Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

No words to say – नाही म्हणायला शिका

1 Mins read

No words to say – नाही म्हणायला शिका

 

No words to say – नाही म्हणायला शिका

 

 

 

 

प्राची पटापट आपलं काम संपवत होती कारण आज खूप दिवसांनी तिला तिच्या शाळेच्या मैत्रिणी भेटणार होत्या. शेवटचे रिपोर्ट्सचे मेल करून निघूया ,असं मनात ठरवतं असता तिची सहकारी मुक्ता तिच्या टेबलवर काही फाईल्स ठेऊन निघून गेली. असेल काही म्हणून प्राची आपलं सामान आवरू लागली .तितक्यात इंटरकॉम वाजला आणि तिचे सर म्हणाले ज्या फाईल पाठवल्या त्या जरा जमल्या तर तपासून घ्या आज. खरतर आजचं तिचे सर्व काम झाले होते पण जेव्हा सर म्हणाले जमलं तर आज करा,त्यानां आता नाही उद्या करते हे म्हणायला प्राचीला काही जमलं नाही. उलट तिने आपल्या मैत्रिणींना सांगितले ,मला आज यायला जमणार नाही. मग अगदी वैतागून तिने काम चालू केले. आपणं का नाही बोलू शकलो, असा विचार करून तिला स्वतःचांच राग आला.

खूपदा असं होत की आपल्याला  कामाचा ढीग समोर  दिसत असतो. हे करू  की ते असं आपलं चाललं असतं .काही कामं खूप महत्वाचे असतात अगदी तातडीने पूर्ण’ करण्यावाचून इलाज नसतो. तितक्यात आपला एक सहकारी अरे, जरा माझं हे काम करशील का ? म्हणून आपल्याला काम सांगून निघून सुद्धा जातो .आपल्या हो-नाही शी काहीही देणं-घेणं नसल्या सारखं .खरंतर आपले उत्तर हो हेचं असणार आहे असं गृहीत  धरून ! नाही म्हणणं अगदी ओठावर असत पण तोंडातून एक शब्द बाहेर आला तर शपथ ! जेव्हा आपल्याला गृहीत धरून कामं आपल्यावर अक्षरशः लादली जातात ,तेव्हा आपण मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत राहतो. आपण No words to say “नाही “का नाही म्हणालो असा विचार करत राहतो.

आपणं बहुतेकदा नाही ,ह्या साठी नाही म्हनू शकत कारण आपल्याला समोरच्याला दुखवायचं नसतं . नाही म्हणायची भीती इतकी मनात असते की होकार देऊन आपण आपलेच प्रॉब्लेम्स वाढवतो.  प्रत्येकाच्या सर्व कामांना जर आपण हो म्हणू तर  आपला त्यात वेळ जातो आणि आपलं काम रहातं तसंच .

No words to say नाही म्हणण्यासाठीचे काही महत्वाचे मुद्दे –

  •  नाही म्हणायला शिकायला हवे! त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका .

  • नाही  म्हणून तुम्ही स्वतःच्याच भावनांचा आदर करताय ,त्यात चुकीचं काहीचं नाही.

  • आधीच नाही म्हटलेले बरे ,नंतर हो म्हणून ते काम झालं नाही तरी सुद्धा पुढच्याला वाईट वाटेल .

  • हो म्हणून समस्या वाढवण्यापेक्षा नाही म्हणून आयुष्य सोपं  होऊ शकतं .

  • नकार नम्रपणे दिला ,उगीच उडवा-उडवीची उत्तरे नाही दिली तर त्यातली सत्यता समोरच्या पर्यंत पोहचते.

  • हो म्हणून आपणं स्वतःचे ताण -तणावं वाढवतो.

  • चांगल्या  परस्पर संबंधासाठी  कधीकधी नाही म्हणणं देखील जरुरी असतं.

  • नको त्या गोष्टींना नाही म्हटलं तरचं आपणं चांगले काही करू शकू ना ?

प्रत्येकाला हो म्हणून खुश करणे ही काही तुमचीच जबाबदारी नाही. त्यामुळे बरयाचदा कामचुकार लोक मस्तपैकी दुसऱ्यावर काम ढकलून स्वतः बेफिकीर राहतात .जर तुम्हाला विनाकारण तणाव घ्यायचा नसेल तर वेळीच नाही म्हणायला शिका .” नाही ” ची गरज , सामर्थ्य आणि महत्व वेळीच समजा. नाही म्हणायला शिकणं म्हणजे आपल्या प्रगतीसाठी  एक पाऊल पुढे जाणं ! तुमचे एक “नाही” तुम्हाला बऱ्याच नकोश्या गोष्टी पासून मुक्तता देईल हे नक्की !  मग लक्षात ठेवा   – Do not say YES when you want to say NO !

www.postboxindia.com

www.postboxindia.com

मेघना धर्मेश

9321314782 | [email protected]

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: