Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

rama bai ambedkar – रमाई आंबेडकर विनम्र अभिवादन 

1 Mins read

rama bai ambedkar – रमाई आंबेडकर विनम्र अभिवादन 

 

rama bai ambedkar – रमाई आंबेडकर यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

 

रमाई म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली .डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना रमाबाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत

संसार संभाळला . डॉक्टर आंबेडकर यांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईने त्यांना खंबीर साथ दिल्यामुळे बाबासाहेबांना अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य

करता आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईने सोसलेल्या गरिबीच्या चटक्यांचा ,प्रसंगी आपल्या इच्छा- अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही.

रमाबाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब कुटुंबात झाला. रमा लहानपणापासूनच खूप समजदार,

प्रेमळ आणि घर कामात हुशार होत्या.

महापुरुषांचे व्यक्तिमत्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते .असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई किंवा

पत्नी असू शकते .बाबासाहेब आंबेडकरांना रमाईची साथ नसती तर कदाचित भिमाचे भिमराव झाले नसते. आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप

हालअपेष्टा, दुःख ,गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दुःख नाही .रमाईची मुले औषधाविना मरण पावली.

रमाईने अपार कष्ट केले.शेणाच्या गोवर्‍या थापल्या. त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्च केला.

एक काडीपेटी त्या महिनाभर चालवत.रमाईला शेजारच्या महिला दागिण्यांवरून चिडवित असत.तेव्हा रमाई म्हणत,’ माझा दागिना म्हणजे माझं कुंकू .

माझं सौभाग्य असे आहे की ज्याची ख्याती सार्या विश्वाला ठाऊक आहे.’

रमाईच्या सोशिक वृत्तीमुळेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर घडू शकले.डाॅ. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाबाईंना नेसायला लुगडे नव्हते.

तेव्हा बाबासाहेबांनाच मिळालेला फेटा लुगडे म्हणून त्यानी घातला. गरिबीची केवढी मोठी ही शोकांतिका. एक बॅरिस्टर आपल्या पत्नीला एक साडी

घेऊ शकत नव्हते. त्याच बाबासाहेबांमुळे आज आपण चांगले वस्त्र परिधान करीत आहोत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्यावाचण्यास शिकल्या. समाज जागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजन करू लागल्या.

भाषणे देऊन दलित चळवळीत सहभाग घेऊ लागल्या. रमाई आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरीबीचे चटके सोसत संसार सांभाळला.

अशा पददलितांच्या आई रमाईचे 27 मे 1935 रोजी वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी निधन झाले.

माता रमाई यांच्या जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन.

जन्म दिननिमित्त कोटी कोटी प्रणाम

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: