POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

socialism in India – ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते लेखक पत्रकार

socialism in India

socialism in India – ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते लेखक पत्रकार

 

socialism in India – कामगारनेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे आज स्मृतिदिन

 

 

 

22/5/2021,
लेखक पत्रकार व कामगारनेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे हे व्यवहारी राजकारणपटू आहेत. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास सखोल

असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. त्यांचा जन्म नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथे दिनांक १० ऑक्टोंबर १८९९

रोजी सामान्य कुटुंबात झाला.त्यांचे शालेय शिक्षण नासिक येथे तर उच्च शिक्षण मुंबई येथील विल्सन महाविद्यालयात आले.विद्यार्थिदशेपासूनच त्यांची

लढाऊ वृत्ती दिसून आली.सुरवातीस महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला.

 

बी.ए.ला असताना गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला.

पण म.गांधीजींचे तत्त्वज्ञान व कार्यक्रम त्यांना पटेनासे झाले व ते साम्यवादाकडे वळले.वर्ष १९२१ मधे त्यांनी गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक त्यांनी लिहिले.

या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले.वर्ष १९२२ मधे त्यांनी साम्यवादी विचारांचा socialism in India प्रसारार्थ

” सोशॅलिस्ट “हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राचे माध्यमातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले.

 

कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते.या वृत्तपत्राने प्रभावित होऊन मुळे

मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास कॉ.डांगे यांना निमंत्रित केले होते पण ते त्यावेळी जाऊ शकले नाहीत.

डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. socialism in India चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७)

हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले.

 

कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास ते हजर राहिले (१९२८). १९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील

झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती.

तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला.

त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

१९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले

 

आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली.

त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली.

लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली.

 

तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी

नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात

त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले.

कॉ.डांगे मुंबईकामगारांमध्ये काम करीत असताना आर्.बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला.लाटवाला यांना

कॉ.डांग्यांनी त्यांचेकडे नोकरी करावी असे वाटत होते.त्यासाठी त्यांनी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले.परंतु कामगार चळवळी

पासून लांब जाण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही.

१९२६–२७ या कालावधीत कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला.कॉ.डांगे यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला.

कॉ.डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले.चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति हे मराठी साप्ताहिक काढले.

थोड्याच अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले.अखिल भारतीय कामगार व कृषीपक्षाच्या कलकत्ता येथे वर्ष १९२८ मधे झालेल्या

आधिवेशनास ते हजर राहिले.१९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५

मध्ये ते सुटले.या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती.

तथापि कॉ.डांगे यांनी त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्ततेणे चालूच ठेवला होता.१९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा

संप प्रदीर्घ काळ चालविला,व त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.कॉ.डांगे हे व्यवहारी राजकारणपटू होते. socialism in India

त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास होता.त्यांनी भरपूर स्फुटलेखन केले.

 

“इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी “ व व्हेन कम्युनिस्ट डिफर “ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला.कन्या रोझा देशपांडे आणि जावई बानी देशपांडे

यां दोघांनी मिळून आपल्या वडिलांवर ‘ श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह ‘ नावाचे पुस्तक लिहिले आहे.रोझा देशपांडे

ह्या सन १९८० ते १९८७ च्यादरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या.त्या पाचव्या लोकसभेच्या सदस्य होत्या.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या(सीपीआय) तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती.

कॉ.डांगे यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला.या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

२२ मे १९९१ रोजी मुबई येथे त्यांचे निधन झाले.

 

माधव विद्वांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!