suryaji kakade – स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे सरदार सूर्याजी काकडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
स्वराज्यस्थापनेच्या छत्रपती शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्यात प्रथमपासूनच सूर्यराव काकडे सामील झाले होते. जावळीच्या मोऱ्यांचा नि:पात आणि रोहिडा किल्ला
जिंकण्यात सूर्यराव सहभागी होते. अफजलखानाच्या सैन्याचा प्रतापगडाजवळ शिवरायांनी नाश केला. त्यातही सूर्यरावांनी आपली तलवार गाजली होती.
सूर्यराव हे शिवरायांचे बालपणीचे मित्र होते.रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.सुर्यराव काकडे यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे.
शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली . शिवरायांनी मोगली मुलुखावर आक्रमण सुरू केले. मराठी सैन्याने नाशिक बागलाण व मोगल इलाख्यातील महत्त्वाचे किल्ले जिंकले.
यातच साल्हेर या बलदंड दुर्गाचा समावेश होता. मराठ्यांच्या या धडाक्याने हादरलेल्या औरंगजेबाने प्रचंड मोठी फौज नाशिक भागात पाठविली.बहादूरखान ,इखलासखान,
दिलेरखान असे अनेक नामवंत मोगली सेनानी यात सहभागी होते. चाळीस हजारावर मोगली फौज घेऊन इखलासखानाने साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान जेव्हा
राजांना कळले तेव्हा आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदा करवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन साल्हीरेस जाऊन बेहेलोलखानास धरून आणा.कोकणातून
मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.’हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे . प्रतापराव,सुर्यराव साल्हेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.
मोगली वेढ्यातून दिलेरखानाने दहा हजारांची फौज घेऊन पुण्यावर चाल केली. पुण्यात नासधूस ,लुटी आणि कत्तलीचे थैमान घातले. पुण्यावरील या अमानुष
कत्तलींचा बदला मराठ्यांनी साल्हेरला घेतला .या युद्धाचे सभासद बखरीतील वर्णन रोमहर्षक असे आहे. सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो
”चार प्रहर दिवस युध्द जाहले.मोगल,पठाण रजपूत,तोफांचे,हत्ती,उंटे आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की,तीन कोश
औरसचौरस,आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले. मारता मारता
घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजियाकडे गणतीस लागले .सव्वाशे हत्ती सापडले .सहा हजार ऊंटे सापडली. मालमत्ता खजिना ,
जडजवाहीर, कापड ,अगणित बिछाईत हातास लागली.बेवीस वजीर नामांकीत धरले. खासा इखलासखान आणि बेलोलखान पाडाव झाले.युध्दात प्रचंड प्रमाणावर
हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले. या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.
या युद्धात.. प्रतापराव सरनौबत, आनंदराव ,व्यंकोजी दत्तो , रुपाजी भोसले ,suryaji kakade सुर्यराव काकडे.. यांनी कस्त केली.. आणि युद्ध करिता सुर्यराव काकडे पंचहजारी
मोठा लष्करी धारकरी याणे युद्ध थोर केले .ते समयी जंबुरीयाचा गोळा लागून पडला .सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे भारती जैसा कर्ण योद्धा ,त्याच प्रतिमेचा
असा शूर पडला. विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे,
आनंदराव,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले.हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले.
’खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीराजेसच दिधली असे वाटते. आता शिवाजीराजां अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवाजीराजांची चिंता
जीवी सोसवत नाही.’असे बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम स्थानावर होता.
असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा
दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे
सुरत शहरास कायमची दहशत बसली. साल्हेरच्या प्रचंड रणकंदनात suryaji kakade सूर्यराव काकडे रणांगणावर धारातीर्थी पडले. महाभारतातील अखेरच्या युद्धाची आठवण
करून देणाऱ्या ह्या शिवभारतातील युद्धात सूर्यराव काकडे २ जानेवारी १६७२ रोजी कर्णा प्रमाणे लढून वीरगतीस प्राप्त झाले. स्वराज्याचा मोठा मोहरा व
शिवरायांचा सवंगडी स्वराज्यासाठी खर्च झाला. महाराजांना अपार दुःख झाले.या युद्धाने मोगलांचे नुसते कंबरडेच मोडले नाही तर त्यांचे विलक्षण मानसिक
खच्चीकरणही झाले. मराठे मैदानी लढाईतही आपल्या वरचढ आहेत हे ध्यानात येतात पुन्हा असा मोठा मोगली हल्ला मराठ्यांच्या स्वराज्यावर
छत्रपती शिवराय जिवंत असे पर्यंत करण्याची हिम्मत मोगलांना झाली नाही.
अशा या थोर व शोर्यशाली सरदार सूर्यराव काकडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन