Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BUSINESSINDIAMAHARASHTRA

Marathi नवी मुंबई चे संग्राम पाटील यांची व्यवस्थापन समिती सदस्यपदी निवड.

1 Mins read

पुणे : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुणे येथे महाराष्ट्रातील विविध Marathi मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली होती
व मराठी नववर्षाचे स्वागत करुन गुढीपाडव्यापासून मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ (नि.) स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले.

सर्व Marathi मराठी बांधकाम व्यावसायिकांची एक शिखर संघटना तयार करुन त्याद्वारे मोठ्या संख्येने सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे उपलब्ध करुन देणे हा मुख्य उद्देश डोळयासमोर ठेवून मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाची स्थापना करण्यात येत आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवार दि.

८ एप्रिल रोजी पुणे येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झाला.

महाराष्ट्रातून विविध प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत सुरेश हावरे, अजित मराठे, प्रकाश बाविस्कर, पुणे येथील मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे एस. आर. कुलकर्णी, अकुंश अरावे, गजेंद्र पवार, नितीन देशपांडे, प्रमोद पाटील, रविंद्र पाटे, श्रीनिवास बडवे, मिलिंद देशपांडे इत्यादी उपस्थित होते.

त्या बैठकीतून महासंघाची धोरणे , उद्दिष्ठे, योजना यावरून पुढील कार्यक्रम आखण्यात आला.

Also Read : https://www.postboxindia.com/attack-on-pawar-पवारांच्या-घरावरील-हल्/

राज्य मराठी, सरकार मराठी, रहिवासी जास्तीत जास्त Marathi मराठी तर मराठी बांधकाम व्यावसायिक सुध्दा जास्तीत जास्त मराठी असले पाहिजे

व मराठी तरुणांना या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे व ग्राहकांच्या समस्या सामंजस्याने व सरकार दरबारी मांडून सहजगत्या सोडविल्या पाहिजे

व ग्राहकांच्या बजेटमधील घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

अशा प्रकारचा सूर बैठकीत उमटला व खालील उद्देशाकरीता प्रत्येक जिल्हयात, शहरात आणि नियोजन प्राधिकरण क्षेत्रात महासंघाचे कार्यालय

आणि स्थानिक मराठी व्यावसायिक संघटनांना संलग्न करून सामूहिकरीत्या प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने या महासंघाची स्थापना करण्यात आलेली आहे.

संघटनेचा मुख्य उद्देश : संपूर्ण महाराष्ट्रामधील Marathi  मराठी बांधकाम व्यावसायिकांना एकत्रित आणून संघटित पाठबळ उभे करणे,

बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन कायदेशीर व इतर बदलांची माहिती करून देणे, सभासदांचे व्यावसायिक मनोबल वाढविणे, तसेच महासंघाद्वारे सामाजिक प्रगती साधणे,

ग्राहकांचे प्रश्न सोडविणे, ग्राहक व विकासक यांच्या वादामध्ये समेट घडवून आणणे, सर्व सामान्यांना परवडतील अशा किंमतीमध्ये

अधिकाधिक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घरे उपलब्ध करुन देणे, परवडतील अश्या घरांच्या उपलब्धतेकरीता सरकार दप्तरी योग्य सूचना करणे,

परवडणाऱ्या घराच्या निर्मितीसाठी बांधकामाचा खर्च आटोक्यात राहावा यादृष्टीने एकत्रितपणे बांधकाम साहित्याची खरेदी करणे,

परवडणाऱ्या घराच्या निर्मितीसाठी Marathi मराठी बांधकाम व्यावसायिकांचे योग्य प्रशिक्षण करणे, प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत या दृष्टीकोनातून

मराठी बांधकाम व्यावसायिकांना विविध संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

विविध उद्देशाने Marathi मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ महाराष्ट्र स्तरावर स्थापन करण्यात येत आहे. या महासंघामध्ये केवळ

मराठी बांधकाम व्यावसायिक बांधवच सदस्य होऊ शकतात. तसेच महाराष्ट्रातील इतर Marathi  मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना / संस्था या महासंघास संलग्न होऊ शकतात. महासंघाचे संपूर्ण कामकाज व कार्यक्रम हे पूर्णपणे मराठी भाषेमध्ये करण्यात येणार आहे.

Marathi  मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, पुणे हे पहिल्या वर्षाचे निमंत्रक यजमान आहेत.

नवी मुंबई चे तेजस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा संग्राम पाटील यांची मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ, महाराष्ट्र राज्य व्यवस्थापन समिती सदस्यपदी निवड झाली आहे.

संग्राम पाटील यांच्या निवडीमुळे नवी मुंबई तील मराठी बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्या मध्ये सुसंवाद योग्य पद्धतीने होईल.

तसेच अनेक प्रश्न मार्गाला लागून महासंघाच्या वाढीला आणि यशस्वी करण्यासाठी त्यांचा नवी मुंबईतील जनसंपर्क महत्वाचा दुवा ठरू शकतो, असे प्रतिपादन नवी मुंबईतील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले.

अधिकाधिक संख्येने महाराष्ट्रभरातून मराठी बांधकाम व्यावसायिकांनी [email protected] या ईमेलवर संपर्क साधून नोंदणी करावी असे आव्हान नंदू घाटे, अध्यक्ष- मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन, पुणे व प्रकाश बाविस्कर, विकासक, नवीमुंबई यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!