Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

national press day – मराठी पत्रकार दिन !

1 Mins read

national press day – मराठी पत्रकार दिन !

 

national press day – मराठी पत्रकार दिन 

आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व मराठी भाषक पत्रकार व वाचकांना मन:पूर्वक शुभेच्छा !

1832 साली आजच्याच दिवशी पहिले मराठी वृत्तपत्र `दर्पण’ वाचकांच्या भेटीला आले. मराठी पत्रकारितेचे आद्य संस्थापक कै. बाळशास्त्री जांभेकर या प्रकाण्ड पंडिताने हे वृत्तपत्र संपादित करुन मराठी पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवली. `दर्पण’ अल्पायुषी ठरले खरे, पण त्यामुळे मराठी भाषेला एका नव्या दालनाचे दरवाजे खुले झाले.

त्यानंतर मराठी पत्रकारिता तंत्रज्ञान व गुणात्मक दृष्ट्या बहरतच गेली.

स्वातंत्र्य चळवळ, समाज सुधारणा व आता बदलते अर्थकारण या क्षेत्रांत मराठी पत्रकार व पत्रकारिता यांनी मोलाची व भरीव कामगिरी बजावली.

महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, न. चिं केळकर, डॉ. बााबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, ना. भि. परुळेकर, गोविंद तळवलकर या आणि अशा अनेक प्रथितयश पत्रकारांनी आपले विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवले. आपण अशाच थोरांच्या परंपरेचे वारकरी आहोत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

`दर्पण’ सुरू होण्यापूर्वी देशाच्या काही भागांत वृत्तपत्रे होती. `हिकीज गॅझेट’, `द बेंगॉल गॅझेट’ यासारखी वृत्तपत्रे वाचकांच्या भेटीस अधुन मधून येत होती. पण त्यांची भाषा इंग्रजी असल्याने सर्वसामान्य नेटिव्ह भारतीयांना त्यांचा उपयोग नव्हता. म्हणून बाळशास्त्रींनी `दर्पण’ हे वृत्तपत्रमराठी व इंग्रजी भाषांमधून प्रकाशित करायला सुरुवात केली.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

सामान्य वाचकांना मराठीतून माहिती व विचार मिळत तर ब्रिटिश सरकारातील अधिकाऱ्यांच्या कानावर भारतीयांची गाऱ्हाणी जावीत म्हणून इंग्रजीचा वापर होई.

आज मराठी वृत्तपत्रे केवळ महाराष्ट्राच्या गावागावातच नव्हे, तर देशाच्या व जगाच्या अनेक भागांत पोहोचली आहेत. अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशांतून मराठी वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली आहेत. इंग्रजी व हिंदीच्या तुलनेत मराठी वृत्तपत्रांच्या खपाचे आकडे वाढू लागले आहेत. या प्रगतीचे मोठे श्रेय या पत्रकारितेला जन्म देणाऱ्या बाळशास्त्रींना द्यायला हवे.

`दर्पण’च्या वाढदिवसानिमित्त ६ जानेवारीला `मराठी पत्रकार दिन’ साजरा होतो. अनेक शहरांत व गावांत पत्रकारांच्या सभा व कार्यक्रम होतात. त्यातून विचारमंथन होते व नव्या पत्रकारांच्या ओळखीही होतात. मराठी पत्रकारांसाठी हा दिवस `सण’च असतो.

पुन्हा एकदा मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !

– भारतकुमार राऊत

Leave a Reply

error: Content is protected !!