Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Navi Mumbai नवी मुंबई पाणी पुरवठा समस्या / उपाय

1 Mins read

Navi Mumbai सिडकोच्या नवीन नोड उलवे मध्ये पाणी पुरवठा जलवाहिनी च्या तांत्रिक कामकाज आणि इतर पुरवठ्या संदर्भातील अडचणी मुळे उलवे नोडच्या अनेक सेक्टर आणि सोसायटींना पाणीपुरवठा नियमित होत नाही.

Navi Mumbai सिडकोचा पाणीपुरवठा पुरेसा नसल्यामुळे खारघर, तळोजा,

पनवेलवासीय एकट्या टँकरवर लाखो रुपये खर्च करतात.

मोर्चे आले कि तात्पुरते अधिकारी हातपाय हलवतात अशी सामान्य लोकांची तक्रार आहे.

खारघर, तळोजा आणि पनवेल पट्ट्यातील रहिवाशांचे म्हणणे आहे की,

सिडकोने दिलेले पाणी अपुरे असल्याने लाखो रुपये खर्च करून खासगी टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.

Navi Mumbai शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा दावा करत असले तरी,

नवी मुंबईतील खारघर, तळोजा आणि पनवेल पट्ट्यातील रहिवाशांनी पाणी संकटातून सुटका नसल्याचे सांगितले आहे.

Navi Mumbai उलवे तील तर सेक्टर ८ आणि ९ मध्ये पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत, सेक्टर ९ मधील जसबीर सिंग यांनी आपल्या सोसायटीला सहा / सहा दिवसांनंतर पाणी येत असल्याची खंत व्यक्त केली.

तर सिडकोकडूनच पाणी पुरवठा नियमित नसल्याने अनेक सामाजिक विकृत मनोवृत्तीचे सदस्य समजूतदारपणा न दाखवता सोसायटीच्या कमिटी पदाधिकाऱ्यांवर आगपाखड करत असतात.

Navi Mumbai नवी मुंबईच्या द्रोणगिरी नोड मध्ये अनियमित पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे,

येथील अक्षर बिल्डर्स च्या सोसायटीला बिल्डर आणि सिडको प्रशासनावर येथील सोसायटी रहिवाश्यानी रोष व्यक्त करत आंदोलन सुद्धा केले आहेत.

महावीर हेरिटेज CHS, खारघर सेक्टर 35G च्या रहिवाशांनी गेल्या महिन्यात फक्त पाण्याच्या टँकरवर सुमारे 10 लाख रुपये खर्च केले आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याने केवळ टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. सोसायटीला दररोज २४० युनिट पाणी लागते, पण फेब्रुवारीच्या मध्यापासून सिडकोने केवळ १०० युनिट पाणी पुरवले आहे. सिडकोने आश्वासन दिले आहे की 10 मे पर्यंत पाण्याचे नियमन केले जाईल.

अलीकडेच सिडकोने आवश्यकतेनुसार टँकर सेवा घेण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला होता. रहिवाशी या प्रकारामुळे हतबल होऊन प्राधिकरणावर नाराज झाले आहेत. “दिलेल्या नंबरला कोणीही उत्तर देत नाही आणि जरी कोणी उत्तर दिले तरी आवश्यक प्रमाणात टँकर पुरवले जात नाहीत,” अशी तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली.

तर सिडको ने या सर्व गोष्टींचे खापर सोसायट्यांवर फोडले आहे, काही सोसायटी दररोज सुमारे 25 टाक्या ( टँकर ) पाणी साठा हव्यासामुळे घेत असल्याचे सांगितले. “764 फ्लॅट असलेल्या सोसायटीला दररोज सुमारे पाच लाख लिटर पाणी लागते त्यामुळे पाणी मोठ्या सोसायटी / टॉवर मध्ये कमी पडते अशी तक्रार देखील सोसायटी सदस्यांकडून होत आहे. सिडकोने दिलेले पाणी पुरेसे नसल्याने आम्हाला खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागत आहे, असेही सामान्य नागरिकांनी आपले मत व्यक्त केले.”

रहिवाशांनी सांगितले की, एका टँकरची किंमत ₹ 4,000 ते ₹ 5,000 दरम्यान असते. ट्विटर सारखी सोशल नेटवर्किंग माध्यमे यावरून सिडकोला अपुऱ्या पाणी पुरवठ्या संदर्भात तक्रार करूनही उपयोग होत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली.

“हेटवणे धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. पण पेण तालुक्‍यातील जलशुद्धीकरण ठिकाणाहून सिडकोच्या शेवटच्या नोड असलेल्या भागात पाणी वितरण सुरू ठेवण्याचा सिडकोचा प्रयत्न असतो. परंतु आवश्यक असलेले 150 MLD पाणी पुरवण्यासाठी पाणी पाइपलाइन वितरण नेटवर्क आता कमी पडत आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा यंत्रणा लवकर अपग्रेड करण्यात येईल असे सिडकोचे म्हणणे आहे.

सिडकोने पाणी पुरवठा बाधित नोड्ससाठी पाणीपुरवठा यंत्रणा अपग्रेड करण्याच्या आश्वासनाचे पालन वेळोवेळी न केल्याने रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

Navi Mumbai सिडकोने मात्र पाणीपुरवठ्याची प्रक्रिया सुरळीत करण्याचे सर्व प्रयत्न सुरू ठेवले आहेत. खारघर सेक्टर 18 मध्ये 20 लाख लिटर क्षमतेचा एक उन्नत साठवण जलाशय कार्यान्वित करून नवी मुंबई महानगरपालिकेकडून 50MLD पाणी पुरवठा सुरु केल्याचे सिडकोने नमूद केले आहे.

“काही सोसायट्यांना पाणी पुरवठ्याबाबत समस्या येत असतील तर त्या लवकरच सुरळीत करण्यात येईल असे सिडकोने सांगितले .खारघरच्या प्रमुख भागांसह अन्य नोडमध्ये पाणीपुरवठा आता पुरेसा होत आहे. उलवे सेक्टर 16 आणि 17 मधील पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले आहे. हेटवणे येथील पाण्याच्या दाबावरही नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे,” असे सिडकोच्या जलविभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले.

हाऊसिंग सोसायटीचे वॉटर ऑडिट किती महत्वाचे आणि कसे करावे ? 

महानगरपालिका क्षेत्रात १३५ एल.पी.सी.डी. (liters per capita per day) मानांकाप्रमाणे नागरिकांनी पाणी वापरावे असा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा मापदंड आहे. जवळ जवळ सर्वच नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पाणीटंचाईची नेहमी ओरड असते. महाराष्ट्रात काही महापालिका क्षेत्रात पाणी एक दिवसाआड मिळते तर काही महापालिका क्षेत्रात चार दिवसाआड मिळते.

आता काही नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात टंचाई असल्यास पाणीपुरवठा किती दिवसाआड होतो याची काही उदाहरणे पाहू.

औरंगाबाद – ५ दिवसाआड
जालना – १ दिवसाआड
सोलापूर – ४ दिवसाआड
मनमाड – ७ दिवसाआड
धुळे – ४ दिवसाआड
लातूर – ७ दिवसाआड

पाणीपुरवठा टंचाई हे महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती वाड्या यांची डोकेदुखी होऊन बसली आहे. दुष्काळ पडल्यावर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पाणीपुरवठा योजनांमध्ये होणारी गळती. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वॉटर ऑडिट करून घेणे व त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु आपण Navi Mumbai सोसायट्यांमध्ये होणाऱ्या अपव्ययाची आणि गळतीची कधीच मोजदाद करत नाही. त्यासाठी सोसायटीचे दरवर्षी वॉटर ऑडिट होणे आवश्यक आहे.

सोसायटीचे वॉटर ऑडिट करायचे म्हणजे नक्की काय करावे लागेल ?

१. महापालिका क्षेत्रात १३५ लिटर एल.पी.सी.डी. मानांकाप्रमाणे प्रत्येक फ्लॅटमध्ये ५ माणसे याप्रमाणे किती पाणी लागते याची मोजदाद करावी. समजा ६७५ लिटर प्रत्येक फ्लॅटसाठी. याप्रमाणे सोसायटीच्या महिन्याच्या व वर्षाच्या पाणी वापराची गणना करावी.

२. व्यावसायिक वापरासाठी प्रत्येक दुकानदाराला १०० लिटर एल.पी.सी.डी. प्रमाणे ५ व्यक्तींसाठी किती पाणी लागते याची मोजदाद करावी किंवा तुमच्या महापालिकेच्या मानांकाप्रमाणे किती पाणी लागते याप्रमाणे मानांक धरावे आणि महिन्याच्या आणि वर्षाच्या पाणी वापराची गणना करावी.

३. घरगुती आणि व्यावसायिक पाणी वापर यांची बेरीज करावी आणि येणारे उत्तर जर तुमच्या प्रत्यक्ष पाणी वापरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच पाण्याचा अपव्यय करता किंवा तुमच्या सोसायटीत गळत्या आहेत किंवा दोन्हीही प्रकार आहेत असे होईल.

४. सोसायटीच्या अंडरग्राउंड टाकीकडे महापालिकेच्या पाइपपासून (फेरूलपासून) येणारा पाईप पूर्वी जी.आय. होता. तो आता गंजलेला असेल त्यामुळे पाण्याचे लॉसेस वाढतात आणि तुम्हाला पाणी कमी मिळते. उपाय – तो बदलून पीव्हीसी टाकल्यास लॉसेस कमी होऊन डिस्चार्ज वाढेल.

५. साधारणपणे दहा वर्षांपूर्वीच्या इमारतींमध्ये जी.आय. पाईप वापरले जात होते. ते सर्व आतून गंजलेले असतात. त्यामुळे उंच टाकी भरायला वेळ लागतो व वीज बिल वाढते.

उपाय –

बाहेरचे ऊंच टाकीकडे जाणारे पाईप आवश्यकतेनुसार यूपीव्हीसी किंवा सीपीव्हीसी पाईप टाकून बदलल्यास पाण्याचे लॉसेस कमी होतील आणि तुमच्या वीजबिलात कपात होईल.

तसेच कन्सिल्ड प्लंबिंगमुळे जी.आय. पाईप बाहेरूनही गंजलेले असतात. हे गंजलेले गळके पाइप बदलून त्याऐवजी आवश्यकतेप्रमाणे यूपीव्हीसी, सीपीव्हीसी पाईप बदलणे आवश्यक आहे.

त्यामुळे तुमचा प्रत्यक्ष पाणी वापर कमी होईल आणि वीज बिलातही कपात होईल.

६.सोसायटीतील पाण्याचे पंप जाणकारांकडून तपासून घ्या. त्याची कार्यक्षमता कमी झाली असेल आणि दुरुस्त करणे आवश्यक असेल तर दुरुस्त करून घ्या किंवा चांगल्या कार्यक्षमतेचे नवीन पंप बसवून घ्या.

तसेच स्विचरूम ते पंप यांना जोडणारी केबल हे तपासून घ्या आणि खराब झाली असल्यास ती बदलून घ्या. त्यामुळे वीज बिलात कपात होईल.

७. आता घरातील सर्व नळ, फिटिंग्स्, फ्लश टंँक यातून गळती असल्यास ते दुरुस्त करावेत किंवा ते आवश्यकता असल्यास बदलावेत.

८. तुमची पाण्याची वॉटर मीटर्स खराब असतात. कधीकधी ती फास्ट किंवा स्लो चालत असतात. काही वेळा ती बंदच असतात. त्यामुळे तुम्हाला पेनल्टी रेट ने बिल दिले जाते. ती योग्य यंत्रणाकडून तपासून घ्या आणि दुरुस्त करून घ्या.

९. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा वापर काटकसरीने करा. कारण पाणी हे जीवन आहे. आता पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत तुम्ही इंटरनेटवर सर्च केल्यास अनेक उपाय सापडतील. त्याप्रमाणे अंमलबजावणी केल्यास तुमच्या पाण्याचा वापर कमी होईल.

१०. सोसायटीने दरवर्षी वॉटर ऑडिट करून घेतल्यास सोसायटीच्या पाण्याच्या आणि विजेच्या बिलात कपात तर होणारच आहे शिवाय पाणी गळतीमुळे होणारे इमारतीचे नुकसान कमी होऊन इमारतीचे आयुष्य वाढणार आहे.

येथे महानगरपालिका क्षेत्रासाठी दर डोई दर दिवशी लागणाऱ्या पाण्याच्या नॉर्म्सचा विचार केला आहे. नगरपालिका क्षेत्रासाठी हे नॉर्म्सचा वेगळे आहेत.

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

क्रमशः

रमाकांत नारायणे

Leave a Reply

error: Content is protected !!