Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Pandemic अकलेची महामारी संपली का ? – ज्ञानेश महाराव

1 Mins read

Pandemic ‘राज्य सरकार’ने ‘कोरोना’ प्रतिबंधक उपायांसाठी अत्यावश्यक केलेला ‘मास्क’ सरकारी पत्रकाद्वारे हटवला आहे.

देशातल्या अन्य राज्यांनी ‘कोरोना’ Pandemic महामारी रोखण्यासाठी घातलेले सर्व निर्बंध मागे घेतलेत.

‘केंद्र सरकार’ने आंतरराष्ट्रीय विमान सेवा लवकरच पूर्ववत करण्याचं जाहीर केलंय. ह्या Pandemic महामारीने अवघ्या मानवी व्यवहारांना दोन वर्ष आपल्या कब्जात कोंडून ठेवलं होतं.

यापूर्वी कोणत्याही साथीने वा Pandemic महामारीने इतक्या व्यापक प्रमाणात त्रास दिला नव्हता. दोन वर्ष ‘कोरोना’ग्रस्तांचे आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूंचे आकडे ऐकण्या-वाचण्यात गेली.

आता शहरात-जिल्ह्यात ‘एकही नवा कोरोना रुग्ण नाही!’ अशा बातम्या लोकांना आनंद, हिंमत देत आहे. त्याच वेळी चीन- हाँगकाँगमध्ये ‘कोरोना’ने पुन्हा Pandemic थैमान घालायला सुरुवात केलीय.

”ओमिक्रॉन BA.2′ पेक्षा अधिक संक्रामक असलेल्या ‘व्हेरियंट XE’ बाबत WHOने चिंता व्यक्त केली,” अशा भीतिदायक बातम्याही येत आहेत. ‘कोरोना’चा फैलाव जगभर अफाट वेगाने झाला.

लसीकरण आणि तीन-चार लाटांनंतर तो आटोक्यात आला असला, तरी त्याचा धोका पूर्णतः संपलेला नाही. त्यामुळे भीती प्रमाणेच अफवांच्याही लाटा बराच काळ येत राहणार!

रुग्णांच्या तपासणीतल्या गफलतींमुळे ‘कोरोना’च्या नव्या अवताराचीही बोंब उठणार! त्या फॉरवर्ड/शेअर करून आपल्या मूर्खपणाचे प्रदर्शन करू नये.

Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/

असो. ‘कोरोना’ Pandemic महामारीने अमेरिका – युरोप खंडातील देशांना ज्या वेगाने मृत्यूच्या मरणमिठ्या मारल्या; त्यामानाने आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्याचा प्रभाव सुरुवातीला कमी होता.

‘कोरोना’च्या पहिल्या लाटेच्या वेळी ‘लॉकडाऊन’ सारखे निर्बंध लोकांना अधिक त्रासदायक आणि नुकसानकारक वाटले. पण त्यामुळे ‘कोरोना’चा फैलाव रोखता आला आणि मृत्यू टाळता आले.

याउलट, दुसऱ्या लाटेत दाखवलेल्या बेफिकिरीमुळे मृतांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुपटी-तिपटीने वाढली.

दुसऱ्या महायुद्धात (१९३९ ते ४३) प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सामील झालेल्या देशांपेक्षा अधिक देशांना ‘कोरोना’ने हैराण केले. ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची तुलना महायुद्धात बळी पडलेल्यांशी होऊ शकत नाही.

पण एक साथीचा रोग Pandemic जगातील ६० लाख लोकांचा बळी घेऊ शकतो, हे वास्तव सहजपणे स्वीकारता येत नाही.
भारतात ‘कोरोना’मुळे गेल्या दोन वर्षांत पाच लाख लोकांचा मृत्यू झाला.

भारतात दरवर्षी वृद्धता आणि वेगवेगळ्या आजारांत उपचारांअभावी १५ लाख लोक मृत्यू पावतात. त्या तुलनेत ५ लाख ही संख्या फार वाटत नसली तरी ; जे ’कोरोना-मृत्यू’ झाले, ते अपुर्‍या आरोग्य व्यवस्थेमुळे आणि औषधांच्या तुटवड्यामुळे झाले, हे दुर्लक्षिण्यासारखे नाही.

नियोजनाचा अभाव तर ‘लॉकडॉऊन’ जारी करण्यापासूनच सुरू झाला. परिणामी, देशातील महानगरात रोजीरोटी कमावणार्‍यांना आपल्या घरी- गावात परतण्यासाठी हजारो मैलांची पायपीट करावी लागली.

महाराष्ट्रात ‘कोरोना’च्या पहिल्या लाटेत ७ लाख छोटे-मध्यम कारखाने-धंदे बंद पडून ३० लाख लोकांचा रोजगार-नोकर्‍या गेल्यात. ‘कोरोना’ बरोबरच बेरोजगारीने ओढावलेल्या आर्थिक ओढगस्तीने करोडो लोकांच्या जीवनावर आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

खाजगी शाळेतील फी परवडत नसल्यामुळे ४० लाख मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागलाय.
डोळ्यांना न दिसणार्‍या ह्या ’कोरोना’ विषाणूने आपल्याला दुःख दिलं, तसंच जगण्याचा नवा दृष्टिकोनही दिलाय.

नवा विचार करण्याची संधी दिलीय. ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची नवीन पद्धत शिकवलीय. अनेकांना नवीन व्यवसाय-उद्योग करण्याची संधीही दिलीय.

ज्यांना गमवावं लागलं, त्यांना उभं राहण्यासाठी खूप वेळ लागेल. अनेक घरांतील मुलांनी आई किंवा वडिलांना; वा दोघांनाही गमावलंय. कुटुंबातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचं अंत्यदर्शनही न होणं, हे भयंकर वास्तव Pandemic ’कोरोना’ने आपल्याला शिकवलंय.

‘कोरोना’ग्रस्तांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बेड, औषधे, ऑक्सिजन मिळण्यासाठी कुटुंबीयांची जीवघेणी फरपट होत असताना, महामारीला महाकमाईची संधी बनवणाऱ्या क्रूरकर्म्यांचे चेहरे आपल्याला पाहायला मिळाले; तसेच आपली बचत गोरगरिबांना देणाऱ्या करुणाकरांचंही दर्शन घडलंय.

जनसेवेला फाट्यावर मारून सत्तेसाठीचं हलकट राजकारणही पाहायला मिळालं. लोकांना थाळ्या-टाळ्या वाजवायला लावून, होमिओपॅथीच्या गोळ्यांसाठी गर्दी करायला लावून ‘कोरोना’चा प्रसार करण्याचा उद्योग; जनतेनी लाईट बंद करून ‘अकलेचे दिवे’ लावून अनुभवला आहे.

या साऱ्यातून लोकं काही शिकली आहेत का? स्वच्छता राखणं, गर्दी टाळून आरोग्य सुरक्षित राखणं, हे अंगवळणी पडले आहे का? रोगप्रतिकार शक्ती ठणठणीत राखण्यासाठी व्यायामाचं महत्त्व कळलं आहे का?

चुकीच्या आहारामुळे आरोग्य आणि विविध प्रकारच्या प्रदूषणाद्वारे वातावरण, आपण बिघडवत आहोत. नव्या आजारांना आमंत्रण देत आहोत. जुनं नेहमीच सोनं नसतं आणि नवीन नेहमीच चांगलं नसतं; दोन्हींची पारख करण्यासाठी संयम हवा; तसं ज्ञानही हवं. त्यासाठी स्वतःला फसवणारी बौद्धिक महामारी संपली पाहिजे. त्याशिवाय, ‘कोरोना’सारख्या जीवघेण्या Pandemic महामारीतही आपण टिकून राहिलो, ह्याचा आनंद घेता येणार नाही.

 

ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!