My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIA

Sharifraje – शरिफजीराजे

1 Mins read
  • Sharifraje

Sharifraje – शरिफजीराजे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

भातवडीची लढाई व Sharifraje –  शरिफजी राजेंचा मृत्यू 

 

 

३१ आॅक्टोबर १६२४ मधे भातवडीची लढाई झाली. मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमत: फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहत होते. मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणगोजी नाईक निंबाळकर यांनी आपली मुलगी ऊमाबाई ऊर्फ दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.त्यांना दोन मुले एक शहाजी व दुसरे Sharifraje – शरीफजी
मालोजीराजेंच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागीरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्तीही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिकच झालेली होती.
शहाजीराजांच्या आई उमाबाई या एक धाडसी दूरदृष्टी असलेल्या स्री होत्या. आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते. बालपणापासून राजकारण -समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्च कोटींचे अधिष्ठान लाभले होतेच,आणि त्यांच्या मनावर चांगले संस्कारही झाले होते .त्यामुळे ते फक्त योध्दा नसून त्यांचे मन साहित्य – संगीत इ.
कलांकडेही आकर्षित झाले होते.
मालोजीराजांकडून शूर लढवय्येपण , द्रष्टेपण आणि रयतेच्या सुखाला प्राधान्य देण्याचे औदार्य हे गुण त्यांच्यात होते तर ,आई उमाबाई राणीसाहेबांकडून धाडस, दूरदृष्टी, आणि गोरगरिब रयतेसाठी”‘करूणा ” हे गुण शहाजीराजांनी आत्मसात केले होते.शहाजीराजे हे मुळातच महापराक्रमी होते.
त्यामुळे पुढे युद्धात त्यांची मदत मिळविण्यासाठी निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही वेळप्रसंगी प्रयत्न करत होते. शहाजीराजे ध्येय धुरंदर व अत्यंत महत्त्वाकांक्षी होते. राजनीती व प्रशासनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. सत्ता ही खऱ्या अर्थाने सत्ताधिशांना नव्हे तर आमरयतेला सुखावणारी असावी हे ब्रीद त्यांनी मालोजीराजेंकडूनच शिकून घेतले होते.
मराठी मातीत स्वराज्य निर्मितीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनी घातला.आपले स्वप्न आपल्या मुलाच्या हातून साकार करून घेणारा हा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता. स्वराज्य स्थापनेची स्फुर्ती जिजाऊ शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.
भातवडीच्या युद्धामुळे शहाजी राजांची प्रतिष्ठा खूप वाढली. त्यांना वगळून आता दक्षिणेत कोणतेही राजकारण सिद्धीस नेणे अशक्य होते .भातवडीच्या लढाईचे खरे शिल्पकार शहाजीराजेच होते. शहाजीराजांनी भातवडीच्या लढाईत फार मोठा पराक्रम गाजवला. अहमदनगरच्या पूर्वेस भातवडीची गढी सुमारे दहा मैलावर डोंगराळ प्रदेशात गणिमीयुध्द पध्दतीने अत्यंत अनुकूल आहे. येथे मोगल व विजापूरच्या सैन्याचा शहाजीराजांनी पूर्ण पराभव केला. या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम केल्यामुळे मलिक अंबरला त्यांचा हेवा वाटू लागला. फक्त शहाजीराजांच्या पराक्रमाच्या दृष्टीने हे युद्ध अत्यंत महत्त्वाचे ठरले .या युद्धानंतर शहाजीराजे हे व्यक्तिमत्व राजकीय पटलावर विशेष चमकू लागले. Sharifraje –  शरीफजी राजे भोसले ह्यांना भातवडीच्या लढाईत वीरमरण आले.
या लढाईत शहाजीराजे आणि त्यांचे लहान बंधू Sharifraje – शरीफजी राजे यांनी मोगल सैन्याची प्रचंड कत्तल केली. त्यामुळे मोगल सैन्य व आदिलशाही सैन्य घाबरून पळत सुटले. त्या सैन्याच्या पिछाडीवर असणारा मुगल सरदार मनचेहर यांच्याशी झालेल्या लढाईत पराक्रमी Sharifraje –  शरीफजीराजे बाण लागून मृत्युमुखी पडले. त्यामुळे खवळलेल्या शहाजीराजांनी आपल्या इतर बंधू सह त्या सैन्यावर हल्ला करून बरेच सरदार मारले व कैद केले.
खंडागळे हत्ती प्रकरणात जाधव व भोसले घराणे रणमैदानावर पुन्हा एकदा आमने सामने होते. भातवडीचे युद्ध है निजामशाही विरुद्ध आदिलशाही व मोगल यांच्यात झाले या युद्धाअगोदर लखुजी जाधव व शहाजीराजे हे अहमदनगरच्या निजामशाहीतच सेवेत होते. आहमदनगरची सुत्रे मलिकअंबर याच्या हातात होती. मलिक अंबर अतिशय पराक्रमी होता. परंतु मोगली सैन्याने ४ फेब्रुवारी १६१६ ला निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याचा दारुन पराभव केला. मलिक अंबर पळत असताना मोगली सैन्याने त्याचा पाठलाग केला या पाठलागात निजाम शाहीचे बरेच सरदार, बरेचसे सामान, पोडे मोगलांच्या हातात सापडले. मलिक अंबरला बराचसा प्रदेश गमवावा लागला.
मोगलापुढे शरणागती पत्करल्यामुळे मलिक अंबरची प्रतिष्ठा पार धुळीस मिळाली होती, तेव्हा आपली बाजू सुरक्षीत करण्यासाठी त्याने अनेक मराठे सरदारांना अमिषे देणे सुरू केले. त्यामुळे लखुजी राजे जाधव, बापुजी कारे, उदाराम हे मलिक अंबरला मिळाले मलिक अंबरच्या मराठा कारगिरांनी फार मोठा पराक्रम करून मोगली सैन्याला सळो की पळो करून सोडले. त्यामुळे मोगल बादशहाजहाँगीरने शहाजादा खुर्रम यास बरेचसे सैन्य देऊन दक्षिणेस पाठविले. मात्र शहाजी राजे निजामशाहीत मलिक अंबरचा पक्ष धरुन राहिले, लखुजी राजे जाधव मोगलांना जावून भेटल्याने मोगलांना प्रचंड आत्मविश्वास वाढला. त्यामुळे मोगलांनी अहमदनगर व अहमदनगर जवळील भातवडीमधे घनघोर युद्ध झाले या युद्धात मलिक अंबर हा सेनापती होता. मात्र तो नावापुरताच होता. कारण आता त्याचे वय ८० वर्षांचे होते.
या ठिकाणी युद्धाची पूर्ण व्युहरचना ही शहाजी राजे भोसल्यांनी केली होती. हे युद्ध १६२४ मध्ये झाले, या युद्धात त्यांनी मोगल व आदिलशाही या दोन्ही सैन्याचा धुव्वा उडवीला. या युद्धात मोगलांचा सुभेदार लष्करखान व येदीलशाही मुला महमद यैसी दोन कटके मलिक अंबरने बुडविली.
शहाजीराजे व Sharifraje –  शरीफजी राजे यांनी या लढाईत विशेष शौर्य दाखवले. आपल्या बाणांनी पाडणाऱ्या मोगल सैन्यावर शहाजीराजे तुटून पडले व त्यांनी मोगलांची दाणादाण उडवून दिली भातवडीच्या युद्धाने निजामशाहीचा बचाव झाला ,म्हणून हा प्रसंग ,ही लढाई महत्त्वाची मानली जाते. मोगल व विजापुरी फौजांचा जंगी पराभव करून शहाजीराजांनी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला. निजाम व मलिक अंबरला खूप आनंद झाला .त्यांना कळून चुकले की राजांच्या शौर्याचा दरारा चारही पातशाहीत विलक्षण वाढला. सर्वांना शहाजीराजांच्या सामर्थ्याचा, शौर्याचा धाक निर्माण झाला. निजामशाहीचा बचाव झाला व शहाजीराजांचे नाव इतिहासात अजरामर झाले.
या युद्धात दुर्दैवाने शहाजी राजे यांचे बंधु Sharifraje –  शरिफजीराजे ठार झाले.
खंडागळे हत्ती प्रकरणांमध्ये मलिक अंबर वजीर व निजाम शहा यांचा हात होता .लखुजीराजे यांचा काटा काढण्यासाठी हे प्रकरण पण निजामशहाणे घडवून आणले. लखुजीराजे निजामशाही सोडून थेट शहाजहानला सामील झाले .हे कळताच विजापूरच्या आदिलशहाने जहांगीर बादशहाशी युती करून निजामशाहीवर आक्रमण करण्यासाठी मोगलांच्या सैन्यास मिळून नगरवर आक्रमण केले. नगर जवळच्या भातवडी या गावी मोगल आदिलशहा यांच्या संयुक्त सैन्यावर मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाही सैन्य चालून आले. निजामशहाने गनिमी काव्याचा कुशलतेने वापर करून शत्रु सैन्याची रसद तोडली व अचानक हल्ला करून ह्या बलाढ्य शत्रूंचा दणदणीत पराभव केला. ह्या लढाईत शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम गाजवला.
अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतातील इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि Sharifraje –  शरीफजीराजे व वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
Sharifraje –  शरीफजींच्या धर्मपत्नी म्हणजे देवगिरीच्या सोमवंशी यादव कुळातील यादवराजांची कन्या व सिद्धराजांच्या भगिनी दुर्गाबाईसाहेब.
शरीफजीराजे यांना दोन मुले, एक महादजी आणि एक त्रिंबकजी. यांच्या मुलाचं नाव व्यंकटजी, यांना अहमदनगर भागातील जहागिरी मिळाली होती, त्याना सहा मुले संभाजी, माणकोजी (खानवट घराणे) शहाजी ,बेळवंडी घराणे शरीफजी, तुकोजी, बाबाजी. आज यातील भोसले वंशज वेगवेगळ्या विभागात रहात आहेत. Sharifraje –  शरीफजीराजे यांचे भातवडी येथे स्मारक असून राशीन येथील प्रसिद्ध देवी मंदिराशेजारी त्यांच्या पत्नीचे व पुत्र त्र्यंबकजी यांची समाधी स्थळे आहेत.

अशा या थोर व शोर्यशाली Sharifraje –  शरीफजीराजे यांचा ३१ आॅक्टोबर १६२४ रोजी मृत्यू झाला.

स्मृतिदिनानिमित्त Sharifraje – शरीफजीराजे यांना विनम्र अभिवादन 

 

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: