Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Pune Crime news – भाग तिसरा – जोशी अभ्यंकर खून खटला

1 Mins read

Pune Crime news – भाग तिसरा – जोशी अभ्यंकर खून खटला

Pune Crime news – ब्राम्हण समाजाला घाबरविण्यासाठी आणि पुणे सोडून जाण्यासाठी हे हत्याकांड

 

 

17/9/2021,

 

Also Read Part 2 –

https://www.postboxindia.com/pune-crime-news-pune-joshi-abhyankar-murder-case-part-2/

 

बाफना दरोडा प्रकरण : Pune Crime news

२० नोव्हेंबर १९७६ :- या दिवशी यशोमतीबाई बाफना यांच्या बंगल्यावर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. दरोडा घालणारे दोन तरुण होते.
पुण्याच्या स्वारगेट भागापासून कँपला जोडला जाणारा एक रस्ता आहे. त्याला शंकरशेट रस्ता म्हणतात. शंकरशेठ रस्त्यावर सर्वात मोठी वस्ती मीरा
हौसींग सोसायटीची आहे. या सोसायटीच्या समोर कै.कांतीलाल बाफना यांचा त्रिशला’ बंगला आहे. बंगल्याभोवती मोकळी जागा असून त्या भोवती
कंपाऊंडची पाच फुट उंच भिंत आहे. बंगल्यात गेल्यावर प्रवेशद्धार असून व्हरांड्या सारखी जागा आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रथम दिवाणखाना
लागतो, नंतर भोजनगृह आणि त्याच्या समोर स्वयंपाकघर. ‘त्रिशला’ बंगल्यात यशोमतीबाई बाप्पना, आशाबाईचा मुलगा नितीन,
यशोमतीबाईच्या बहिणीची’ ८ वर्षाची मुलगी रश्मी, आशाताई जैन यांचा ८ वर्षाचा भाऊ राजू असे एकत्र रहातात.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 1

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

२० नोव्हेंबर १९७६ रोजी बाफनां चा नोकर फरक हकीम बंगल्यातील कामे पहायला दुपारी दीड वाजता आला. बँकेच्या काही कामानिमित्त यशोमतीबाईच्या
सह्या घेऊन तो बँकेत गेला. पुन्हा पावणेसहा वाजता तो परत आला त्यावेळी आशाबाई, नितू, रश्मी बाहेर गेले होते. घरात यशोमतीबाईं, राजू, पवित्राबाई आणि
फरक होते.
सात वाजता फरक चहा प्यायला निघून गेल्यावर यशोमती बाईंनी दरवाजा बंद केला. फरक त्रिशला बंगल्यात परत आला तेव्हा बंगल्याचे गेट उघडे
असलेले फरुक हकीमला दिसले. बंगल्याच्या पश्चिमेच्या बाजूला त्याने आपली सायकल नेली. फरक सायकलवरून उतरत असतांना एक मनुष्य
धावत त्याच्याकडे हातात सुरा घेऊन आला व त्याचं पातं फरुकच्या गळ्याला भिडविले. तेव्हा भीतीने तो ‘बहेनजी’ म्हणून ओरडला-राजू बंगल्याच्या मागच्या
बाजूला व्हरांड्यात अभ्यास करीत होता. फरकचा आवाज ऐकून राजूने ओरडून विचारले, ‘क्या हुआ’? त्या माणसाने हकीमला बात मत करो’ असा
दम भरला. दूसरा मनुष्य पुढच्या दरवाजाने आत शिरला.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 9

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

या दोन व्यक्तींनी राजू व हकीमचे हात-पाय दोरीने बांधले, असा पोलीस रिपोर्ट आहे. त्यानंतर त्या चोरट्यांनी यशोमती बाफनाचे हात-पाय
बांधण्याचा प्रयत्न केला त्या जेव्हा बोलल्या ‘मी आजारी आहे, मला दुखापत करू नका’ तेव्हां त्यांनी त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या मागितल्या.

त्या चाव्या त्या बाईने दिल्यावर त्यापैकी एका चोराने कपाटे उघडून धन-दौलत चोरण्याचा प्रयत्न केला.
तळमजल्यावरील कपाटात काही न मिळाल्याने वरच्या मजल्यावरील कपाट उघडून पाहिले. काहीही हाती न लागल्यामुळे तो पुन्हा जिना उतरून खाली
आला. या अवधीत फारूक हकीम व राजूचा आरडा- ओरडा ऐवून बाहेरील काही माणसे धावत बंगल्याजवळ आली. त्यांना पाहून दोघेही चोरटे
गुन्हेगार कम्पाऊंडची भिंत ओलांडून मागील बाजूने पसार झाले.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 8

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

हा सारा प्रकार २० नोव्हेंबरला- म्हणजे जोशी कुटुंबाच्या सामुहीक खुनानंतर २० दिवसांनी धडला. हे-‘बाफना’ प्रकरण घडले-या बाफनांच्या घरातील
दरोड्याच्या प्रयत्नात कोणाचाही खून झाला नाही हे विशेषत्वाने नमूद करावयास हवे. तसेच फारशी जखम वा दुखापत कोणासही झाली नाही. यशोमतीबाई
बाफना यांनी पाच महिन्यानंतर गुन्हेगारांस अटक झाल्यावर जक्कल व दिलीप सुतार यांस पोलीस ठाण्यावर ओळख परेडमध्ये ओळखले होते
(Identified). घरात घुसणारे हेच दोन गुन्हेगार होते हे त्यामुळे सिध्द झाले. विशेष नमूद करायचे म्हणजे या गुन्हयात आरोपी नं. ३) शांताराम जगताप आणि
आरोपी नं. ४) मुन्नावर शहा हे दोधे सहभागी झाले नव्हते.
श्रीमती बाफनांच्या घरात कोणाचा खूनही झाला नाही फक्त राजेंद्र जक्कल व दिलीप सुतार या दोन आरोपींनीच या बाफनांचे घरामध्ये चोरी करण्याचा
प्रयत्न केला होता. तेव्हा प्रश्न असा आहे की, या चार आरोपींमध्ये या ‘बाफना प्रकरणी’ काही गुन्हा वगैरे करण्याचा कट होता का ? was there any criminal
Conspiracy among the four accused persons regarding the attempt at Robbery in Bafana House?
बाफनांच्या घरात घुसून चोरी करण्याचा कोणताही कट या चार आरोपींच्या मनात कधीही नव्हता. या प्रकरणी Criminal Conspiracy जर कोणामध्ये
होती, म्हणायचे, ते नं. १. जक्कल व नं. २. दिलीप सुतार या दोघांमध्येच होती. त्यामुळे या बाफना प्रकरणाचा सामूहीक जोशी व अभ्यंकर या कुटूंबाच्या
खुनाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. तसा संबंध जोडता येत नाही. आणि चारही आरोपींस या बाफना प्रकरणात जबाबदार धरणे चुकीचे आहे.

The Circumstance of attempt to commit robbery in Bafana’s house does not help the prosecution in establishing Criminal
conspiracy on the part of all the 4 accused persons. Because there was no such Cr. Conspiracy at all to commit robbery
in Bafana’s house.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 7

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

अभ्यंकर प्रकरण – Pune Crime news

:- १ डिसेंबर

अभ्यंकर कुटुंबात सामुहीक खून १९७६ ( शुल्क पक्ष-दशमी ) चे रात्री सुमारे ८ ते १० चे दरम्यान पुणे येथे भांडारकर रोड वरील कोप-यांवर
असलेल्या ‘ स्मुति ‘ बंगल्यात एकूण ५ व्यक्तिंचे खून झाले. तेही रक्ताचा एकही थेंब न सांडता. श्री.गजानन अभ्यंकर यांचे वडील काशिनाथ शास्त्री,

वृध्द आई इंदिराबाई, गजाननरावांचा पुत्र धनंजय व कन्या कुमारी जाई आणि मोलकरीण सखुबाई या पाच जणांचा सामुहीक खून झाला.

जोशी कुटुंबातील ३ व्यक्तींचे खून १ महिन्यापूर्वी ज्या प्रकारे झाले होते तोच प्रकार तसाच हल्ला अभ्यंकरांच्या घरांत १ डिसेंबर
१९७६ चे रात्री झाला. मारेक-यांनी एकही सूचक वस्तू (Clue) मागे ठेवली नव्हती. खून झाल्यानंतर घरांत व घराबाहेर अगदी विपुल प्रमाणात पुष्कळ सुगंधी
द्रव,अत्तर वगैरे शिंपडले होते. त्याचा दर्प दूरवर रस्त्याच्या बाहेर येत होता. या सुगंधी द्रवाचा सडा मारेक-यांनी शिंपला होता. तो पोलीसांच्या श्वान
पथकास चकवण्यासाठीच.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 6

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

१ डिसेंबर १९७६ चे रात्री ८ च्या सुमारास ‘श्री जी.के. अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नी सौ. हीराबाई हे दोघेजण त्यांच्या मित्राकडे जेवायला-डीनरसाठी गेले
होते. ते रात्रौ ११ च्या सुमारास घरी परत आले. तेव्हां घरांतील पांचही व्यक्ती त्यांना बेशुध्दावस्थेत पडलेल्या आढळल्या. कन्या जाई विवस्त्र अवस्थेत पडलेली
दिसली. डॉ. देशपांडे नावाच्या डॉक्टरने तपासल्यानंतर पाचही व्यक्ती मृत असल्याचे आढळून आले. वृत्तपत्रांमध्ये या घटनेविषयी जी बातमी आली
त्यात फक्त कांही दागिनेच चोरल्याचे वृत्त आहे. कपाटांतील डॉक्टर धनंजयचा ‘स्टेथोस्कोप’ जेथे होता तिथेच होता. त्यास मारेक-यांनी हातही लावला
नाही. तसेच देवघरांतील चांदीची सरस्वतीची मूर्ति त्यांनी चोरून नेली नाही. त्या मूर्ती भोवती मूठभर कुंकू टाकुन, जणू काही देवीची पूजा करण्यासाठी
नरबळी दिले, असा बहाणा ख-या मारेक-यांनी केला होता. जक्कल आणि मंडळींनी नव्हे. हे Multiple Murders सामूहीक खून आणि जोशी कुटुंबातील तीन व्यक्तींचे
खून शुक्लपक्ष दशमीसच झाले. या वरून हे कृत्य, हा हल्ला पूर्व नियोजित होता, हे नक्की, ही घटनाच इतकी विलक्षण व भयानक होती की, त्याने सारे पुणे
शहर हादरून गेले. एखादा भूकंप घडतांना जसा घबराट होतोतसा मोठा घबराट पुणे शहरात पसरला.
सारे पोलीस अधिकारी अवाक झाले.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 5

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

रक्ताचा एकही थेंब न सांडता ( ३+५ ) एकूण आठ व्यक्तींना खलास करणारे होते तरी कोण? काय कारण झाले या भीषण
हत्याकाडांस? इथे मला विशेष नमूद करायचे आहे

की, केवळ कांही दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूने हे हत्याकांड घडले नाही. या भीषण खूनांचे उद्विष्ट पुणेकर नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण करून त्यांना
विशेषतः ब्राह्मण मंडळीस पुणे शहर सोडून जाण्यास प्रवृत्त करावे ( inducing, forcing them to leave Poona ) हा उद्देश होता. केवळ दाग-दागिन्यांच्या चोरीसाठी
असे कर कृत्य होत नाही, असा पूर्व नियोजित हल्ला होत नाही.
दूसरी मुख्य गोष्ट नमुद करायची म्हणजे जोशी- अभ्यंकरांच्या ( multiple murders ) खुना नंतर सतत पाच महिने पोलीस पथकांचा सर्वत्र तपास चालू होता.
अनेक Taxi Drivers, ऑटो रिक्शावाले यांची अगदी कसून तपासणी घेण्यात आली. या अवधित एकही डोळस साक्षीदार Eye Witness फिर्यादी पक्षाला मिळाला
नाही. जोशी-अभ्यंकर सामूहीक खूनाची केस जेव्हां प्रथमत: जिल्हा न्यायाधिश ( District Judge ) श्री. वाईकर यांच्या कोर्टात उभी राहिली तेव्हां एकही डोळस
साक्षीदार ( Direct Evidence ) कोर्टापुढे ठेवता आला नाही. कारण या चौघा आरोपी पैकी कोणासही कोणीही जोशी किंवा अभ्यंकरांच्या घरात प्रवेश करतांना

पाहिलेले नव्हते. तत्सम कोण ताही पुरावा कोर्टापुढे आला नाही. केवळ परिस्थितिजन्य पुरावाच ( Circumstantial evidence ) कोर्टापुढे ठेवण्यात आला.
हा ( Circumstantial evidence ) म्हणजे एक वर्षापूर्वी झालेला प्रकाश हेगडे या युवकाचा खून, बाफनांच्या घरातील दरोड्याचा प्रयत्न आणि ४ महिन्यानंतर
घडलेला अनील गोखले या युवकाचा खून, अशा परिस्थितीत जिल्हा न्यायाधीश श्री. वाईकर यांनी चौघाही आरोपीवर Criminal Conspiracy इंडियन पीनल
कोड १२०- बी चा आरोप ठेवण्यास नकार दिला.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 4

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

तेव्हा फिर्यादी पक्षाने ( Prosecution ने ) हायकोर्ट मुंबई येथे धाव घेतली. म्हणजेच Revision Appl. क्रिमिनल रिव्हिजन अर्ज केला.

त्या अर्जाच्या सुनावणीचे वेळीही न्यायमूर्ती जस्टीस दिघे यांच्या कोर्टात कोणताही प्रत्यक्ष पुरावा ( Direct Evidence ) म्हणजे Eye witness ( डोळस
साक्षीदार ) फिर्यादी पक्षाला कोर्टापुढे ठेवता आला नाही.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 3

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 3

आरोपी नंबर ३ व ४ यांचे तर्फे पुण्याचे अय्यर – Pune Crime news

आरोपी नंबर ३ व ४ यांचे तर्फे पुण्याचे अय्यर वकील म्हणाले,

My Lord, There is nothing in the record to show that Jakkal and Sutar or Shantaram Jagtap and
Munnavar Shah entered Joshi’s house or Abhyankar’s House’.

तत्सम कोणताही पुरावा हायकोर्टात उपलब्ध नाही. असे असूनही फिर्यादी पक्ष हट्टास पेटल्यामुळे या चारही आरोपींवर

(Criminal Conspiracy Section 120- B…. I.P. Code) चा आरोप ठेवण्यांत आला. आणि जोशी-अभ्यंकर खून प्रकरण पुणे येथील सेशन्स
कोर्टाकडे पुन्हा पाठविण्यात आले. पुणे सेशन्स कोर्ट न्यायाधिश श्री. बापटांच्या कोर्टात साक्षी-पुरावे चालू झाल्यावर पुष्कळ दिवसानंतर पोलीसांनी एक बनावट
साक्षीदार उभा केला तो म्हणजे – स्कूटर, मोटर सायकल रिपेअरर नागेश कडपे, याने म्हणे चौघाही आरोपीस रात्री ९ वाजता मांडारकर रस्त्याजवळ
पाहिले होते. त्या पैकी नंबर (१) राजेन्द्र जक्कलने म्हणे या कडपे कडे सिगारेट पेटवण्यासाठी काड्याची पेटी माचीस’ मागितली, आणि काडी पेटवल्यावर
त्या काडीच्या प्रकाशात’ जक्कलचा चेहरा पाहिला होता म्हणे. ही लोणकढी थाप किती खोटी हे या पूर्वी वर उल्लेखिलेल्या हकिकती वरून स्पष्ट होते. कारण
सुरुवातीला श्री. वाईकरांच्या (कोर्टात) डिस्ट्रीक कोर्टात व नंतर हायकोर्ट मुंबई येथे रिव्हिजन अर्जाच्या वेळी हा कडपेचा पुरावा उपलब्धच नव्हता. (No Direct
Evidence) एकही प्रत्यक्ष पुरावा नाही असेच कथन – निवेदन कोर्टापुढे केले होते. आता अभ्यंकर कुटुंबातील सामूहीक खुना विषयी कोणता पुरावा कोर्टापुढे आला
ते पहा :-

अष्टेकर सराफाची साक्ष :- आरोपी नंबर १ राजेन्द्र जक्कलने म्हणे अष्टेकर सराफांस सोन्याची लगड विकली. ही सोन्याची लगड म्हणे जक्कलने
अभ्यंकराचे घरातील सोन्याचे दागिने चोरले होते ते दागिने वितळवुन ही लगड एकासोनाराने त्यास दिली होती. ती विकून रूपये ५५००/त्यास मिळाले होते.
असे संपूर्ण खोटे निवेदन अष्टेकर सराफाने केले. ते खोटे होते. कारण अशा प्रकारे जर आरोपी राजेन्द्र जक्कल त्यांचे दुकानी जाता व त्याने सोन्याची लगड
विकली असती तर तो ‘रंगे हाथ’ ( Red Handed ) पकडला गेला असता. तसे काही झाले नाही. अष्टेकर सराफ हे पुण्याचे प्रख्यात सोनार, त्यांचे सोन्याच्या

दागिन्याचे मोठे दुकान पुण्याच्या लक्ष्मी रोड वर भर वस्तीत आहे. त्या भरवस्तीत राजेंन्द्र जक्कल जाईलच कसा ? ज्या गांवात भयानक सामूहीक खून केले त्याच
गांवात अट्टल गुन्हेगार कधीही चोरीची वस्तू विकत नाहीत हे मानसशास्त्रीय सत्य आहे. खरी हकीकत ही आहे की,अष्टेकर सराफाच्या दुकानाची ही साक्ष
पोलीसांनी बनवलेली ( Concocted Story ) होती. जक्कल हा कॉलेज कुमार अष्टेकर सराफांच्या दुकानात सोन्याची लगड वगैरे विकण्यासाठी कधीही
गेला नव्हता. कारण अभ्यंकर कुटुंबातील पांच व्यक्तिंचे खून चोरी करण्याच्या हेतुने झाले नव्हते.

(The motive for the multiple murders was not theft of ornaments. )

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 2

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

साक्षी पुरावे : Pune Crime news

सराफांच्या घरची लग्न :-

कोर्टात जेव्हा सोनार-सराफ मंडळींच्या साक्षी झाल्या, तेव्हां त्यांना आरोपीच्या वकिलांनी काही प्रश्न खोदून विचारले.
पोलीस अधिका-यांनी अभ्यंकर घरांतील चोरीस गेलेल्या दागिन्यांची यादी पाठविली असतांना

आरोपीकडून दागिने कसे घेतले ?’ ‘अक्साईज अधिका-यांना लगडी विकत घेतल्याचं कळविलंत का ?’ या प्रश्नांना उत्तर देताना
सोनार थापा मारत की :-

‘हा व्यवहार सोने विक्रीचा नव्हता. ही घरच्यांसाठी केलेली खरेदी होती !’ – कन्या किंवा पुतणीच्या लग्नासाठी लगड खरेदी केली होती अशा बाता मारत.
या पुराव्यात महत्वाची बाब म्हणजे ते भयानक सामूहीक खून झाल्यानंतर पोलीस कमिशनरांनी सराफ संघटनेला एक परिपत्रक (Circular letter)
पाठविलं होतं व असे सूचित केले होते की, जो कोणी इसम सोन्याचा दागिना किंवा वस्तू, लगड वगैरे विकावयाला सोनाराच्या दुकानात येईल, त्याचे नांव
आणि पत्ता लिहून ठेवावे व ताबडतोब पोलीस स्टेशनवर माहिती द्यावी’ या पत्रकाप्रमाणे सोन्याची लगड विकत घेणारा (खरेदी करणारा) सोनार वा
सराफ त्या व्यक्तीची माहिती पोलीसांस कळवू शकला असता, आणि तो गुन्हेगार त्या दुकानातच ‘रंगे हाथ’ (Red handed) पकडला गेला असता. असे रंगे हाथ

Red handed कोणासही पकडले नाही. पोलीस ऑफिसरांस अशा प्रकारे कोणाही सोनाराने कळविले नाही. कारण सोनार-सराफांचा साक्षीपुरावा हा पूर्णपणे
‘बनावट/ खोटा’ होता. दूसरे कारण असे की, इतक्या सफाईदारपणे, रक्ताचा एकही थेंब न सांडता पाच व्यक्तींचे खून करून पळून जाणारे गुन्हेगार पुणे शहरातच, तेथील
कोणा सोनाराचे दुकानात पाऊल ठेवतील आणि चोरलेल्या दागिन्यांचे सोन्याची लगड पुण्यातच विकतील हे संभवत नाही, हे सर्वस्वी असंभवनीय
आहे. कारण अशा प्रकारच्या खुन्यांना आपण पकडले जाऊ, पोलीस आपल्या मागावर असतील, सोनाराच्या दुकानाच्या अवती-भोवती डिटेक्टीव्ह
पोलीस शिपाइ पाळतीवर असतील, अशी भीती सदैव मनात असते. तेव्हा, जक्कलने पुण्याच्या भरवस्तीत ‘अष्टेकर सराफ’ यांच्या
दुकानात सोन्याची लगड विकली ही निव्वळ लोणकढी थाप आहे. या परिस्थितीजन्य पुराव्याने (Circumstantial Evidence) पांच व्यक्तींचे खून सिध्द
होत नाहीत.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

क्रमशः

 

प्रभाकर प्रधान, वकील

शोध, प्रबंध लेखन - वैभव जगताप

Leave a Reply

error: Content is protected !!