Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIA

queen – राणी दुर्गावती

1 Mins read

queen – राणी दुर्गावतिंना स्मृतिदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

   queen – राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ मधे राजा चंदेल यांच्या पोटी झाला.दुर्गावती या कालिंजर राज्याचे राजा कीर्तिसिंह चंदेल यांची एकुलती एक कन्या होत्या .

दुर्गाष्टमी दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव दुर्गा ठेवण्यात आले होते.अत्यंत हुशार, शोर्यशाली, साहसी आणि सुंदरते साठी queen – दुर्गावती प्रसिद्ध होत्या.

त्यांचे लग्न १५४२ मधे गोंडवन साम्राज्याचे राजा संग्रामशाह मडावी यांचा मुलगा दलपतसिंह यांच्या बरोबर झाला .दुर्गावती या भारत देशातली एक खूप मोठ्या विरांगणा होत्या.

      लग्नानंतर चारच वर्षात त्यांचे पती दलपतसिंह यांचे निधन झाले. त्यानंतर queen – दुर्गाबाईंनी राज्यकारभार हाती घेतला.राणी दुर्गावतीचा नावलौकिक निर्माण झाला व तिचे प्रभुत्व सिद्ध झाले.

queen – दुर्गावतीने राज्यात पर्यावरण संरक्षण व जोपासणीसाठी अनेक जागी बागबगीचे निर्माणाचे काम राणीच्या देखरेखीत करण्यात आले.

याशिवाय दळणवळण सुलभ करण्याकरिता रस्ते निर्माणाचे कार्य करण्यात आले, पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण करण्यासाठी विहिरी व कालवे सुध्दा तयार केले.

याशिवाय गरीब लोक व यात्रेकरूच्या सोयीकरिता राणीने राज्यात धर्मशाळा व मंदिर निर्माणाचे कार्य सुध्दा करवून घेतले.

      मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता,

ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे मांडलिकत्व पत्करले होते.

या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती .ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप हे नाव माहीतच आहे.

परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली. दुर्गावतीला कमजोर समजून गोंडवानावर आक्रमण करण्याची घोडचूक सुजातखानाने केली व त्यातच त्यांचा दारुण पराभव झाला.

या विजयामुळे राणी दुर्गावतीचा सगळीकडे नाव लौकिक निर्माण झाला.

या राणीचे नाव आहे “महाराणी queen दुर्गावती” !!

ती गोंड राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला.

गोंडवन राज्यावर मोगल सम्राट अकरबरा शिवाय बाज बहाद्दरने सुद्धा अनेकवेळा आक्रमण केले होते ,परंतु त्याला नेहमी अपयश आले. गोंडवना राज्यामध्ये धन संपत्तींची कमी नव्हती,

त्यामुळे यावर अकबर बादशहाचा या राज्यावर कायमच डोळा होता. त्यामध्ये एका राणीने प्रस्ताव धुडकावून लावल्याने अकबर जास्तच चिडला होता. आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत हे राज्य संपवायचे होते.

२३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली. या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते .

परंतु queen राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले.

queen राणीचेही मोठे नुकसान झाले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जून १५६४ रोजी पुन्हा मोगलांनी हल्ला चढवला परंतु यावेळी गोंडच्या सैन्याची वाताहात झाली, प्रचंड सैन्य मारले गेले.

queen – राणीला सुद्धा एक गोळी खांद्यावर आणि दुसरी डोळ्यावर असे दोन बाण लागले होते. अतिशय गंभीर जखमी अवस्थेत सुद्धा ती लढत होती पण ज्यावेळी लढणे असह्य झाले

त्यावेळी तिने तिचा सेनापती आधार सिंह याला हुकूम दिला की “मला मोगलांचा गुलाम बनायचं नाही, तू माझे डोके उडव आणि मला मारून टाक”…. पण हा राणीचा हुकूम आधारसिंहने मानला नाही, हे त्याच्यासाठी अशक्य होते.

शेवटी queen राणीने स्वतःजवळची कट्यार स्वता:च्या छातीत खुपसून घेवून स्वतःचा जीव दिला

       हे एक भयंकर युद्ध होते. एक स्त्री मोगलांशी एवढ्या जोमाने लढत आहे याचे आश्चर्य खुद्द बादशहा अकबराला सुद्धा झाले होते.

परंतु सैन्य संख्या मोगलांच्या तुलनेत फारच कमी असल्याने तिचा मोगलांच्या सैन्यापुढे टिकाव लागला नाही.

२४ जुन १५६४ मधे या queen राणीने आपली जीवन यात्रा संपवली.

        १९८३ मधे मध्यप्रदेश सरकारने queen राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपुर यूनिवर्सिटी चे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले.

२४ जून १९८८ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारत सरकारकडून एक पोस्टचा स्टँप काढून श्रद्धांजली वाहिली गेली.

दुर्गावती राणीच्या नावावरून नामकरण झालेली जबलपुर जंक्शन व जम्मूतावी दरम्यान धावणारी ट्रेन दुर्गावती एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे .जबलपूर जवळच दुर्गादेवीचा महाल ऊंच टेकडीवर आहे.

अशा या स्वाभिमानी, शूर व साहसी राणीला ह्या लढता लढता वीरमरण आले.या रणरागिनी विरांगनेचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीले गेले आहे.

स्त्री शक्तीचा तसेच भारतीय स्त्री च्या स्वाभिमानी व चारित्र्य संपन्न लढाऊ बाण्याचा परिचय आपल्याला queen – राणी दुर्गावातीच्या चरित्रातून होतो.

प्रसंगी अश्या नारीशक्तीने भारतीय चेतनेला केवळ बळच नाही तर एक उत्तुंग असा आदर्श सुध्दा दिला.

जो वारसा पिढी दर पिढीला नक्कीच भारतीय स्त्रियांना प्रेरणादायी ठरेल.

अशा या महान विरांगनेला आपला मानाचा मुजरा

           लेखन 

           डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs,

Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!