Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

ranjit desai – “कोवाडचे सरकार रणजित देसाई”

1 Mins read

ranjit desai – “कोवाडचे सरकार रणजित देसाई”

 

ranjit desai – “कोवाडचे सरकार रणजित देसाई”

 

 

ज्येष्ठ मराठी साहित्यिक स्वामी, श्रीमान योगी अशा गाजलेल्या कादंबर्याचे लेखक रणजित देसाई यांचे गाव

म्हणजे चंदगड तालुका .कोल्हापूर जिल्हा येथील कोवाड. रणजित देसाई यांचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी

कोवाड मधे झाला.फक्त जन्मच मोठ्या घराण्यातला नव्हता तर साहित्यिक व माणूस म्हणूनही ते फार मोठे,

दिलदार व हळव्या मनाचे लेखक होते .त्यांचा अधिक वावर संगीत क्षेत्रातल्या नामवंत कलाकारांच्या संदर्भात

अधिक असायचा. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी ,वसंतराव देशपांडे ,पंडित जसराज ,किशोरी अमोंणकर,

हे ranjit desai रणजित देसाई यांच्या कोवाडच्या वाड्यावर नेहमीच येत असत.दादांचे लता मंगेशकर यांचे

बरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. हे सर्व त्यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्या मधे आपुलकी होती. गावाकडचे किस्से ,

आपले कृषिवीषयक अनुभव, भेटणाऱ्या माणसांच्या स्वभावातल्या सूक्ष्म खाचाखोचा ते अतिशय चित्रदर्शी आणि

विनोदी शैलीत निवेदन करत. त्यांना गाणी ,शास्त्रीय, मराठी संगीत, मराठी भावगीते, हिंदी ठुमर्या , गझल, कव्वाली,

लावण्या असे गायकीचे सर्व प्रकार आवडत होते. ranjit desai रणजित देसाई चांगले लेखक होते हे खरेच पण

ग्रंथावर अत्यंत प्रेम करणारे हे साहित्यिक होते. त्यांचा ग्रंथसंग्रह निवडक आणि अतिशय सुंदर होता. मी कोवाडमधे

जाऊन सर्व ग्रंथाचा सखोल अभ्यास केला आहे. नुसते ग्रंथ जमून कपाट भरणारे काही माणसे असतात रणजित देसाई

त्यातले नव्हते.त्यांचे वाचनही अफाट होते. निवडक कथा कादंबरीकार त्यांनी साक्षेपाने वाचले होते .संवेदनशील

स्वभावामुळे मनावर वाचनाचे खोलवर संस्कार झालेले होते. ranjit desai रणजित देसाई यांचा नाट्य व सिनेक्षेत्राशी

जवळचा संबंध होता. त्यांनी स्वतः बारा नाटके लिहिली असली तरी ते स्वतःला नाटकाचा नम्र प्रेक्षक मानीत होते.

मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत आणि निर्माते त्यांच्या घनिष्ठ परिचयाचे होते. शास्त्रीय संगीताची आवड

त्यांना लहानपणापासूनच होती. त्यांच्या गावी कोवाडला सर्व क्षेत्रातले कितीतरी मोठे लोक विश्रांतीसाठी दोन दिवस

येऊन मुक्काम करत होते. साहित्य, नाट्य ,चित्रपट प्रेमी ,याप्रमाणेच राजकारणातील नामवंत मंडळी देखील

ranjit desai रणजित देसाई यांच्यावर अत्यंत प्रेम करीत. यशवंतराव चव्हाण,बाळासाहेब देसाई, यशवंतराव गडाख,

शरद पवार या व्यक्तींचे स्वागत रणजित देसाई कोवाडमधे आपल्या खानदानाला साजेसे असेच करत होते.

रणजित देसाई यांना सारे सरकार म्हणून ओळखत. साहित्य, संगीत ,नाट्य, चित्रपट, चित्रकला, राजकारण,

नातीगोती हे सर्व विस्तीर्ण जग त्यांच्या कोवाडच्या लाल मातींशी जोडलेले होते. रणजित देसाई यांची रसिकता,

कलासक्ती, सुंदर वस्तूंवरील प्रेम, घराण्याच्या परंपरेच्या स्मृती जागवणार्या विविध वस्तू त्यांच्या कोवाडच्या वाड्यात

पदोपदी दिसत होत्या. रणजित देसाई यांचे जीवन तसे समृद्धच होते. त्यामुळे कितीतरी मोठ्या व्यक्तींचा त्यांना

सहवास लाभला होता. वसंतराव देशपांडे, यांच्यापासून बडे गुलाम अली खाँ, बाल गंधर्व ,कुमार गंधर्व यासारखे

नामवंत गायक, डॉक्टर राधाकृष्ण यांच्यासारखे तत्वज्ञ, फडके, खांडेकरांसारखे गुरु .राजाराम महाराज ते

शहाजी महाराज यांच्यापर्यंत अनेक संस्थानिक या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचा स्नेह ranjit desai रणजित देसाई

यांनी अखेरपर्यंत टिकवला होता. रणजित देसाई यांना सर्वजण दादा म्हणून ओळखत होते. त्यांनी 12 कादबंर्या,

16 कथासंग्रह, व 14 नाटके लिहिली.स्वामी,श्रीमान योगी राजा रविवर्मा ,राधेय ,बारी ,माझा गाव या कादंबर्या

लोकप्रिय झाल्या.रूपमहाल ,गंधाली,मधुमती ,मोरपंखी सावल्या हे कथासंग्रह ही तेवढेच लोकप्रिय झाले. रंगल्या

रात्री अशा ,नागीन,सवाल माझा ऐका या चित्रपट कथाही त्यांनी लिहिल्या.मराठी साहित्यात ranjit desai

रणजित देसाई यांनी अढळ स्थान निर्माण केले होते .रणजित देसाई यांच्या बरोबरच कोवाड या गावाचे नावही

महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचले होते.कोवाडचा राजा म्हणून ते प्रत्येकाच्या हृदयात होते. एक दिलदार उमदा

आणि पारदर्शी मनाचा मोठा लेखक कोवाडमधे घडला होता. विविध क्षेत्रातील नामवंत प्रतिभावंत अशा अनेक रंगांनी

दादांचे जीवन रससिद्ध बनले होते. विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मित्रांची मांदियाळी ही तर त्यांची खरी दौलत होती .

वाचकांना नवनवी प्रदेश खुले करूनही अभिनयाची जाणीवपूर्वक जोपासना करणारा हा असा सुसंस्कृत लेखक होता.

इतिहासाला अभ्यासाद्वारे नवा अर्थ देणारा खानदानी शैलीत जगणारा साहित्यावर विलक्षण प्रेम असणारा असा हा

लेखक होता 1973 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला होता. रणजित देसाई स्वामीकार म्हणूनच

मराठी मनात आणि घराघरात कायमचे जाऊन पोचले होते.

अशा या स्वामी कारांच्या प्रतिभा संपन्न, वैभव संपन्न ,साहित्यकाराला आज जन्मदिनानिमीत्त मानाचा मुजरा 

 

 

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: