Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

sachin waze – फडफडणवीस ते तडफडणवीस

1 Mins read

sachin waze – फडफडणवीस ते तडफडणवीस

 

sachin waze – सत्तापालट करण्याची ही आयतीच संधी असल्यासारखे विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस वागत होते.

 

 

 

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येते न येते तोच कोरोना सारखे जागतिक संकट आणि याचा सामना करण्याची राज्यातील जबाबदारी संपूर्णपणे राज्याच्या आरोग्य खात्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यावर सुद्धा होती, जागतिक महामारीत अनेक देशांनी गुढगे टेकले असताना संपूर्ण राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते जबाबदारीने वागत होते, अशा वेळी विरोधी पक्षातील नेत्यांना आयतीच संधी आल्यासारखे वाटत होते. विरोधी पक्षाने या महामारीत सत्ताधारी पक्षासोबत खांद्याला खांदा लावून काम केले असते तर राज्यातील या सर्वात मोठ्या संकटाच्या काळात जनतेमध्ये चांगला संदेश गेला असता. राजकारणाबद्दलचे अनेकांचे मतपरिवर्तन घडले असते. पण सत्तापालट करण्याची ही आयतीच संधी असल्यासारखे विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस वागत होते.

पुन्हा येणार म्हणत अजित पवारांसोबत चूल थाटायचे स्वप्न सकाळी पाहिलें आणि संध्याकाळी मावळले, त्यामुळे जिव्हारी लागलेला अपमान सहन न झाल्यामुळे फडणवीस यांनी आपल्या कार्यकुशलतेचा, प्रशासकीय संपर्काचा, राजकीय अभ्यास, कायद्याचे ज्ञान आणि कुशल वक्तृत्व याचा योग्य वापर न करता ते चुकीच्या मार्गाने करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, फडणवीस कुशल प्रशासक आहेत पण तितकेच जबाबदार विरोधी पक्ष नेते सुद्धा. त्यांच्या विरोधी पक्ष नेते पदाची चुणूक ते अधून मधून दाखवत असतातच पण या कौशल्याचा वापर राज्यातील परिस्थिती सावरण्यासाठी केला तर पुढील निवडणुकीत त्यांच्या बद्दल लोकमत नक्कीच त्यांना तारून नेईल. पण संपूर्ण अधिवेशन आणि त्या आधीच्या घडामोडी पहाता देवेंद्र फडणवीस कुठे तरी चुकत आहेत असेच सतत वाटत होते.

राज्यातील करोनाच्या संकटानंतर राज्य सावरत असताना वॅक्सीन बद्दल चे प्रश्न उभे करणे, आत्महत्यांची प्रकरणे यांना हत्यांच्या प्रकरणाकडे वळविणे, किंवा ते सांगतील त्या दिशेने तपास यंत्रणांनी काम करावे असे त्यांना वाटते, साहेब आता सत्तेत नाहीत हे विसरले बहुतेक. प्रश्न सत्ता आणि सत्ताधारी असा नाहीच. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण ते मुख्यमंत्री असताना दाबले गेले, या प्रकरणात ते सत्ताधारी असताना त्यांचा त्यांच्या पक्षाचा माध्यमातील आवाज, कँपेन मॅनेजर किंवा अघोषित प्रवक्ता अर्णब गोस्वामी याचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून अर्णब ला सुटका मिळाली न्हवती पण राज्यातील सत्ताबदलानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी याप्रकरणी न्याय मिळावा या हेतूने हे प्रकरण पुन्हा सुरु करत सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे साकडे घातले.

अशा वेळी पोलीस दलातील अत्यंत हुशार आणि निष्पक्ष चौकशी अधिकारी, ज्यांचा शोध परिणाम अत्यंत परिणाम कारक असतो अशा sachin waze सचिन वाझे यांच्याकडे हा तपास आला. पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट गटातील प्रदीप शर्मा , दया नायक , रवींद्र आंग्रे या सर्व अधिकाऱयाचे शिवसेनेशी जवळचे संबंध होते. त्यात सचिन वाझे कोरोना च्या दिवसांमध्ये एक कमिटी बसवून सचिन वाझे यांची पुन्हा क्राईम विभागात वर्णी लागली. त्यामुळे अर्णब गोस्वामी सुद्धा थोडा भयभीत झाला होताच कारण ज्या पद्धतीने त्याची अटक झाली त्यामुळे एकतर सत्य बाहेर आले तर अनेक मोठे मासे अडकतील किंवा राज्यातले मोठे विरोधी पक्षातील आणि केंद्रातील दिग्गज अडकू शकतात हि भीती अर्णब गोस्वामी ला वाटत होती. त्यामुळे सर्व प्रकारणे बाजूला ठेवून या देशातली सर्वोच्च न्यायालयाने जलद न्याय देऊन त्याला निर्दोष सोडवले.

आता महाराष्ट्र पोलीस आणि त्यांची बदनामी करण्याची मोहीम इथेच आखली गेली. पोलीस अधिकाऱ्यांना वादाच्या एन्काउंटर मध्ये अडकवायचे आणि सरकारला अडचणीत आणायचे. the best revenge is first Attack nor defense. याच तत्वांच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील कामकाजात अर्णब पॅटर्न चा वापर केला. if you are not convince them than confuse them. आणि मग अधिवेशनाच्या सुरुवातीला संजय राठोड या शिवसेनेच्या आमदाराला संशयाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तर्कांचे खेळ जनतेसमोर मांडले. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील मुलीच्या आत्महत्येमागे संजय चव्हाण यांच्या लिंक आणि माध्यमातील आपला संपर्क याचा खुबीने वापर या वेळी फडणवीसांनी केला. न्याय व्हायला हवा, पण फडणवीस सांगतील तसा न्हवे. तपास अधिकारी पुरावे गोळा करतील आणि त्या दिशेने तपास होईल.

धक्का तंत्र आणि दबाव तंत्र हे कळू न देता शाळेत केलेली घोकंपट्टी आणि ओकंपट्टी याचा वापर या वयात सुद्धा फडणवीस खुबीने करत असल्याचे दिसत होते. ओरडून आणि अभ्यासू वृत्तीचा परिचय देत एखाद्याला संशयाच्या जाळ्यात उभे करण्याची क्षमता जरी फडणवीसांकडे असली तरी न्याय हा कोणावर अन्याय करून मिळत नाही. फडणवीसांची ही फडफडवणीस आणि तडफडणवीस सामान्य जनतेला कळत नाही असे जर त्यांना वाटत असेल तर ते साफ चूक आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास केंद्रातल्या कोणत्या यंत्रणेकडे आहे ? पुलवामा हल्ल्याचे दोषी कोण आहेत ? फडणवीसांनी यावर सुद्धा उघडपणे चर्चा करावी किंवा केंद्रातले पंतप्रधान यांना चर्चेसाठी माध्यमांसमोर उभे राहण्याचे आव्हान करावे. माझी चौकशी लावा ..माझी चौकशी लावा असा आरडाओरडा केला की ताकाला जाऊन भांडे लपविण्यासारखे असते हो. अधिवेशनाआधी फडणवीसांनी बरीच तयारी केली होती, म्हणजे सचिन वाझे प्रकरणात त्यांची विकेट काढण्यासाठी तरी हा प्लॅन न्हवता ना असा संशय आता बळावू लागला आहे. अर्णब चा इगो हर्ट झाला आहे, फडणवीसांची पुन्हा येणार ही इमेज डागाळली आहे आता एक एकेकाला कोंडीत पकडण्यासाठी षडयंत्र रचली जात आहेत का असाच संशय येतोय. ईडी, सीबीआय यांच्या धमक्या देऊन सूत्रे हलविणारे कोणत्याही थराला जाऊ शकतात.

माफ करा फडणवीस, ज्या पद्धतीने आपलयाला संशय घेण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे संविधानाने सुद्धा आम्हाला अधिकार दिले आहेत. त्यामुळे तुमच्या वरचा संशय अधिकच बळावला आहे. मुकेश अंबानींच्या घराखाली सापडलेली गाडी एका गुजराती माणसाची असावी, आणि ती गाडी कोणीही चोरू शकते अगदी तुम्ही सुद्धा.. हा आरोप नाही सामान्य माणसाचा संशय आहे. आणि मग पुढील सूत्रे हलवून स्टोरी स्क्रिप्ट अधिवेशनाआधी लिहून झाल्यावर तपास यंत्रणा त्यांचे काम करत असताना मनसुख हिरेन यांनी आत्महत्या करावी की आपलया स्क्रिप्ट प्रमाणे हत्या असे देखील होऊ शकते. आणि नंतर सचिन वाझे यांच्यावर अधिवेशनात ठरल्या प्रमाणे धक्का आणि दबाव तंत्राचा खुबीने वापर करत आरडाओरडा करून त्यांची बडतर्फी करायला लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावण्याचा अट्टहास हा केवळ आणि केवळ फडणवीस आणि अर्णब यांच्या बदल्याच्या भावनेतून येत असल्याचे दिसत आहे.

सचिन वाझे sachin waze यांच्या सारखे अनेक तरुण पोलीस अधिकारी सेवेत आहेत. अशा प्रकारच्या बदल्याच्या भावनेतुन केलेल्या राजकारणामुळे प्रामाणिक पोलिसांच्या मानसिकतेला तुम्ही धक्का लावत आहात. एका बाजूला २६/११ च्या शहिदांबद्दल फक्त एक दिवस आठवण ठेवता पण जे प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत त्यांचे मनोबल तुम्ही अशा राजकारणाने क्षीण करत आहात हे विसरू नका. न्याय मिळावा हा सर्व जनतेचा अट्टाहास आहे पण तो कायद्याच्या चौकटीत राहून व्हावा, तुम्हाला संशय आहे किंवा तुम्ही करत असलेलया तपास प्रमाणे म्हणा किंवा बनावा प्रमाणे म्हणा तसे होत नाही. तुमचा हा संशय एखाद्या प्रामाणिक अधिकारयाचे आयुष्य संपवेल. गृह खाते तुम्ही सुद्धा सांभाळले आहे, पोलिसांच्या समस्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर सत्ता गेल्यानंतर संशय घ्यावा किंवा संपूर्ण पोलीस दलाचे मनोधेर्य खच्ची व्हावे अशी वक्तव्ये करू नका. पोलीस दलाचे तोंड काळे झाले हे बोलणे देखील आपल्याला शोभत नाही .

पुरावे नष्ट करण्याची पोलिसांना / सचिन वाझे sachin waze यांना संधी देता अशी वक्तव्ये म्हणजे पोलीस दलावरील अविश्वास दर्शवतो. हिरेन मनसुख आत्महत्या प्रकरणावर तुमच्या सारखा तत्पर विरोधी पक्ष नेता असताना जो CDR काढू शकतो, तो पुरावे नष्ट होऊन देईल का ? अन्वय नाईक सारख्या मराठी व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणावर फडणवीस तुम्ही असा गळा काढल्याचे कधी दिसले नाही, गुन्हेगार हा गुन्हेगार आहे पण गुन्हा पुराव्यानिशी शाबीत तरी होऊ द्या. आरोपीच्या पिंजरयात तपास पोलीस अधिकाऱ्याला उभे करायचे आणि त्याला गुन्हेगार ठरवून सुद्धा टाकायचे हे एका माजी गृहमंत्र्याला सुद्धा शोभत नाही यावरून तुमच्या कार्यकाळात तुमच्या नागपुरात गुन्हेगारी का वाढली होती यायची उत्तरे आज मिळत आहेत. ज्यांच्या विशिष्ट विचारधारेच्या पक्षात मोदी लाटेच्या नावाखाली अनेक पक्षांचे कावळे विचारधारेला पाने पुसून त्या फांदीवरून या फांदीवर आले होते त्यांनी सचिन वाझेंच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करावे हे जरा हास्यस्पद आहे.

महाराष्ट्र शांत राहणार नाही म्हणजे काय ? केवळ अंबानी यांच्या घराखाली स्फोटक सापडली आणि त्याच्या संशयावरून झालेल्या तपासात चोरीच्या गाडीच्या मालकाचा मृत्यू झाला याचा तपास न्यायिक मार्गाने होईल ना. देशात पुलवामा झाला त्यावेळी महाराष्ट्र का शांत ठेवलात फडणवीस जी. आपल्या बेलगाम खोट्या आरडा ओरडीला अधिवेशन काळात एन्काउंटर झाले नसले तरी जनता समजदार आहे. आपल्या बेलगाम खोट्या आरडा ओरडीला अधिवेशन काळात काउंटर प्रश्नोत्तराला एन्काउंटर झाले नसले तरी जनता समजदार आहे. अधिवेशनात एक प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून अर्थसंकल्पावर चर्चा अपेक्षित असताना स्क्रिप्टप्रमाणे ही चर्चा होऊच दिली नाही. हे राजकीय अपरिपक्वता आणि बदल्याच्या भावनेतून होत आहे असेच दिसत आहे, त्यामुळे सकारात्मक राजकारण तुमच्याकडून होत नसल्याचे चित्र सध्या जनतेत उभे राहत आहे.

आत्महत्येचे डेस्टिनेशन हा शब्द प्रयोग म्हणजे विरोधी पक्षातील नेत्याची असंवेदनशीलता या शब्दप्रयोगातून प्रतीत होते. संसदीय कार्यप्रणालीत इतक्या असंवेदनशील शब्दांना सार्वजानिक भाषा म्हणून वापरताना आपण एका विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहात हे विसरून चालणार नाही. पोलिसांवर पैसा खर्च कशाला तर त्यांनी लोकांना मारण्याकरता ही भाषा म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याच नागपुरात वाढणारी गुंडगिरी म्हणजे तुम्ही कोणावर पैसा खर्च केलात ? आपण काय बोलतो आणि कुठे याचे भान एका विरोधी पक्ष नेत्याला असायला हवे. मुख्यमंत्र्यानी सभागृहात येऊन निवेदन केले पाहिजे असा अट्टाहास फडणवीस यांनी केला असा अट्टहास एक सामान्य भारतीय नागरिक या नात्याने जर त्यांनी पंतप्रधान यांना माध्यमांसमोर उभे राहण्यासाठी केला तर देशातील परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि त्याचे संपूर्ण श्रेय फडणवीस आपल्याला मिळेल.

पण तुम्ही असे करणार नाही कारण नागपूरच्या अर्ध्या चडडीच्या नाड्या या एकमेकांच्या चड्ड्या सावरण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात हे सुद्धा या निमित्ताने आज माहीत झाले. त्यामुळे अर्नबच्या अटकेसासाठी सुडाचे राजकारण आणि तुमचे पुन्हा येणार यासाठी गेलेली आब्रू यासाठी जी तडफडवणीस जी फडफडणवीस होत आहे ती संपूर्ण जनता समजू शकते. न्याय आणि सन्मान याला धक्का न लावता कायद्याचे राज्य आणि कायद्याने न्याय या देशात संविधानाच्या माध्यमातून होत आहे. आपण ठरवू तो न्याय याला स्वातंत्र्याची गळचेपी सुद्धा म्हणता येईल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वता:ला वेगळे ठेवणारया नागपूरचा महाराष्ट्र करा पण महाराष्ट्राचा नागपूर कधीच होणार नाही. याचा अर्थ समजला असेलच अशी आशा बाळगूया.

VAIBHAV JAGTAP

POSTBOX INDIA

Leave a Reply

error: Content is protected !!