Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला

2 Mins read

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला

 

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला – सत्यमेव जयते

 

 

 

16/9/2021,

२. जोशी कुटुंब :

Pune crime news - joshi abhyankar murder case information

Pune crime news – joshi abhyankar murder case information

३१ ऑक्टोबर / १ नोव्हेंबर १९७६ ( तिथी: शुक्ल पक्ष दशमी ), टिळक रोड ला लागून असलेल्या विजयनगर कॉलनीत जोशी कुटूंबाचे
खुन :- pune crime news 

 

स्वत:च्या मालकीच्या घरात राहाणारे श्री. अच्युत जोशी, त्यांच्या पत्नी सौ. उषा जोशी आणि पुत्र आनंद जोशी यांची एकाच रात्री एकाच वेळी गळे

दाबून हत्या झाली. ते ही रक्ताचा एकही थेंब न सांडता. दैनिक लोकसत्ता व इतर वृत्तपत्रामध्ये या खुनाविषयी जी बातमी आली त्या मध्ये म्हटले होते की मारेक-यांनी

जोशींच्या घरातील कोणतीही वस्तु चोरून नेली नाही. त्यांच्या घरातील कपाटात असलेला दागिन्यांचा डबा, त्यास हल्लेखोरांनी हातही लावला नाही. तसेच

जोश्यांच्या घरातील देवघरात सरस्वतीची चांदीची मूर्ती होती, तिच्या भोवती मुठभर कुंकू टाकून मारेक-यांनी देवपूजेचा बहाणा (SHOW) केला होता.

Pune crime news - खून खटला

Pune crime news – खून खटला

क्रमश:

Also Read : Part 1 – https://www.postboxindia.com/pune-crime-news-pune-joshi-abhyankar-murder-case-part-1/

अन्नपूर्णा ( सरस्वतीची ) चांदीची व मूर्ती देवघरात होती तिथेच विराजमान होती. त्या मूर्तीस मारेक-यांनी हातही लावला नाही.

हे सर्व काम पूर्व नियोजित होते. त्याचा उद्देश चोरी करणे हा नव्हता. चोरी करण्याच्या हेतूने हे तीन खून झाले नव्हते, हे मी

विशेषत्वाने नमूद करीत आहे. पोलीसांच्या श्वान पथकास (कुत्र्यांना) चकविण्यासाठी जोशींच्या घरामध्ये हल्लेखोरांनी विपूल प्रमाणात सुगंधी द्रव,

अत्तर वगैरेचा सडा शिंपला होता. त्याचा घमघमाट – दर्प दूरवर येत होता. असे वृत्त आहे.

Pune crime news - जोशी अभ्यंकर खून खटला संपूर्ण माहिती

Pune crime news – जोशी अभ्यंकर खून खटला संपूर्ण माहिती

 

विशेष नमूद करावयाची बाब म्हणजे फिर्यादी पक्षाने या जोशी कुटुंबातील तीन व्यक्तींच्या खुनाचा आरोप

(१)राजेंद्र जक्कल आणि (२) दिलीप सुतार या दोघांवरच ठेवला. या दोन कॉलेज युवकांवरच जोशी कुटुंबाच्या

खुनाचा आरोप ठेवला गेला. आरोपी नंबर (३) शांताराम जगताप आणि आरोपी नंबर (४) मुन्नावर शहा यांजवर या जोशीकुटुंबाच्या खुना संबंधी कसलेही

आरोपपत्र (Charge-Sheet) ठेवले नाही, की दिले नाही. आरोपी नंबर ३ व ४ यांजवर जोशी कुटुंबाच्या खुनासंबंधी आरोपही न ठेवता त्यांना कोर्टाने दोषी

ठरविले. फिर्यादी पक्षाच्या मते जक्कल आणि सुतार या दोघांनीच जोशी कुटुंबातील तीन व्यक्तींचे खून केले असावेत, हा तर्क कसा चुकीचा होता. किती

विपर्यस्त होता हे यापुढे केलेल्या विवेचनावरून समजून येईल. ( pune crime news )

Pune crime news - जोशी अभ्यंकर खून खटला

Pune crime news – जोशी अभ्यंकर खून खटला

 

या जोशी कुटूंबातील तीन व्यक्तींचे खुनासंबंधी कोणता पुरावा कोर्टापुढे आला ते पहा :-

 

अ) आरोपी नंबर १, राजेंद्र जक्कल याच्या वडिलांचे मालकीचे एक लाकडी दुकान ( टपरी ) एरंडवणे भागात होते. या टपरीत म्हणे जोशांच्या घरांतील एक

इलेक्ट्रीसिटी चे बील सापडले. त्या बिलात जोशांच्या घरातील बेदाणे, सुका मेवा, सुकी द्राक्षे आढळली. पोलीसांचे म्हणणे असे की,जोशी मंडळीच्या घरातील

एक इलेक्ट्रीक कंपनीच्या बिलामध्ये जक्कल याने बेदाणा, सुकी द्राक्षे ठेवून ती पुडी आपल्या टपरीत ठेवली होती. ( अहो पुणे-पोलीस, बाता मारण्यांत हुषार

आहांत की ! ) आता असे पहा की, जोशी कुटुंबाचे खून होऊन ६ महिने झाले होते. 31 ऑक्टोबर १९७६ ते एप्रिल १९७७ एवढा कालावधी लोटला होता. ६

महिन्यानंतर राजेन्द्र जक्कल यांस अटक झाली होती.

Pune crime news - भाग दुसरा - जोशी अभ्यंकर खून खटला information

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला information

 

वर उलेखिलेल्या ‘टपरी’ चा शोध पोलीसांस सहा महिन्यानंतर लागला होता. तेव्हा प्रश्न असा आहे की, ते इलेक्ट्रीक कंपनीचे बिल त्या बेदाण्यां सह तिकडे

टपरीत ६ महिने पर्यंत कसे पडून राहील ? इतक्या कालावधीत त्या सुक्या द्राक्षांवर लाल मुग्यांनी हल्ला चढवून ती कधीच फस्त ( नाहीशी ) केली असती. दुसरे

असे की राजेन्द्र जक्कल आरोपी नं.१ ते बील आपल्या टपरीत नेईलच कशाला ? असले चिटोर सुक्या मेव्यासह त्या टपरीत तो नेणारच नाही. खरी

हकीकत ही आहे की, जोशांच्या घरांत बरणीत सुका मेवा होता, त्यातील काही द्राक्षे पोलीस कॉन्स्टेबलने काढून जोशांच्या घरांतील एका इलेक्ट्रीसिटीचे बिलांत

बांधून त्या द्राक्षांसह ते बिल पोलीसांनी टपरीत नेऊन ठेवले. (Planted) कारण टपरीची चावी पोलीसांच्या ताब्यात आली होती. राजेन्द्र जक्कल यास जोशी

कुटुंबाच्या खुनामध्ये गोवण्यासाठी पोलीसांनी ही युक्ती केली ( दुसरे कोणी मारेकरी सापडत नाहीत, तर ढकला या जक्कलला या गुन्हयामध्ये. ) जक्कलच्या टपरीत

जोशीच्या घरांतील (Electricity Bill) एक बील सापडले ही फिर्यादी पक्षाने मारलेली लोणकढी थाप होय. हा पुरावा ग्राह्य मानता येत नाही. ( It has no evidentiary
value ).

Pune crime news - भाग दुसरा - जोशी अभ्यंकर खून खटला माहिती

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला माहिती

ब) दुसरा पुरावा कोर्टापुढे मांडला गेला तो असा की, जोशांच्या देव घरांतील सरस्वतीची चांदीची मूर्ती दिलीप सुतार याचे घरी सापडली. हा आणखी एक बनावट

पुरावा. कारण वर मी नमूद केले आहे की, श्रीयुता जोशी यांच्या कुटुंबाची हत्या म्हणजे सामुहिक खून झाल्यानंतर वृत्त पत्रामध्ये जी बातमी आली होती,

त्यात म्हटले होते की, जोशांच्या घरांत कोणतीही चोरी झाली नाही. सरस्वतीची चांदीची मूर्ती देवघरांत जिथे होती तिथेच होती. तिथून ती कोणी ही हलविली नव्हती.

जोशांच्या कपाटातील दागिन्यांचा डबा त्याला मारेक-यांनी हात ही लावला नव्हता. तेव्हा चांदीची सरस्वतीची मूर्ती दिलीप सुतारने चोरून नेली व

आपल्या घरी ठेवली ही निव्वळ थाप आहे.

Pune crime news - भाग दुसरा - जोशी अभ्यंकर खून खटला

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला

दुसरे असे की तसे कांही त्यांने केले असते तर..’ ही चोरीची वस्तू, आपल्या घरी नको ‘ असे म्हणून दिलीप सुतारला

ती विकून टाकता आली असती, व १०- २० रुपये मिळवता आले असते. जोशी कुटुंबियांचे खून होऊन सहा महिने झाले होते. इतक्या

कालावधी नंतर जक्कल व सुतार यांस अटक झाली होती. त्यामुळे या सहा महिन्यांच्या काळांत ती चांदीची सरस्वती (अन्नपूर्णा) दिलीपला घराबाहेर नेऊन

त्याला केव्हांच हस्तांतर करता आली असती. आता मुख्य मुद्दा असा आहे की, एका कुटुंबातील तीन जणांचे खून दोन व्यक्ति करूच शकणार नाहीत.

..

फिर्यादी पक्षाच्या मते जक्कल व सुतार या दोघांचेच हे कृत्य या दोन कॉलेज कुमारांवरच जोशी – कुटुंबाचे हत्येचा आरोप. परंतु कुटुंबातील

एका व्यक्तिवर हल्ला करतांना दुसरी व्यक्ति तिच्या मदतीला धावून जाणार. त्यांच्यात झटापट होणार, तो आरडा-ओरडा करणार, अच्युत जोशी किंवा

त्यांचा मुलगा आनंद जोशी हा प्रवेश द्वाराजवळ धावत जाऊन मदतीसाठी मोठ्याने ओरडून घराबाहेर चोर-चोर ‘अशी आरोळी ठोकत बाहेर पडू शकला

असता-शेजारचे लोक मदतीला धावून आले असते. आणि जक्कल किंवा सुतार यांस ‘रंगेहात पकडता आले असते. तसे कांहीच झाले नाही. याचाच अर्थ

हा की जोशांच्या घरांत रात्री दहा-अकरा वाजण्याचे सुमारास ८-९ जण घुसले असावेत. प्रत्येक खोलीत तिघे इसम गेले असावेत’. आम्ही कोणी तरी बड्या

कंपनीचे प्रतिनिधी ( Sales Representatives ) आहोत. असा बहाणा करून त्यांनी प्रत्येक खोलीत प्रवेश केला असावा, आणि नंतर एकेका व्यक्तिवर हल्ला चढवून

रक्ताचा एकही थेंब न सांडता गळे दाबून त्यांचे खून झाले असावेत. जोशांच्या कुटुंबातील तीन जणांस झोपेची गुंगी आणणारे किंवा बेशुध्द करणारे पेय ही

पिण्यास दिले असणार. त्यांना झोप लागल्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढविला असावा. दोनच इसमांचे हे काम नव्हे. ८-९ जणांच्या टोळी पैकी दोन जणांनी

अत्तरे / सुवासीक द्रव यांचा सडा शिंपण्याचे काम केले असावे, या टोळीपैकी एक जण बंद दारा जवळ उभा राहून पहारेकरी’चे काम त्यांने केले असावे.

(कोणी एक ‘पुढारी’ अशा प्रकारच्या खुनांमध्ये असावाच लागतो.)

तेव्हा जक्कल व सुतार या जोडीने जोशी कुटुंबाचे खून केले हा तर्क चुकीचा आहे. ( pune crime news )

Pune crime news - भाग दुसरा - जोशी अभ्यंकर खून

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून

आता कायद्याचे काही मुद्दे :

 

जोशी-अभ्यंकरांच्या सामूहीक खुनाची केस (खटला) जेव्हां प्रथमत: पुणे येथील (जिल्हा न्यायाधिश) श्री. वाईकर यांच्या कोर्टात चालू झाली

तेव्हां फिर्यादी पक्षाकडे कोणताही प्रत्यक्ष पुरावा (Direct evidence) उपलब्ध नव्हता. याचा अर्थ फिर्यादी पक्षास एकही डोळस साक्षीदार मिळाला नाही. केवळ

परिस्थितीजन्य पुरावाच, (Circumstantial evidence) कोर्टापुढे मांडण्यांत आला.. अशा परिस्थितीत जिल्हा न्यायाधिश श्री. वाईकर यांनी चार आरोपींवर

जक्कल, सुतार, जगताप व मुन्नावर शहा यांजवर Criminal Conspiracy खुनाचा कट करणे, कलम १२०- बी Indian Penal Code चा आरोप ठेवण्यास नकार दिला.

तेव्हां फिर्यादी पक्षाने मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली. म्हणजेच (Criminal Revision Application) केला. हायकोर्ट, मुंबई येथे न्यायमूर्ती श्री. दिघे यांचे कोर्टात

हा रीव्हीजन अर्ज सुनावणीस आला. त्या वेळी ही फिर्यादी पक्षाला कोणताही प्रत्यक्ष पुरावा Direct Evidence कोर्टापुढे ठेवता आला नाही.

आरोपी नंबर ३ चे वकील पुण्याचे श्री. अय्यर वकील म्हणाले’

 

‘My Lord, there is nothing in the record to show that they entered Joshi’s house or Abhyankar’s House’.

( Jakkal and Sutar )

 

म्हणजेच काय, जोशी किंवा अभ्यंकर यांच्या घरांत प्रवेश करतांना जक्कल व सुतार किंवा जगताप व मुन्नावर शहा यांस कोणीही केव्हाही पाहिलेले नव्हते.

तत्सम कोणताही पुरावा फिर्यादी पक्षास उपलब्ध झाला नाही. एकही डोळस साक्षीदार मिळाला नाही असे असूनही फिर्यादी पक्ष हट्टास पेटल्यामुळे या चौघांही

कॉलेज कुमारांवर (Criminal Conspiracy – Sec. 120-B) हा चार्ज म्हणजे आरोप हायकोर्टाने ठेवला, आणि जोशी-अभ्यंकरांची केस पुणे येथे सेशन्स कोर्टामध्ये

पुन्हा रवाना झाली. वास्तविक पहाता जिल्हा न्यायाधिश वाईकर यांचे म्हणणे होते की, पुरावा अपूरा असल्याने प्रकाश हेगडे, अनिल गोखले, बाफना व

काशीद कुटुंब आणि जोशी व अभ्यंकर सामूहीक खून प्रकरण हे खटले वेगवेगळ्या कोर्टात चालावेत. परंतु मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण

सहा खटले एकत्रित स्वरुपात पुणे येथे सेशन्स जज्ज श्री. बापट यांच्या कोर्टात चालू झाले. पुणे सेशन्स कोर्टात हे काम चालू असतांना मी ही

अधून-मधून उपस्थित रहात होतो.

 

पुण्याचे पोलीस ऑफिसर व इतर नागरिकांचे साक्षी-पुरावे झाल्यानंतर एक डॉक्टर डॉ. परांजपे, साक्षीदारांच्या पिंज-यात उभे राहिले.

 

हे डॉ. परांजपे काय सांगतात ऐका :-

 

३१ ऑक्टोबर १९७६ चे रात्री माझी मोटार गाडी अच्युतराव जोशी यांचे घराजवळून जात होती तेव्हां मला जोशांच्या घराच्या फाटकातून बाहेर पडतांना

दिलीप सुतार दिसला. डॉ. परांजपे एवढेच बोलले यांना कोण दिसला ? दिलीप सुतार दिसला. कुठे ?

जोशांच्या घरांतून बाहेर पडतांना. प्रवेश करतांना नव्हे. ‘या दिलीप सुतारच्या हातात मी बँग पाहिली’, किंवा ‘मोठा जाडा दोरखंड पाहिला’ असं काहीही ते म्हणाले

नाहीत किंवा ‘दिलीप सुतारच्या बरोबर मी जक्कल सारखा उंच शरीराचा एक युवक पाहिला’ असं काही ते म्हणत नाहीत. हे डॉ. परांजपे, म्हणे १५ वर्षापूर्वी

दिलीप सुतारच्या शाळेत होते. तो त्यांच्या वर्गात होता. किंवा ते त्याच्या वर्गात होते, असे कांही ते म्हणत नाहीत. त्यांच्या शाळेत कुठे तरी तो होता. आता १५

वर्षानंतर या डॉ. परांजपेनी दिलीप सुतारला कसे काय, ओळखले, याचा तर्क वाचकांनीच करावा. कोणाला तरी पढवून आपल्याला हवा तसा पुरावा बनवून घेणे

या पोलीसी कारवाईचा एक उत्तम नमूना म्हणजे या डॉ. परांजपेंची साक्ष. आता असे पहा की, जिल्हा न्यायाधीश श्री. वाईकर, व नंतर मुंबई येथे उच्च

न्यायालयांत Criminal Revision Application च्या सुनावणीचे वेळी फिर्यादी पक्षातर्फे, ‘एकही डोळस साक्षीदार उपलब्ध नाही’ No direct evidence available

असे कथन केले असतांना हे डॉ. परांजपे, कोर्टासमोर उभे राहून ‘मी दिलीप सुतारला, जोशांच्या घराजवळ फाटका बाहेर पडताना पाहिले”

असे कसे म्हणतात ? त्यांचा हा पुरावा साफ खोटा आहे. पोलीसांनी पढवून आणलेला हा बनावट पुरावा. ( It has no evidentiary value ) जोशी कुटुंबातील

तिघांचे खून त्याने सिध्द होत नाहीतच. शिवाय ‘रात्रीची घरफोडी’ ( House breaking by night in Joshi’s House Sec. 456 ) कलम ४५६ इंडियन पिनल कोड हा

आरोपही या निवेदनाने सिध्द होत नाही.

 

Pune crime news - भाग दुसरा - जोशी अभ्यंकर खून खटला जीवनपट

Pune crime news – भाग दुसरा – जोशी अभ्यंकर खून खटला जीवनपट

जोशी कुटुंबातील तीन व्यक्तींचे खून जक्कल व सुतार या जोडीने केले नाहीत. त्यांचे मारेकरी वेगळेच होते ते कोण होते

याचे विवेचन पुढील प्रकरणांत करु.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

प्रभाकर प्रधान,वकील 

शोध,प्रबंध लेखन - वैभव जगताप

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!