Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri colors – पाचवी नवदुर्गा

1 Mins read

Navratri colors –  नवरात्रोत्सव 5

Navratri colors –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

 

 

नवरात्रोत्सव ५

शीतल शेखे

Navratri colors – आजच्या तरूणपिढीपुढे आदर्श नाहीत. त्यांना आचार, विचार, संस्कार नाहीत. त्यांना वाचनाची आवड नाही. असं बरंच काही आपण बोलतो. हे काही अंशी खरंही आहे. पण असे काही तरूण आहेत की ज्यांना आचार, विचार, संस्कारच नव्हे तर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट व संघर्षाची तयारीही आहे. आज आपला देश तरूणांचा देश समजला जातो. विविध क्षेत्र पादाक्रांत करून आजची तरूणाई या स्पर्धेच्या युगात घोडदौड करत आहे. युवाशक्ती ही राष्ट्रीय संपत्ती असते. ती राष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम करते. अनेक तरूण-तरूणी आज भावी पिढीसाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत. कित्येकजण सोशल मीडिया व तंत्रज्ञानाचा वापर करून आपली वैचारिक, बौध्दिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीही साधत आहेत. यांना एक व्हीजन आहे व त्याबरोबरच यशस्वीततेकडे जाण्याची धडपड आहे.

अशीच आपली आजची Navratri colors – नवदुर्गा आहे, सॅाफ्टवेअर इंजिनिअर असलेली शीतल इंद्रजीत शेखे. उस्मानाबाद जवळील एका खेड्यातील हे कुटुंब सुमारे २५ वर्षांपूर्वी नोकरीनिमित्ताने पुण्यात आले. वडील सिक्युरिटीमधे व आई गृहिणी. १ भाऊ व १ बहीण असे हे चौकोनी कुटुंब एका भाड्याच्या खोलीत रहात होते. शीतलने कुटुंबाचा असलेला गरीबीचा संघर्ष लहानपणापासून पाहिला होता. तेव्हापासून ‘आपण आयुष्यात काही करावं, आईवडीलांना सुख, समाधान, आनंद द्यावा. आणि आपले स्वतःचे घर असावे’ असे बीज शीतलच्या मनात पेरले गेले.

शीतलचे शिक्षण येरवडा येथे विद्यानिकेतन शाळेत झाले व महाविद्यालयीन शिक्षण कूस्त्रो वाडिया कॅालेजमधे झाले. नोकरी लागल्यानंतर तिने इतर तरूणींप्रमाणे चैन, हौसमौज, पार्ट्या यावर वेळ व पैसा खर्च न करता गाडी घेतली, गुंठाभर जागा घेऊन घर बांधले व आईवडीलांसाठी घर बांधायचे स्वप्न पाहिले व वयाच्या अवघ्या पंचविशीत तिने ते पूर्णत्वाला नेले. यासाठी तिचे कौतुक करावे तेवढे कमीच..!

हे सारं करत असताना बालपणापासूनची तिची वाचनाची आवड तिला अधिकाधिक प्रगल्भ करत गेली. आपले करियर सांभाळत ती महिला, शालेय विद्यार्थी व तरूणांसाठी करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वाहतूक नियमांबाबत जनजागृती, तरूणींसाठी सेल्फ डिफेन्स अशा विविध विषयावर मार्गदर्शन करते. वेश्या व्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी आत्मविश्वास, समाजव्यवस्था, बालवयातील मुलींसाठी ‘Good Touch, Bad Touch’ या विषयीच्या सत्रांचे आयोजन करते. तसेच ‘जनकल्याण ब्लडबॅंकेसोबत भारतातील पहिले प्लेटलेटस् डोनेशन कॅम्पस्’ तिने राबवले आणि त्याचा भारतभर विस्तार केला. याचे १०० हून अधिक कार्यक्रम घेतले. शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रांतीकारक, इतिहासपुरूष, प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना ती गोष्टीरूपाने सांगण्याचा महत्वपूर्ण उपक्रम घेते.
‘लोकांशी संवाद साधणे, नाटक, वक्तृत्व, वाचन हे तिचे छंद तिच्या कामात सहजता आणतात. कोणतेही काम म्हटले की अडचणी या
असणारच तशा त्या समाजकार्यातही येतात. मात्र काम करण्याची जिद्द आणि आवड असेल तर आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो. ‘ असे ती म्हणते.

Navratri colors – शीतलच्या कामाची दखल राष्ट्रीय व राज्य पातळीवरही घेतली गेलीय. भारतीय राष्ट्रीय युवा परिषद पुणे विभागाची सचिव, एनजीओ फ्रेंड्स ॲकॅडमीची महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून ती कार्यरत आहे. शीतलने आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे अस वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरूण-तरूणींनी, आयटी क्षेत्रातील करियर करणाऱ्या चौकटीत जगणाऱ्या सर्वांनीच शीतलचा आदर्श घ्यावा असे मला वाटते.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष, पुण्यात शिक्षण घेऊन आपले स्थान निर्माण करणाऱ्या, स्वतःघर घेऊन आईवडीलांना आनंद देणाऱ्या, आपले करियर सांभाळून सामाजिक भान जपत, आपल्या जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या, सामान्यांच्या मुलां-मुलींसाठी धडपडणाऱ्या, महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या शीतल शेखे या आधुनिक Navratri colors –  नवदुर्गेस मानाचा मुजरा.!!! 

ॲड. शैलजा मोळक

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

 

 

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri Jewlery - तिसरी नवदुर्गा

error: Content is protected !!