Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

pandit jawaharlal nehru speech – पंडित जवाहरलाल नेहरू

1 Mins read

pandit jawaharlal nehru speech – पंडित जवाहरलाल नेहरू

 

pandit jawaharlal nehru speech – पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनम्र अभिवादन 

 

 

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी मोतीलालजी आणि स्वरूपराणी यांच्या पोटी झाला. आणि गुप्त असणारी सरस्वती प्रकट झाली .

पंडितजी बुद्धिमान ,धनवान, रूपवान ,कीर्तिमान असे कायदेपंडित होते .बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यातील व्दैत दूर व्हावे म्हणून नियतीने नेहरू नावाचे व्यक्तिमत्त्व घडवले.

नेहरू हे वृत्तीने राजकारणी नव्हते .विवेकी, भावनावश ,व्यासंगी, तत्वनिष्ठ, एकांतप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

महात्मा गांधीनी नेहरूंना आपला वारसदार मानले होते. नेहरू जन्माने एका ऐश्वर्यसंपन्न आणि श्रीमंत पित्याचे वारसदार होते. पण आचारविचाराने ते एका निष्कांचन

आणि अपरिग्रह व्रताचा अनुसार करणाऱ्या यतीचे वारसदार होते. नेहरूंनी आपला वसा आणि वारसा दिला तो दिनांक 19 नोव्हेंबर 1917 या दिवशी जन्माला आलेल्या आपल्या इंदिरेच्या हाती.

नेहरू हे काँग्रेसचे आधारस्तंभ होते .1929 मध्ये वयाच्या चाळीसाव्या वर्षी रावी तीरावर भरलेल्या लाहोर काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. pandit jawaharlal nehru speech

पंडितजी हे काँग्रेस पक्षाचे प्रबोधनकार होते ,राष्ट्राचे शिल्पकार होते .संपूर्ण स्वातंत्र्य हा त्यांचा ध्यास होता.1935 मध्ये कमला नेहरू कालवश झाल्या .तेव्हापासून पुढची

अनेक वर्षे नेहरूंनी पोरकेपण अनुभवले.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून 17 वर्षे नेहरूंनी कारभार पाहिला .भाक्रा -नांनगल, दामोदर व्हॅली यासारखी प्रचंड धरणे बांधून

विज्ञानयुगातील तीर्थस्थाने नेहरूंनी निर्माण केली. प्रांताप्रांतात असणारी कोयनेसारखी धरणे आणि जलसागर आणि उद्यमशीलतेचे विणलेले जाळे हे केवळ त्यांचेच कर्तृव आहे.

नेहरूंच्या वाट्याला अनेकदा तुरूंगवास आला .त्यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग कारावासाने व्यापला. कारागृह ही नेहरूंची अभ्यासिका होती.

त्यांचे अनेक मौलिक ग्रंथ कारागृहात लिहिले गेले .

नेहरूंना खुप चालायचे होते, दूर जावयाचे होते. ते जीवनाचे यात्रिक होते. त्यांना थांबायला वेळ नव्हता. अनेक कामे अपुरी होती. कितीतरी संकल्प आणि प्रकल्प

त्यांच्या आज्ञेची प्रतीक्षा करीत होते; पण काळाला त्यांची कणव आली. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे हे काळाने जाणले .कर्मयोग याला विश्रांतीची गरज आहे हे

ओळखून कालपुरूषाने त्यांना चिरंतनाच्या कुटीरात दाखल करून घेतले.हा दिवस होता दिनांक 27मे 19 64 दुपारी दोनच्या सुमारास पंडितजी अनंतात विलीन झाले.

समय होता दुपारी दोन वाजण्याचा. आकाशवाणीवरून शोक संगीत सुरू झाले. लोक स्तब्ध झाले. ज्याने त्याने जीवाचे कान केले. काय झाले? कोण गेले ?

आसमंतात शब्द निनादले..’नेहरू- नेहरू’ सारे राष्ट्र खिन्न झाले .हतबद्द झाले.नियतिचे भान हरपले. भर दुपारी ती ओरडली: ‘अरे !सूर्यास्त झाला !’

भारतमय झालेले हे नेहरू भरतवर्षाचे जीवनस्वप्न होते.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: