Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri Jewlery – तिसरी नवदुर्गा

1 Mins read
  • Navratri 2022 - तिसरी नवदुर्गा

Navratri Jewlery – तिसरी नवदुर्गा

 

 

Navratri Jewlery –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

 

 

 

नवरात्रोत्सव ३

डॅा. आरजू तांबोळी

Navratri Jewlery – आरजू तांबोळी यांचे शालेय शिक्षण आटपाडी जि. सांगली येथे झाले. १२ वी नंतर त्या सांगली येथे BAMS डॅाक्टर झाल्या पण हे शिक्षण पूर्ण होत असतानाच आपल्याला प्रशासनामध्ये अतिशय रुची आहे, व्यवस्थेच्या बाहेर राहून काम करण्यापेक्षा प्रशासनामध्ये जाऊन काम करू असा त्यांचा निर्णय पक्का झाला. आणि MPSC/UPSC च्या अभ्यासासाठी त्या पुण्यामध्ये दाखल झाल्या.

सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झालेल्या डॅा. आरजू तांबोळी यांच्या घरचं वातावरण खूप धार्मिक नव्हतं, पण कुटुंबामध्ये सहिष्णुता होती. आई नोकरी करत असल्यामुळे साहजिकच चांगले शिक्षण घेणे, स्वावलंबी होणे याची बीजं नकळत्या वयातच रुजली गेली. पण या सर्वांच्या बरोबरच वाचनाच्या प्रचंड आवडीने आयुष्याला एक अर्थपूर्ण कलाटणी मिळाली.

वाचनामुळे एक नवीन दृष्टी विकसित झाली, अनेक जाणीवा, आपले व्यक्तिमत्त्व व आपले स्वतंत्र विचार त्यामुळे विकसित झाले. यामुळेच आपल्या आयुष्यातील निर्णय आपणच विचारपूर्वक घ्यायचे हा आत्मविश्वास निर्माण झाला.

BAMS पूर्ण झाल्यानंतर त्या MPSC चे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य विक्रीकर निरीक्षक या पदावर २०१३ पासून कार्यरत झाल्या. २०१३ ते २०१७ पर्यंत मुंबई आणि २०१७ पासून त्या पुणे येथे कार्यरत आहेत.

२०१६ मध्ये विशाल विमल ( पत्रकार) यांच्याशी त्यांचा आंतरधर्मीय विवाह नोंदणी पध्दतीने बौद्ध जयंतीला विशेष विवाह कायद्यानुसार सोहळा झाला. कोणतेही कर्मकांड न करता हा सोहळा पार पडला. आमच्या लग्नाचे पौरोहित्य कुण्या भटजीने अथवा कुण्या मौलवीने न करता कायदेशीरपणे सरकारच्या अधिकार्‍यांनी केले. त्याला आमचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवार, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि दिग्गज उपस्थिती होते.

विशाल व डॅा. आरजू यांची प्रथम २ वर्ष मैत्री व त्यानंतर आज ७ वर्षाचे सहजीवन, मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून सहजीवन सुरू झाले. त्यात हिंदू-मुस्लिम प्रेममय सहजीवन असल्यामुळे त्यांनी दोघांनीही प्रेम या विषयावर भरपूर लिहिलेय.

विशाल साधना साप्ताहिकाच्या प्रकाशन विभागात नोकरी करत असताना त्यांची पहिली भेट झाली. एक मुस्लिम मुलगी एवढे शुद्ध मराठी बोलते, डॉक्टर आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आणि सामाजिकदृष्ट्या एवढी संवेदनशील या गोष्टीचे त्याला विशेष आणि कौतुक वाटले. ‘माझे हसणे आणि त्याचे हॅंड्सम दिसणे या गोष्टी आम्हांला महत्त्वाच्या नव्हत्या, आम्ही भाळलो ते आमच्या एकमेकांच्या आचार-विचारांवर ! मात्र एकमेकांवर छाप टाकण्यासाठी आम्ही कधी वेगवेगळे चेहरे दाखविले नाहीत. एकमेकांना प्रेमासाठी पटविणे, त्यासाठी मागेपुढे करण्याची गरजच वाटली नाही.’ असे त्या सांगतात.

Navratri Jewlery – विविध विषयांवरील गप्पांतून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. असाच जोडीदार हवा यावर शिक्कामोर्तब झाले आणि आम्ही माणूस म्हणून एकमेकांचा स्वीकार केला.
विशेष विवाह कायद्यानुसार एकत्र आल्याने धर्मांतराचा प्रश्नच आला नाही. देश पातळीवर धर्मांतरामुळे चिघळणारे वाद काही झाले नाही, पण सामाजिक दबाव आणि नातेवाईकांच्या विरोधाला मात्र सामोरे जावे लागले. विशाल शालेय जीवनापासूनच परिवर्तनवादी चळवळीत असल्याने त्याला घरी, तो राहतो त्या गावात, मित्र परिवारात त्याचे विचार माहीत होते. मात्र त्याच्या घरच्यांना काही प्रमाणात इतरांचे टोमणे सहन करावे लागणे, बोलणी ऐकावी लागली, तरी देखील दोन्ही कुटुंबीय आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. डॅा. आरजू यांना मात्र थोडा जास्त विरोध सहन करावा लागला. नातेवाईकांकडून बराच सामाजिक दबाव होता. सोशल मीडियावर ट्रोल केले. अनेकांनी घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक नातेवाईकांनी बोलणे बंद केले. पण घरचे मात्र ठामपणे पाठीशी राहिले. दोघांवर विश्वास दाखवल्यामुळे त्यांचे सहजीवन सुरू व्यवस्थित सुरू झाले.

‘दोघे उभयतां आंतरधर्मीय सहजीवन जगताना ते स्वतःला नव्या पिढीचे, नव्या विचारांचे पाईक समजतात पण दोघांचे कुटुंबीय ज्या ग्रामीण भागात रहातात, तेथील विचार आणि रितीभाती झुगारून ते आमच्या पाठीशी उभे राहिले, ही खरे तर सलाम करण्यासारखी गोष्ट आहे’ अशी कृतज्ञता डॅा. आरजू व्यक्त करतात.

‘आमची मैत्री, प्रेम, सहजीवन हे वैचारिक पायावर उभे आहे. त्यात स्वातंत्र्य आहे, त्यात कामाचे समान वाटप आहे, त्यात आदर आहे. मी राज्य विक्रीकर निरीक्षक आहे, तर विशाल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. पुरेपूर एकमेकांना स्पेस देत जगत असतो. पुरुषाने भांडी घासली, कपडे धुतली तर बिघडत नाही, हा आमचा प्रेमातील विचार आम्ही आता सहजीवनातही जगतो. बालसंगोपन ही काही फक्त आईचीच जबाबदारी नाही, तर ती वडिलांचीही जबाबदारी असते, हा विचार आमच्या मेंदूत रुजलेला असल्याने बाळाच्या जन्मापासून त्याला मालिश करण्यापासून ते त्याची अंघोळ, शी-सु, त्याला सांभाळण्याचे काम विशाल अगदी आनंदाने करतो. त्यातून त्याला सृजशीलतेचा आविष्कार घडतो. लग्नानंतर बायकोने पतीचे नाव, आडनाव पाहिजेत, असा कुठे नियम नाही. आम्ही सहजीवनात स्वतःच वैचारिक स्वातंत्र्य , स्वतःच अवकाश जपतो.आम्हाला खूप जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी आहेत. तिथेही आम्ही एकमेकांचे स्वातंत्र्य जपतो. खरे तर हे स्वातंत्र्य जपलेच पाहिजे कारण स्वातंत्र्य हा प्रेमाचा आविष्कार आहे. बंधने म्हणजे प्रेम नव्हे !’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज त्यांना ५ वर्षाचा अर्शल नावाचा मुलगा आहे. यांच्या घरात व्यक्तीस्वातंत्र्यासोबत धर्म स्वातंत्र्य आहे. सर्व सण समारंभ हे तिघेही मानवतावादी दृष्टीने साजरे करतात. पुस्तक वाचन हा तिघांच्या मधला समान धागा आहे. तोच यांचा वाटाड्या आहे. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणाऱ्या किंवा द्वेष निर्माण करणाऱ्या अनेकांसाठी हे कुटुंब नक्कीच प्रेरणादायी आहे.
अशा अनोख्या व दुर्मिळ सहजीवनासाठी डॅा. आरजू यांना भरपूर शुभेच्छा व अशा मुक्त विचार जगून छान आयुष्य जगणाऱ्या या आधुनिक Navratri Jewlery – दुर्गेस मानाचा मुजरा..!! 

 

 

 

ॲड. शैलजा मोळक

 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri 2022 - पहिली नवदुर्गा

error: Content is protected !!
%d bloggers like this: