Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर

1 Mins read

मी रात टाकली, मी कात टाकली…

मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
अशी सुंदर गीत रचना करणारे हाडाचे शेतकरी ,कवी, गीतकार , व माजी आमदार ,पुरोगामी विचारांचे ,
निसर्गकवी ना धो महानोर

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर 1

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर

( नामदेव धोंडो महानोर) यांचे आज अभिष्टचिंतन

पु ल त्यांना धोधो महानोर म्हणायचे, महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त सभासद म्हणून महाराष्ट्र शासनाने महानोरांची शिफारस केल्यावर इ.स. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.
महानोरांचा जन्म सप्टेंबर १६, इ.स. १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले .
महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले त्यांनी शेतीमध्ये लक्ष घातले जास्त पाण्याची केळीची बाग काढून कमी पाण्यावरील मोसंबी लावली . पहिली ४/५ वर्षे चांगली गेली पण विहीर कोरडी पडली शेजारच्या विहिरीतून पाणी आणण्या साठी त्यावेळच्या दराने १६०० रुपये हवे होते. ते कोठून आणायचे हा प्रश्न होता
तेवढ्यात समोर पोस्टमन आला व एक पाकीट त्यांचेकडे दिले त्यामध्ये “”रानातील कविता “”त्यांच्या कविसंग्रहाला रू २००० पारितोषिक रकमेचा चेक होता .

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर 2

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर

त्यांची गाजलेली गीते
अवेळीच केव्हा दाटला …. .. …… असं एखादं पाखरू वेल्हाळ …. …. …. .. आज उदास उदास दूर …. .. .. आम्ही ठाकरं ठाकरं …. …… …… किती जिवाला राखायाचं …. …….. कुठं तुमी गेला व्हता .. …. कोन्या राजानं राजानं .. …… …… गडद जांभळं भरलं आभाळ …. …… …… घन ओथंबून येती .. .. चांद केवड्याच्या रात .. …. …. चिंब पावसानं रानं झालं …… …. .. जाईजुईचा गंध .. .. …. जाळीमंदी झोंबतोया …. …. जांभुळपिकल्या झाडाखाली .. …. …… डोंगर काठाडी ठाकरवाडी .. …. …… तुम्ही जाऊ नका हो रामा .. …. …. नभं उतरू आलं …. .. …… पीक करपलं …….. पूरबी सूर्य उदेला जी .. .. .. बाळगू कशाला व्यर्थ …. …… .. भर तारुण्याचा मळा .. …… …. भरलं आभाळ पावसाळी …… …… …… भुई भेगाळली खोल …. मन चिंब पावसाळी .. …… मी गाताना गीत तुला …… ..मी रात टाकली …. …. राजसा जवळी जरा बसा …… …. …. …. लाल पैठणी रंग माझ्या …. …. .. …. लिंगोबाचा डोंगूर …. वळण वाटातल्या झाडीत …. …….. शब्दांचा हा खेळ मांडला …… .. सूर्यनारायणा नित्‌ नेमाने ……..त्यांची प्रकाशित काव्यसंपदा
अजिंठा (कवितासंग्रह)—-गंगा वाहू दे निर्मळ—-जगाला प्रेम अर्पावे—-त्या आठवणींचा झोका—–दिवेलागणीची वेळ—–पळसखेडची गाणी—-पक्षांचे लक्ष थवे—–पानझड—-पावसाळी कविता—–यशवंतराव चव्हाण—–रानातल्या कविता—–शरद पवार आणि मी——-शेती, आत्मनाश व संजीवन

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर 3

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती
ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर 4

Na.dho.mahanor नामदेव धोंडो महानोर

संकलन

माधव विद्वांस

 

Leave a Reply

error: Content is protected !!