेम दहा–पंधरा रामोशी उरले.

हताश अंतःकरणाने Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंत पुण्यास परतले. तेथून उरळी कांचनला जाऊन त्यांनी रेल्वेमार्गाने सोलापूर गाठले. पुढे ते गाणगापूर मार्गे श्रीशैलम् येथील श्री मल्लिकार्जुनाच्या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत गेले. तेथे मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करण्याचे त्यांनी ठरविले (१७ एप्रिल १८७९). त्याच दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली. या सुमारास त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट नावाचे गृहस्थ भेटले व त्यांनी मदतीचा हात पुढे केला.

ब्रिटिश सरकार बरोबर वाटाघाटी पुऱ्या होण्या अगोदरच Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंताचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे मे. डॅन्यीएलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेवांचा पाठलाग सुरू केला. फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले. पुणे येथे त्यांच्यावर दंड कलमांन्वये खटला चालविण्यात आला.

न्या. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी १८८० च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच १८ फेब्रुवारी १८८३ मधे मरण पावले.

Vasudev balavant phadke – वासुदेव बळवंतांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता. त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही; तथापि भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणूनच वासुदेव फडके त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात.
अशा देशप्रेमी वासुदेव फडके यांच्या जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Pros

  • +Vasudev balavant phadke

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: