Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

pu la deshpande books pdf – गोळाबेरीज – P. l Deshpande

1 Mins read

pu la deshpande books pdf – गोळाबेरीज – P. l Deshpande

pu la deshpande books pdf – गोळाबेरीज – P. l Deshpande

 

 

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्वाचे एक पुस्तक १९६० साली श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले
त्यावेळच्या नव इतिहासकारांना आपल्या खेळकर शैलीत पुलंनी लाजवाब चिमटे काढलेत.

पण आज साठ वर्षांनी त्या नव इतिहास कारांची पिल्लावळ नुसतीच फोफावली नाहीये तर विचार न करता माना डोलवणाऱ्या लोकांमुळे सत्य म्हणून प्रस्थापित होत आहे

फक्त काही मासले बघा , मूळ पुस्तक तर वाचलच पाहिजे

जे दिसेल ते बदलायचे हा बाळ जनार्दनाचा आग्रह असे.
आपले नाव त्याने नित्य बदलले
लहान मुले विट्टी दांडू खेळताना (त्या दिवशी त्याचे नाव जनता-जनार्दन होते) तो दांडू विट्टी खेळत असे
हुतुतू ला तुतुहू म्हणत असे.
खोखोतला दुसरा खो आधी म्हणून त्या खेळाचे नाव पण खो$खो असे बदलण्याचे कार्य त्याने केले.

ज्यामुळे त्याचे नाव अजरामर झाले ते म्हणजे वाल्मिकी नावाच्या कवीच्या रामायणाला त्याने दिलेले नवे रूप.

जंगलात रामाने आश्रम बांधला,शेतीचे नवे प्रयोग सुरू केले.वन्य जमातींचा उद्धार केला.त्याचवेळी शूर्पणखा नावाची स्त्री आश्रम पहायला आली आणि सीतेकडे पाहून सारखे नाक मुरडू लागली

सुरवातीला बऱ्याच मंडळींचा समज हिच्या मनात सीतेची अवहेलना करून रामाला मोहीत करणे आहे असा झाला. परंतु तिला काहीतरी नाकाची व्याधी आहे हे समजून रामाने तसे लक्ष्मणाला सांगितले.

परीक्षेनंतर तिच्या नाकाचे हाड वाढले आहे असे लक्ष्मणाने निदान करून तिच्या नाकावर शस्त्रक्रिया केली.
दुर्दैवाने जंगलात सर्व साधने नसल्यामुळे हाड कापल्यावर नाक जोडण्यासाठी आवश्यक आयुधे नव्हती त्यामुळे हाडा बरोबर नाक गमावून शूर्पणखा परतली.

शस्त्रक्रियेत आयत्यावेळी काय होईल ते सांगणे अवघड आहे.

Also Visit :https://www.postboxlive.com

मारीचाची कांचामृगछाप कापड अशी आरोळी सीतेने ऐकली
(हा महा रिच म्हणजे अति श्रीमंत व्यापारी होता असे सुप्रसिद्ध सिंहली संशोधक चिचुंदरनायके ह्यांचे मत आहे)
फेरीवाल्याची हाक आली की त्याला दारात बोलवायचे ह्या स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे सीतेने आपल्या यजमानांना त्याला बोलावण्यास सांगितले.
रामचंद्रांनी एक युक्ती केली.बाणाच्या टोकाला आपल्या आश्रमाचा पत्ता लिहून त्याने तो बाण हवेत सोडला.
हेतू हा की बाण मारीचाहून वेगाने जाऊन त्याच्यापुढे वाटेवर पडेल परंतु चुकून तो बाण मारीचास लागला व तो मेला.

स्मित हास्यापासून खळखळून हसण्याचा आनंद देणारे
असंख्य कोट्यांनी समृद्ध.

एकदा तरी वाचाच
पुस्तक: गोळाबेरीज
लेख: जाल्मीकीचे_लोकरामायण
लेखक: पुलं
श्रीविद्या प्रकाशन

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: