Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

shivaji wife – छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई राणीसाहेब

1 Mins read

shivaji wife – छत्रपती शिवाजी महाराज

व गुणवंताबाई राणीसाहेब

 

 

shivaji wife – १५ एप्रिल १६५६ – छत्रपती शिवाजी महाराज

व गुणवंताबाई राणीसाहेब यांचा विवाह

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणवंताबाई राणीसाहेब यांच्याबरोबर १५ -४-१६५७ – मध्ये विवाह झाला.

गुणवंताबाई या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आठव्या राणी होत्या. तंजावर येथील बृहदिश्वर शिलालेखात

शिवपत्नींची नामावली सांगताना नमूद केले आहे की, मालहोजी लेके तंजावर येथील टिपणात हिला

फर्जंदाची लेक असे म्हटले आहे.

जिजाऊ साहेबांबरोबर विदर्भातून जी घराणी आली होती ,त्यामध्ये वराड मधील चिखली तालुक्यातील

करवंड येथील हे इंगळे देशमुख घराणे होय. हे घराणे तंजावरचे,परंतु त्यांचे वतन वर्हाडात होते.

इंगळे घराण्यातील एक शाखा राजमाता जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे समवेत महाराष्ट्रात आली होती.

हे घराणे पर्यायाने शहाजी राजांकडे राहात होते.

www.postboxindia.com

Gunvantabai rani

खबद बेलसर येथे सन १६४८ मध्ये फतह खानाशी छत्रपती शिवरायांनी केलेल्या युद्धात शिवरायांच्या वीराविषयी कवी परमानंद शिवभारतात सांगतात, भयंकर आहे असा यमाप्रमाणे,
युद्धनगाचा शृंगार ज्याच्या भाल्याचे टोक आहे, असा शिवाजी इंगळे यांचा उल्लेख करून पुढे इंगळे यांचा पराक्रम सांगतात. शिवाजी इंगळे यांनी अत्यंत मोठा पराक्रम केला होता. इंगळे यांनी शिरवळच्या रणक्षेत्रावर पंचवीस लोक मारले होते. याच शिवाजीराव इंगळे यांची shivaji wife गुणवंताबाई या कन्या होत्या.

१५-4-१६५७ मधे भोसल्यांशी सोयरीक होऊन shivaji wife गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये आहे. या शकावलीला शिवापुरकर देशपांडे यांच्या शकावलीची साक्ष आहे .आपल्या माहेरकडचे इंगळे घराणे फुटून मोगलांकडे जाऊ नये म्हणून आऊसाहेबांनी इंगळे घराण्यातील लेक सून म्हणून घरात आणली. जिजाऊसाहेबांची ही खेळी यशस्वी ठरली. कारण इंगळे यांचा जमाव किल्ले राजगडावर शिवरायांच्या देखरेखीखाली राहिला.

www.postboxindia.com

shiavajiraja

याला इतिहासाच्या पुढील नोंदीनी साक्ष दिली. शहाजीराजे यांचे पुत्र व्यंकोजीराजे यांच्या प्रथम धर्मपत्नी चिखली तालुक्यातील कळवण येथील इंगळे घराण्यातील होत्या. याच इंगळे घराण्यातील काताजी इंगळे देशमुख प्रतापगडी युद्धप्रसंगी शिवरायांच्या दहा अंगरक्षकापैकी एक होते. सन १६५९मध्ये रायबागेच्या रणांगणावर रुस्तुम -ए -जमान आणि अफजलपुत्र फाजल यांच्याशी झालेल्या युद्धात हिराजी इंगळे छत्रपती शिवरायांच्या घोडदळात होते.

किल्ले पन्हागडावर बाळाजी इंगळे मुद्राधारी ,त्र्यंबक इंगळे किल्लेदार ,आणि कान्होजी इंगळे या तीन इंगळे ह्यांनी सन १६६२ पासून१७०१ पर्यंत औरंगजेबास झुंजवत ठेवून शेवटी तह करण्यास भाग पाडले. शिवपत्नी गुणवंताबाई साहेब या तोलामोलाच्या इंगळे सरदारांच्या कन्या होत्या. त्यांचा मृत्यू सन १६७० मधे झाला.

अशा या गुणवंताबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 
संदर्भ 
शिवपत्नी महाराणी सईबाई 
लेखक डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

%d bloggers like this: