Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRA

Pune Crime News – भाग चौथा – जोशी अभ्यंकर खून खटला

1 Mins read

Pune Crime News – भाग चौथा – जोशी अभ्यंकर खून खटला

Pune Crime News – भाग चौथा – जोशी अभ्यंकर खून खटला बनावट पुरावे आणि साक्ष , ते निरपराध होते ?

 

 

 

 

18/9/2021,

 

क्रमशः

Also Read Part 3 –

https://www.postboxindia.com/pune-crime-news-pune-joshi-abhyankar-murder-case-part-3/

 

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 1

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

कांही बनावट पुरावे : Pune Crime News

१. जोशी-अभ्यंकर कुटुंबातील सामूहीक खुनाविषयी ( Multiple Murders ) पुणे येथील डिस्ट्रीक्ट कोर्टात सुरुवातीस खटला चालू झाला तेव्हां एकही डोळस

साक्षीदार उपलब्ध नव्हता. तेव्हां नागेश कडपे, या स्कुटर रीपेअरर ची साक्ष ( चारही आरोपीस अभ्यंकरांच्या घराजवळ पाहिल्याचे कथन ) म्हणजे

(concocted story) होती. फिर्यादी पक्षाची बाजू मजबूत करण्यासाठी कोणालातरी पढवून कोर्टात उभे करायचे व आपल्याला हवा तसा पुरावा त्याच्या तोंडून वदवून

घ्यायचे या पोलीसी कारवाईचे दुसरे उदाहरण म्हणजे या नागेश कडपेची साक्ष, हा साक्षीपुरावा पुढे मुंबई हायकोर्ट येथे (Criminal Revision Application) ( रिव्हिजन

अर्जाचे वेळी ) त्या सुनावणीतही उपलब्ध नव्हता.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 2

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार

२. वर उल्लेखिलेले सामूहीक हत्याकांड झाल्यानंतर बरेच दिवसानंतर पुण्याच्या देशमुख वकिल यांस त्यांच्या पत्यावर आलेले एक धमकी देणारे पत्र :-

सेशन्स कोर्ट बापट पुणे यांचे कोर्टात जोशी-अभ्यंकर खूनाची केस चालू झाल्यानंतर फिर्यादी पक्षाने देशमुख वकिलामार्फत एक बनावट पत्र दाखल केले.हे “पत्र’

म्हणे राजेन्द्रजक्कल या प्रमुख आरोपीने श्री. देशमुख वकिलांस लिहिले होते. श्री. देशमुख हे पुण्याचे प्रख्यात फौजदारी वकिल आहेत. या देशमुखांनी ते भयानक

हत्याकांड झाल्यानंतर पुणे शहरात एक नागरीकांची सभा आयोजित केली होती. त्यांना लिहिलेल्या पत्रात आरोपी जक्कलने म्हणे असे लिहिले हाते की, ‘तुम्ही

कांहीही करा, आम्हांला जे करायचे ते आम्ही करूच, आणि मारू -ठार’ हा ठार शब्द दोन इंची मोठ्या अक्षरांत काढलेला होता. आता मुख्य मुद्दा असा आहे

की, पुण्याला डिस्ट्रीक्ट जज्ज श्री. वाईकर यांच्या कोर्टात सुरुवातीला जेव्हा ही केस उभी राहिली तेव्हां. आणि पुढे काही महिन्यानंतर मुंबई येथे उच्च

न्यायालयात रिव्हिजन अर्जाचे वेळी ते बनावट पत्र कोर्टापुढे ‘पुरावा’ म्हणून ठेवले नव्हते ते उपलब्ध नव्हते ते पत्र कोर्टाला त्यावेळी उपलब्ध होईलच कसे ? कारण

राजेंद्र जक्कल या कॉलेज कुमाराने अशा प्रकारचे पत्र कधीही लिहिले नव्हते. तसे पत्र लिहिण्याची त्याला कांहीही गरज नव्हती. पत्र लिहून त्याला काय

मिळणार ? पूर्णत: पूर्वनियोजित सामूहिक खून केल्यानंतर खरे अट्टल गुन्हेगार अशा प्रकारचे पत्र कोणाला लिहित नाहीत. ते मुळी खून झालेल्या

शहरामध्ये रहातच नाहीत. हत्याकांड झाल्यानंतर असे मारेकरी हजारो मैल दूर पळून जातात. आणि किमान एक वर्षभर त्या ठिकाणी परत येत नाहीत.धमकी देणारे

पत्र लिहिण्यासाठी त्यांना मुळी वेळच नसतो. तेव्हां, राजेंद्र जक्कल याने देखमुख वकिलांस वरील प्रमाणे धमकी देणारे पत्र लिहिले हा संपूर्ण खोटा पुरावा आहे.

खरी हकीकत ही आहे की एका पोलीस अधिका-याने कोणाकडून तरी जक्कलच्या हस्ताक्षराची नक्कल करून हे पत्र ( चिठ्ठी ) लिहून घेतली, आणि पोष्टात

नेऊन टाकली. नंतर Hand writing Expert ला ( हस्ताक्षर तज्ञास ) पढवून ती जक्कल याचीच चिठ्ठी होय, असा बहाणा केला. अशा प्रकारच्या परिस्थितीजन्य

पुराव्याने अभ्यंकर व जोशी कुटुंबातील सामूहीक खून (Multiple murders) सिध्द होत नाहीत. अभ्यंकर कुटुंबातील पांच व्यक्तींच्या सामुहीक

खूना विषयी मुख्य मुद्दा हा आहे की, एकाघरांत पांच जणांचे खून चारच व्यक्ती करू शकणारच नाहीत.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 3

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 3

कारण कुटुंबातील एका व्यक्तीवर हल्ला करतांना दुसरी व्यक्ती तिच्या मदतीला धावून जाणार, त्यांच्यात झटापट होणार. तो माणूस आरडा ओरडा

करून प्रवेशद्धारा जवळ धावत जाऊन मदतीसाठी मोठ्याने ओरडून घरा बाहेर ‘चोर-चोर’ अशी आरोळी ठोकत बाहेर पडू शकला असता. शेजारचे

लोक मदतीला धावुन आले असते. तसे कांहीच झाले नाही. शेजारच्या घरातील माणसांना मारेक-यांचा सुगावाही लागला नाही. यावरून हेच स्पष्ट होते की,

भांडारकर रोड वरील ‘स्मृती’ बंगल्यात रात्री ९ ते १० वाजता ८-१० मारेकरी घुसले असावेत. प्रत्येक खोलीत तीन इसम गेले असावेत. प्रत्येकांनी सुंदर

सुंदर, रंगी-बेरंगी चौकडीचे शर्ट घातले असावेत. आम्ही कोणत्या तरी बड्या कंपनीचे विक्रेते आहोत – सेल्स रीप्रेसेंटेटिव्हस् आहोत, असा बहाणा करुन

त्यांनी प्रत्येक खोलीत प्रवेश केला असावा. अभ्यंकर कुटुंबाचे श्री. काशिनाथ शास्त्री, त्यांच्या पत्नी इंदिराबाई, गजाननरावांचा पुत्र धनंजय ( २५ वर्षे )

त्याची बहिण जाई ( वय २२ वर्षे ) आणि मोलकरीण सखुबाई या प्रत्येकास झोपेची गुंगी आणणारे किंवा बेशुध्द पाडणारे दर्जेदार पेय पिण्यास दिले असावे.

त्या सर्वांस झोप लागल्यानंतर एकेका व्यक्तिवर हल्ला चढवून, गळा दाबून, रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांची हत्या झाली असावी. केवळ चारच इसमांचे हे

काम नव्हे. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप व मुन्नावर शहाया कॉलेज कुमारांचे हे कामच नव्हे.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 4

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

८-१० जणांच्या टोळीचे हे कृत्य होय. त्यापैकी दोघां जणांनी अत्तर, सुगंधी द्रव विपुल प्रमाणात शिंपडण्याचे काम केले असणार. त्या सुगंधी द्रव्याचा

घमघमाट दूरवर रस्त्याबाहेरही येत होता असे वृत्त आहे. या गँग मधील एका इसमाने बंद दारा जवळ उभे राहून ‘पहारेकरी’ चे काम बजावले असावे. तेव्हां वर

उल्लेखिलेल्या चार कॉलेज कुमारांनी अभ्यंकर कुटुंबातील पांच व्यक्तींचे खून केले, हा तर्क चूकीचा आहे. भांडारकर रोड, पुणे येथील ‘स्मृति’ बंगल्यात

घुसलेले मारेकरी वेगळेच होते. ते मुंबईहुन किंवा इतर शहरामधुन आलेले असू शकतील, ते कोण होते याचे विवेचन पुढील प्रकरणात करू.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 5

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

पढवलेले साक्षीदार (Tutored witnesses) Pune Crime News

सतीश किसन गोरे (वय २१ वर्षे)

 

सतीश गोरे हा आरोपी राजेंद्र जक्कलचा मित्र,

त्याचे निवेदन :- ‘मी पुणे येथे शिकण्यासाठी ७४-७५ मध्ये आलो. सन १९७५ व ७६ मध्ये राजेंद्र जक्कल आणि दिलीप सुतार हे माझे कॉलेजात वर्ग मित्र झाले.
(अभिनव कला विद्यालय पुणे)

‘जोशी कुटुंबाच्या हत्येनंतर ( एक महिन्यानंतर ) अभ्यंकर कुटुंबाचे हत्याकांड झाले. त्यावेळी मला या प्रकरणात जक्कल, जगताप व सुतार यांचा संबंध

असला पाहिजे असे वाटले परंतु एवढ्या हुशारीने त्यांनी खरोखरीच हे काम केले असेल, असा माझा विश्वास बसेना, अभ्यंकर हत्याकांडा नंतर २-३ दिवसांनी

जगताप माझेकडे आला तेव्हा मी त्याला अभ्यंकर कुटुंबातील माणसांचे खूना विषयी विचारले, तो मान खाली घालून विषय बदलु लागला. नंतर त्याने कबुल

केले व सांगितले की, अभ्यंकर कुटुंब त्यानेच मारले. सतीष गोरेचे हे निवेदन म्हणजे एक पोलीसांनी पढवून केलेले निवेदन होय, पोलीस ऑफिसर साक्षीदारांस

हवे तसे पढवितात, हे पुष्कळ वकिलांस माहित आहेच. पुणे शहरातील कर्तकाश्रमात एक खोली घेऊन हा सतीश गोरे रहात असे. त्याचे खोलीवर राजेंद्र

जक्कल आणि दिलीप सुतार आणि मंडळी अधुन मधुन जात असत. या माहितीचा फायदा घेऊन पोलीसांनी सतीश गोरेस पढवून त्याचे तोंडून पुरावा

वर्तविला तो असा :-

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 6

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

‘अभ्यंकर प्रकरणा नंतर काही दिवसांनी जक्कल, सुतार आणि मंडळी माझे खोलीवर – वर्तकाश्रमात आली. मी माडी वरून खाली आलो.

चौघांना पाहुन मी घाबरलो. जक्कल म्हणाला की, आपण हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊ, नंतर आम्ही बोलत-बोलत हॉटेल जवळ आलो. रस्त्याने जातांना

जक्कलने मला सांगितले की, जोशी-अभ्यंकर खून प्रकरणातील माणसे त्यानीच मारली व मला त्यांच्यामध्ये सामिल व्हायचे आहे काय ?

हा Hearsay Evidence कोर्टाला मान्य होऊ शकत नाही. ( It has no evidentiary value ).

दुसरे असे की, पूर्णतया पूर्वनियोजित सामुहिक खून करून पळून जाणारे अट्टल गुन्हेगार क्रिमिनल्स आपल्या गुन्ह्या विषयी कुठेही वाच्यता

करीत नाहीत, ते गुप्तता पाळतात, तेव्हां राजेंद्र जक्कल वरील जोशी-अभ्यंकर भयानक हत्याकांडा विषयी सतीश गोरे या मित्राला कांही बोलेल का?

तो त्याला तसे खून केल्याचे वगैरे काहीही बोलला नव्हता. पोलीसांनी पढवून पाठविल्यामुळे सतीष गोरे खोटे बोलला.

अभ्यंकर कुटुंबातील पांच व्यक्तिंचे खून राजेंद्र जक्कल आणि त्याचे तीन साक्षीदार यानी केले नाहीत. या Multiple murders चे सामुहिक खूनाचे

मारेकरी वेगळेच होते. ते कोण होते याचा विचार नंतर करु.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 7

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

सतीश गोरे :- १ डिसेंबरला पहाटे २।। ते ३ च्या सुमारास राजेंद्र जक्कल व दिलीप सुतार माझे घरी आले. नंतर राजेंद्रने मला झोपेतून उठविले व धाड

टाकल्याची बातमी त्याने सांगितली. त्या धाडीत २५,०००/- रुपये मिळाले व ५ जणांचे खून करावे लागले, असे जक्कलने मला सांगितले’.असे धादांत

खोटे निवेदन सतीश गोरेने कोर्टात केले, कारण त्यास पढवून पोलीस इन्स्पेक्टरने कोर्टात पाठविले होते,

अशा प्रकारचा Hearsay evidence ( ऐकीव पुरावा ) कोर्टात मान्य होत नाही. कारण It has no evidentiary value.

पहा- Indian Evidence Act-Section 24.

फिर्यादी पक्षास एक ही Approver माफीचा साक्षीदार या जोशी व अभ्यंकरांच्या सामुहीक खून प्रकरणांत मिळाला नाही.

चार आरोपींवर Third Degree Method ने मारहाण करून वेगवेगळी अमिषे दाखवून कोणी एक माफीचा साक्षीदार मिळतो का, हे पोलीस

अधिका-यांनी पाहिले असावे.

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 8

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

१. राजेंद्र जक्कल, २. दिलीप सुतार, ३. शांताराम जगताप व ४. मुन्नावर शहा यापैकी प्रत्येकावर Third Degree Method चे प्रयोग करून Approver माफीचा

साक्षीदार होण्यासाठी प्रयत्न केलाच असणार. अशा प्रकारचा साक्षीदार Confession करणारा कबुलीजबाब देणारा आरोपी कोर्टास हवा असतो. कोर्टास तो मान्य

होऊ शकतो. कारण त्या गुन्हयामध्ये तो प्रत्यक्ष सहभागी झालेला असतो. सामुहीक खूनामध्ये सहभागी झालेला एकही Approver माफीचा साक्षीदार

कोर्टास मिळाला नाही.

जो साक्षीदार उपलब्ध झाला तो हा सतीश गोरे. परंतु हा गोरे कोणत्याही खूनात सहभागी झालाच नव्हता. त्याला पूर्णत: पढवून कोर्टात उभे केले होते.

कारण तो ज्या वर्तकाश्रमात रहात असे, त्या वर्तकाश्रमात हे चार कॉलेजकुमार अधुन मधुन जात- येत असत. सतीश गोरेच्या खोलीत झोपत असत.

 

असंभाव्य गोष्टी : Pune Crime News

 

१. जोशी व अभ्यंकर यांचे घरात आणि घराभोवती अतिशय विपुल प्रमाणात शिंपडलेले अत्तर व  सुंगधी द्रव्य किमान रुपये ५,०००/-(रु.पाच

हजार) किंमतीचे असावे. इतका पैसा कॉलेज कुमार राजेंद्र जक्कल व दिलीप सुतार किंवा त्यांचे साथीदार शांताराम जगताप व मुन्नावर शहा यांच्याकडे नव्हता.

रू.५,०००/- ते आणणार कोठून ? इतके दर्जेदार सुगंधी द्रव्य विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा पैसा खास नव्हता.

२. रबरी मोज्यांची खरेदी : आपल्या बोटांचे ठसे कुठेही उमटू नयेत म्हणून मारेक-यांनी रबरी मौजे वापरले ( हातमोजे वापरले ) असा पोलीस रिपोर्ट आहे.

त्या संबंधी पोलीसांनी बनविलेली एक कथा (concocted story) :- आरोपी नंबर ३ शांताराम जगतापने म्हणे कुठच्याशा

केमिस्टच्या दुकानात एकूण दहा रबरी मोजे खरेदी केले. आता प्रश्न असा आहे की, फिर्यादी पक्षाच्या मते एकूण चारच मारेकरी होते. तर मग शांताराम

जगताप – आरोपी नंबर ३ हा एकूण दहा हात मोज्यांच्या जोड्या कशाला विकत घेतो ?

एका झोपडीत रहाणारा हा जातीने महार कॉलेज कुमार इतका श्रीमंत होता का ? अर्थात नव्हता.

त्याने खरेदी केलेल्या हात मोजांच्या पावतीवर ( कॅश मेमो वर ) ‘जॉन डिसोझा’ असे बनावट नांव लिहिले होते. असे खोटे नांव तो धारण करणार नाही,

तेव्हां हाही एक बनावट पुरावा दुकानदारास पढवून पोलीस ऑफिसरने बनवुनघेतलेला खोटा कॅश मेमो. अभ्यंकरांच्या घरांत पांच व्यक्तिंचे खून राजेंद्र

जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप व मुन्नावर शहा या चार कॉलेज कुमारांनी केले नाहीत. या चारही आरोपींचे अपील सुप्रिम कोर्ट नवी

दिल्ली, येथे दाखल झाल्यानंतर पुण्याच्या एका पब्लिशरने एक खोटे आणि खोडसाळ पुस्तक छापून प्रसिध्द केले. पुस्तकाचे नांव होते

‘येस आय एम गिल्टी ‘ लेखक : मुन्नावर शहा.

सुप्रिम कोर्टा समोर अपील आले असतांना वर उल्लेखिलेले पुस्तक छापून लोकांसमोर आणणे म्हणजे Contempt of Court कोर्टाची बेअब्रुच झाली म्हणायची.

या ‘पुस्तका’चे संबंधात माझे ( प्रस्तुत लेखकाचे ) एक निवेदन ( Commentary ) मी ‘लोकसत्ता’ संपादक विद्याधर गोखले यांस प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे

पाठविले. ते त्यांना पटले आणि दोन दिवसांनंतर दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये चौथ्या पानावर मध्यभागी ते माझे निवेदन प्रसिध्द झाले ते येणे प्रमाणे :-

मुन्नावर शहाच्या नांवाने ‘ येस आय एम गिल्टी ‘ नामक जे खोटे पुस्तक छापले गेले आहे त्या संदर्भात हे निवेदन :- मुन्नावर शहा हा आरोपी नंबर

४ जोशी-अभ्यंकर कुटुंबाचे खून आणि अनिल गोखले – खून संदर्भात सुरुवाती पासून हा तरुण आरोपी सर्वांत जास्त निरपराध मानला गेला.

जोश्यांच्या खूना विषयी त्याच्यावर कोणतेही आरोप पत्र नाही. पुणे येथे सेशन्स कोर्टात व मुंबई येथील उच्च न्यायालयात मुन्नावर शहाने आपण निर्दोष

असल्याचे स्पष्टपणे वर्तविले होते. अशा परिस्थितीत त्याचे ते तथाकथित पुस्तक रूपाने प्रसिध्द केलेले निवेदन खोटे आहे म्हणणे भाग आहे. कैदेत फाशीची

शिक्षा ज्याच्या डोक्यावर टांगत्या तलवारी प्रमाणे लटकली आहे. अहोरात्र जो चिंताग्रस्त आहे तो मुन्नावर शहा असे पुस्तक लिहू शकेल का ? सामूहिक

खूना विषयी पुस्तक लिहिण्याच्या मन:स्थितीत तो मुळीच असणार नाही. ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स’ यांनी पब्लिशर श्री. शरद गोगटे यांस

मुन्नावर शहास भेटण्याची परवानगी दिली नव्हती, असे वृत्त आहे. शरद गोगटे तर म्हणतात, ‘बेचाळीस वेळा’ शहा जवळ बसुन पुस्तक लिहून घेतले. येरवडा

येथील कारागृहामध्ये ( जेलमध्ये ) फाशीची शिक्षा झालेल्यांची व्यवस्था वेगळ्या दालनात असते. तिकडे

शरद गोगटे यांस बेचाळीस वेळा प्रवेश कोणीही देणे शक्य नाही. या पुस्तकाच्या ( येस आय एम गिल्टी ) जाहिरातीत म्हटले आहे की, ‘जक्कल मला

( मुन्नावरला ) म्हणाला – ‘जयंत गोखलेच्या डोळ्यांत मला मृत्यु दिसतो’. असे तो कुठेही म्हणाला नव्हता. कारण जयंत गोखले हा जक्कलचा मित्र

होता. जयंत गोखले, या व्यक्तिचा किंवा अनिल गोखलेच्या खूनाचा जोशी-अभ्यंकर कुटुंबाच्या खूनाशी काहीही संबंध नाही.

 

Pune Crime News - भाग पाचवा - माफीचा साक्षीदार 9

Pune Crime News – भाग पाचवा – माफीचा साक्षीदार 4

 

Also Visit : https://www.postboxindia.com

प्रभाकर प्रधान, वकील 
शोध, प्रबंध लेखन - वैभव जगताप

Leave a Reply

error: Content is protected !!