Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Peshwa Heritage at Menavali wada – फडणवीस वाडा बोलु लागला 

1 Mins read
  • Peshwa Heritage at Menavali wada - फडणवीस वाडा बोलु लागला 

Peshwa Heritage at Menavali wada – फडणवीस वाडा बोलु लागला 

 

 

 

 

नाना फडणीसांच्या मेणवलीला बरेच वर्षांनी भेट दिली.आमच्या लहानपणीचा वाडा आणि आताचा हववाडा यात मोठा फरक आहे.आता वाडा बोलतो आहे असे वाटते.
वाई इतिहास समितीचे सदस्य नितीन मेणवलीकर यांच्या प्रयत्नाने आता गाईड, माहिती पुस्तिका, आॅडीओद्वारे तसेच व्हिडीयो द्वारे सर्व सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे वाडा इतिहासासह बघता, वाचता व ऐकता येतो.या Peshwa Heritage at Menavali wada वाड्यातील खोल्या व त्यांची रचना याचा तपशील गाईडकडून मिळतो

आम्ही गंगापुरीत राहायचो ,तेथून मेणवली १.५ किलोमीटर अंतरावर शेवटची काही वर्षे तर अगदी मेणवली वेशीला लागून असलेल्या घरातच रहायचो.बरेचदा घरी आलेल्या पाहुण्यांना मेणवली दाखवायची जबादारी माझेकडे असायची.पण त्यावेळी फक्त Peshwa Heritage at Menavali wada नाना फडणवीसांचा वाडा एवढीच माहिती होती. त्यावेळी नानांची थोरवी वाड्याचे वास्तूची ऐतिहासिक व आराखडा याची माहिती नव्हती.नंतरच्या काळात इतिहास व पर्यटन याची आवड लागली व नाना व त्यांच्या वाड्याचे महत्व समजले.लहानपणी वाई मेणवली रस्ता कच्चा होता आम्ही सर्वजण चालतच जायचो,आता पोटातले पाणी नहलविणारा रस्ता झाला आहे. दिवाळीनंतर महाबळेश्वरहून परत येताना अनेक पर्यटक मेणवली येथे येत होते.

menawali wada

menawali wada

वाड्यासमोरील पार्किग फुल झाले होते. मी तेथे गेलो तेंव्हा आदले दिवशी ५०० पर्यटकांनी भेट दिली होती असे समजले .हे वाडा व्यवस्थापनेचे कौश्यल्य आहे.
नितिनसरांच्या प्रयत्नातुन लवकरच संग्रहालयाचे कामाची सुरुवात होत आहे.

Peshwa Heritage at Menavali wada मेणवलीची खास वैशिष्ट्ये

Peshwa Heritage at Menavali wada  नाना फडणीस वाडा

menawali wada satara

menawali wada satara

नानांनी हा दुमजली वाडा केवळ विश्रांती साठी बांधला होता ,
विश्रांतीसाठी आले तरी त्यांचे कारभारावर चोख लक्ष होते.त्यामुळे गुप्तहेर ,सरदार यांचे येणेजाणे चालूच असायचे.त्यामुळे कुटूंबांचे खाजगीपणा,महीलांचे कार्यक्रम,देवघर, पाहुण्यासाठी कक्ष,शयनकक्ष ,मसलतखाना,कार्यालय यांचा विचार करून वाड्याची रचना केली आहे .

सहा चौक असलेला या वाड्यातील प्रत्येक चौक चौसोपी आहे (चारही बाजूला सोपे व मध्ये खुली जागा)
मेणवलीचा कृष्णाघाट येथे त्रिकोणी राॅकेटसारखा बांधीव पायऱ्या असलेला घाट व त्याचे पुर्वबाजूस स्नानासाठी एखाद्या स्विमिंग पुलासारखी सुरक्षित जागा घाटातच अंतर्भूत केली असावी,
काठावरील मेणेश्वराचे मंदिर,त्याच्या प्रदक्षिणा ओट्यावरून मागे जा व पहा
” काय सांगू कृष्णेचा थाट सभोवती घाट वृक्ष घनदाट ” याची अनुभूती येईल.

fadanvis wada

fadanvis wada

मेणेश्वराचे मंदिरासमोरच चिमाजीअप्पानी वसई मोहीमेचे वेळी आणलेली पंचधातुची पाऊणटन वजनाची पोर्तुगीज घंटा आहे .
मेणेश्वराच्या उत्तरेस आहे विष्णू मंदिर आहे या मंदिरातील मूर्ती नानांचे विश्वासुमित्र पेशव्यांचे सरदार हरिपंततात्या फडके यांनी नेपाळहून आणलेल्या तीन विष्णू मूर्तीपैकी एक आहे.
वाड्याचेपुढील बाजूस पाणी धरून ठेवणारा एक आॅफ्रिकन जातीचा गोरख चिंच(Baobab tree) आहे त्याचा बुंधा हत्तीचे पायासारखा दिसतो
वाड्याकडे पाहून नानांचा मला ज्ञात असलेला इतिहास आठवला..

सवाई माधवराव यांच्या सरदारांचे वर्णन करणाऱ्या शाहीर बाळा बहिरा यांच्या पोवाड्यातील ध्रुवपद व तिसऱ्या कडव्यातीळ खालील ओळी आठवल्या
श्रीमंतमहाराज सवाई रावसाहेब मोतीदाणा । खुप युक्तीनें राज्य राखिलें यशवंत फडणीस नाना ॥ ध्रु०॥
भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार । मर्दानें हो राज्य राखिलें मनसोबीच्या तलवार ॥ इंगेजाला खडे चारिले नाहीं लागुं दिअले थार । दर्यामंधीं पिटून घातले काय सांगू वारंवार ॥ बदामीचा किल्ला घेतला असा पुरुष नाहीं शहाणा । खुप युक्तीनें०॥ ॥३॥
नानानांचे निधन झाले त्यानंतर पुण्याचा कर्नल पामरने गव्हर्नल जनरल वेलस्ली याना कळविले,
” नानाच्या मृत्यूबरोबर शहाणपण व मुत्सद्दीपणा यांचाही पुणे दरबारने निरोप घेतला.”

school teacher and students visiting wada

school teacher and students visiting wada

तर बाजीरावास लिहिलेल्या पत्रात वेलस्ली म्हणतात ” अलौकिक बुद्धिमत्ता अन अद्वितीय गुण असलेल्या नानांचा मृत्यू हे चिरकालीन दुःख आहे .”
नारायणराव पेशवे यांचे हत्येननंतर नाना फडणीस यांनी बारभाईंच्या मसलतीमधून इंग्रज व निजामाशी हातमिळवणी करणाऱ्या राघोबास हटवून नारायणरावांचे पुत्रास पेशवेपदावर आणले.
नानांचे पूर्वज सध्या ऑलिव्ह रिडले जातीची कासवे दिसणाऱ्या वेळास गावचे.येथे मार्च मधे कासव महोत्सव भरतो.

नानांचा जन्म सातारा येथे अदालत वाड्या जवळील नातुवावाड्यात १२ -२ १७४२ रोजी झाला.२९ नोव्हेंबर १७५६ मध्ये वयाच्या १४ वे वर्षी फडणीस झाले.राघोबाने त्यांची फडणीशी काढून घेतली त्यानंतर पुन्हा १९६३ मध्ये ते फडणीस झाले. वर्ष १७९२ दिल्लीच्या बादशहाने वजिराची फडणीशी बहाल केली .

नारायणरावांचे मृत्यूनंतर सवाई मधवराव पेशवे यांचे जणू वजीराचे वजीर असल्यासारखा कारभार केला.अखेरीस त्यांना खूप वाईट दिवस आले.दुसरे बाजीरावाने त्यांना कैदेत टाकले व संपत्ती जप्त केली,दौलतराव शिंद्यांच्या मध्यस्तीने त्यांची सुटका झाली .त्यांचे १३ मार्च रोजी पुणे येथे निधन झाले.त्यानंतर नानाची पत्नी जिऊबाई येथे रहात होत्या त्या १८५४ मध्ये निवर्तल्या.
” मेमॉयर ऑफ दि लाईफ ऑफ दि लेट नाना फडणवीस “

यापुस्तकात ब्रिटिश लेखक मॅक्डोनल्ड याने नानांचा इतिहास लिहिला आहे .त्याने जीऊबाईची मेणवली येथे प्रत्यक्ष भेट घेतली होती. मेणवली जवळ पांडेवाडी नावाचे गाव आहे तेथे रामशास्त्री प्रभूणे बाजीरावाशी मतभेद झाल्याने येऊन राहिले होते मात्र तेथे आता त्यांची कोणतीही स्मृती शिल्लक नाही,
येथे माहिती देताना एक गोष्ट जाणवते अप्रत्यक्षपणे “मोडी लिपीचा ” विसर पडू देऊ नका हाच संदेश येथील दिला जातो.तसेच महाराष्ट्रातील इतर वारसास्थळनी सुद्धा याचे अनुकरण करावे असे वाटते. मराठेशाहीतील बहुतेक ऐतिहाससिक नोंदी व कागदपत्रे मोडी लिपीत आहेत.त्यामुळे इतिहासाची पडताळणी किंवा अभ्यास करण्यासाठी मोडी अवगत असणे आवश्यक आहे. वाड्यात गेल्यावर या गोष्टीची जाणीव होतेच.तुमची सही पण तुम्हाला मोडीमध्ये पाहता येते.

Iscon teacher and students visiting wada

Iscon teacher and students visiting wada

Peshwa Heritage at Menavali wada – वाड्याचे मुख्य दरवाजातून आत गेल्यावर नगारखान्याखालील मोकळ्या जागेतील स्वागतकक्षामध्ये कार्यालय थाटले आहे.तेथे ईयर फोन मिळू शकतो व वाड्यात जेथे तुम्ही असाल तेथील जागेचे वर्णन तुम्हाला ऐकता येते.

Peshwa Heritage at Menavali wada – मेणवली वाड्यात रायगडावर इंग्रजांशी अखेरचा १४ दिवसाचा लढा देणाऱ्या वाराणसीबाई व बाजीराव यांचा विवाह झाला होता.
कृष्णानदीचा सुंदर घाट, वसई मोहीमेचे वेळी आणलेली पंचधातुची पाऊणटन वजनाची पोर्तुगीज घंटा या समृध्दीच्या खुणा आहेत.
पुर्वेस महागणपतीची वाई, उत्तरेस पांडवगड,दक्षिणेस पाचगणी ,मावळतीला धोम धरण व भोगावं येथील वामन पंडितांची समाधी, तसेच कमळगड , वायव्येला रायरेश्वर व केंजळगड अशा सह्याद्रीच्या कोंदणात वसलेली मेणवली आवर्जून पहा.

संकलन माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!