Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

mahatma gandhi गांधी विरुद्ध नथुराम – डॉ. प्रदीप पाटील

1 Mins read

निशस्त्र mahatma gandhi गांधीजींना मारण्यासाठी बेरेट्टा एम हे “पिस्तूल” वापरण्यात आले.. नथूरामाकडून!
म्हणजेच नथुराम हा भित्रा आणि नीच होता हे सिद्ध होते.

तोच नव्हे तर त्याच्या बरोबर असलेले त्याच्या गुंड टोळीतले सर्वच जण भित्रे होते!!
भारताच्या फाळणीचा प्रश्न आणि ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देणे हे दोन विषय १९३४ साली अस्तित्वात नव्हते.. तरीदेखील नथूरामाने mahatma gandhi गांधीजींना मारायचा प्रयत्न केला होता!

२५ जून १९३४ रोजी अस्पृश्यता विरोधी आंदोलन करण्याच्या मोहिमे अंतर्गत गांधीजी पुण्यामध्ये आले असताना नथूरामी टोळीने बॉम्ब भिरकावला. पण तो mahatma gandhi गांधीजींच्या पुढच्या कारवर पडल्याने गांधीजी वाचले. याचाच अर्थ भित्रा नथुराम गांधीजींना घाबरत होता!

१९४४ साली mahatma gandhi गांधीजी पाचगणी येथे आले असता नथुरामाने हातात सुरा घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी भि. दा. भिलारे गुरुजी यांनी mahatma gandhi गांधीजींचे प्राण वाचवले. भित्र्या नथूरामाकडून यापेक्षा वेगळे आणखी काय अपेक्षित असणार?

ग्वाल्हेर हिंदू महासभेच्या वृत्तपत्रात लगेच असे छापून आले होते की गांधीजी व नेहरू यांचा खून केला पाहिजे! भडकू नथुरामाला यापासून प्रेरणा न मिळाल्यास नवल!

mahatma gandhi गांधीजींच्या खुनाच्या खटल्याचे न्यायाधिश न्या. कपूर यांच्यापुढे साक्ष देताना मीरत रेंजचे डी.आय.जी. बी.बी.एस. जेटली म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यानंतर लगेच शस्त्रे गोळा करून खेडी आणि काही व्यक्ती निवडून त्यांच्यावर हल्ले करण्याचा कट केला म्हणून ७०० संघी लोकांवर खटले भरले गेले.’
फाळणीचा विषय देखील नव्हता अशा वेळेपासून गांधी-नेहरूंना संपविण्याच्या कारवाया चालू होत्या.

नथुरामी पिलावळ निव्वळ भित्री नव्हती तर ते खोटारडीही होती. “मी एकट्यानेच mahatma gandhi गांधीजींचा खून केला. माझ्याबरोबर कोणीही सोबती नव्हते.” असे धडधडीत खोटं जो बोलू शकतो त्याला म्हणतात नथुराम!!

दिल्लीत २० जानेवारीला बॉम्बस्फोट घडवण्यासाठी हॉटेलमध्ये खोटे नाव घेऊन राहणारा म्हणजे खोटारडा नथुराम आणि त्याची आपटे-करकरे वगैरेची टोळी.

हिंदू महासभेच्या भवनात या सहा जणांबरोबर बैठक घेऊन गांधीजींच्या खुनाचा कट रचणारा खोटारडा नथुराम
“मी खून केलाच नाही. माझा कुणाशी काही संबंध नाही.” असे न्यायालयात खोटेच सांगणारा खोटारडा नथुराम!!

न्यायालयात स्वतःचा बचाव करणारा भित्रा नथुराम गांधीजींच्या खुनाची कारणे जी सांगत होता ती सर्व खोटी होती. भारताचा फाळणीचा विषय नव्हता तेव्हापासून नथुराम गांधीजींना मारण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे कोर्टात आरडाओरडा करत हे सांगणारा नथुराम पूर्ण उघडा पडलेला आहे…

१३ जानेवारी १९४८ ला mahatma gandhi गांधीजींनी दिल्लीत जे शेवटचे उपोषण केले ते ५५ कोटी आणि फाळणीसाठी अजिबात नव्हते. तर बंगाल व दिल्ली मध्ये उसळलेल्या दंगली थांबाव्यात यासाठी ते केले होते.

पण नथुराम आणि नथुरामाशी मधुर संबंध असलेले आजचे राजकारणातले चेले वाट्टेल ते फेकत राहून गांधीजींना जबाबदार धरतात. बदनामी करतात.

बिनडोक नथुराम, mahatma gandhi गांधीजीं मुस्लिमांचे लाड करतात असे खुनशीपणाने बडबडत असे. वास्तवात स्वामी विवेकानंदांनी असे म्हटले होते, मुस्लिमांशी सलोख्याने वागणे हाच खरा धर्म आहे. अनेक हिंदुनी मुस्लिम धर्म तलवारीने स्वीकारलेला नाही. आणि हिंदूंच्या सामाजिक विषमतेमुळे हिंदूंनी स्वतःचा धर्म सोडला. याविषयी नथुरामाची मुठी लुळी पडते.

हिंदुत्ववाद्यांचे लाडके लोकमान्य टिळक यांनी बॅरिस्टर जीना यांच्याबरोबर १९१६ मध्ये लखनऊ करार केला आणि या करारानुसार पाकिस्तान व भारत अशी दोन राष्ट्रे असावी या तत्त्वाला मान्यता दिली.

मुसलमानांना विधिमंडळात तेहतीस टक्के जागा दिली. एवढेच नव्हे तर मुसलमानांच्या हातात देशाची सत्ता द्यावी असेही एक वेळ टिळक बोलून गेले. पण नथुरामाला टिळक दिसलेच नाहीत.

“अनुनय, अनुनय” असा शब्द वापरीत नथु रामाचे दलाल आज राजकारणात आणि भारतात सगळीकडे पसरलेले आहेत…!! त्यांना फक्त गांधी दिसतात.

खुद्द सावरकरांनी नथुराम आणि त्याची टोळी यांच्याशी माझा काही संबंध नाही म्हणत कोर्टात कानावर हात ठेवले याविषयी हिंदुत्ववाद्यांना काहीच माहिती नसावे इतपत ते अडाणी निश्चित नाहीत!! शेवटी नथुरामा इतकेच तेही लबाडच ना!!

सरदार वल्लभ भाई पटेल यांनी १८ जुलै १९४८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांच्या कारवायांविषयी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना एक पत्र पाठवले.

त्या पत्रात ते म्हणतात, “संघ व हिंदू महासभा यांच्या कारवायांमुळे विशेषता संघाच्या कारवायांमुळे गांधींचा खून झाला अशी आमची म्हणजे गृह खात्याची माहिती आहे. रा. स्व. संघाने सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. रा. स्व. संघ विध्वंसक आणि घातपाती कारवाया यात गुंतलेला आहे “

११ सप्टेंबर १९४८ रोजी त्यांनी दुसरे पत्र संघाचे सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजीना पाठवले होते. त्यात ते म्हणतात, ” सुडाने पेटून संघ मुस्लिमांवर हल्ले करीत आहे. संघाच्या नेत्यांची भाषणे जातीय द्वेषाने आणि विकाराने भरलेली आहेत. संघाच्या या जातीय विखारानेच गांधींचा बळी घेतला आहे.

mahatma gandhi गांधींच्या खुनानंतर संघाच्या लोकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे. देशाच्या अनेक भागात संघाच्या लोकांनी हिंसाचार, जाळपोळ, लुटालुट, दरोडेखोरी करून अनेकांचे खून पाडले आहेत. गांधींच्या खुनाला संघ जबाबदार आहे.

” नथुरामाच्या डोक्यात mahatma gandhi गांधी गेला त्याला आम्ही काय करू असा कांगावा आता कुणीही करू शकत नाही.. कारण सरदार वल्लभभाई पटेल खोटे बोलत आहेत असा त्याचा अर्थ होईल. ते पुढे म्हणतात, “लष्करी किंवा निमलष्करी धरतीची ही संघटना गुप्तता बाळगते. त्यामुळे तिच्यापासून खूप मोठा धोका आहे.”

नथुरामाने mahatma gandhi गांधीजींचा खून केल्यावर देखील हिंदू महासभेच्या नेत्यांची टकळी चालू होती. त्यांचा एक गुंड नेता वि. ध. देशपांडे बिहारमध्ये भाषण देताना म्हणाला..” नेहरू आणि पटेल यांना फाशी देण्यात यावे”
नथुरामी प्रवृत्ती, नथुरामी पक्ष, नथुरामी संघटना, या त्यावेळीही होत्या आणि आजही आहेत!

आज तर नथुरामी सिनेमे येत आहेत. नथुरामी नाटके तर येऊनच गेली. याचा अर्थ हिंसा आणि खोटारडेपणा यांना खतपाणी घालणारे “हिंदुस्थान” उदयाला आलेलं आहे.

‘गांधीहत्या आणि मी’, ‘ ५५ कोटींचे बळी’ ही दोन्ही पुस्तके म्हणजे खोटारडेपणाचा उत्तम नमुना आहेत.
गांधींचे तिसरे चिरंजीव रामदास गांधी व नथुराम यांची अंबाला तुरुंगात भेट झाली असे भासविले गेले आहे जे खोटे आहे.

श्रीकृष्ण, अर्जुन, राम, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, यांच्या प्रमाणे मी गांधीजींचा म्हणजे शत्रूचा वध केला असे म्हणणारा नथुराम कांगावखोर आहे… त्याला हे समजत नाही की त्या सर्व मोठ्या व्यक्तींनी जो शत्रू वध केला तो शस्त्र हाती घेतलेल्या शत्रूंचा. गांधीजी निशस्त्र होते.

जो माणूस केवळ पंचावर फिरतो, त्याला मारण्यात कसला आला आहे वध? तो तर बुळचटपणा झाला! गल्लीतला फाळकूट दादा म्हणतात याला. आणि डोके बिघडलेल्या नथुरामाने हे न केल्यास नवलच !

नथू रामाने हसत मृत्यू स्वीकारला याच्या इतकी मोठी थाप इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. न्यायमूर्ती खोसला यांच्या ” दि मर्डर ऑफ महात्मा” या पुस्तकात त्यांनी नथुरामाच्या फाशीच्या या शेवटच्या क्षणांचे वर्णन केले आहे ते असे –
” नाना आपटेच्या पुढे नथुराम चालताना त्याचे पाय लडखडत होते. अत्यंत घाबरलेला असा चेहरा आणि चाल स्पष्ट दिसत होती. ते लपवण्यासाठी तो भारत मातेचा नारा देत होता. पण तो आवाजही चिरकल्या सारखा येत होता. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत होता.

नाना आपटेचा फाशी दिल्यानंतर लगेच मृत्यू झाला. पण नथुरामाचे धड बराच काळ तडफडत होते. प्राण जाण्यापुर्वी पंधरा मिनिटे त्याची ही तडफड चालू होती”

 हा कसला वीर नथुराम? हा तर पळपुटा नथुराम! अशा पळपुट्या नथुरामांचे वारस आज दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, यांचे खून भ्याडासारखे करत बसले आहेत.

१४ जानेवारी १९४८ या दिवशी प्रबोधनकार ठाकरे लिहितात, ” चालू घडीला हिंदुत्वनिष्ठेच्या मुखवट्याखाली चाललेल्या या लोकांच्या उघड गुप्त खटपटी ब्राह्मणी सत्तेच्या प्रस्थापनेसाठीच आहेत. महात्मा गांधींच्या राजकारण प्रवेशापूर्वी हे लोक स्वतःला राष्ट्रीय म्हणवित असत.

यांचा पक्ष राष्ट्रीय, यांचे पुढारी राष्ट्रीय, त्यांची व्याख्याने, वर्तमानपत्रे, कीर्तने, ग्रंथ, मेळे सर्व काही राष्ट्रीयच राष्ट्रीय !! आता ते हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. mahatma gandhi गांधी, नेहरू, पटेल हे जीव पणाला लावून हिंदवी नागरिकत्वाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी लढत असताना त्यांची निरर्गल शब्दात निंदा पुणेरी पत्रात रोज चालू असते. गांधी जगदवंद्य असताना पेशवाई पिंडाचा हरेक आसामी आणि त्यांची वृत्तपत्रे महात्मा गांधींना अचकट-विचकट शिव्या देऊन आपल्या पिढीजात खुनसटपनाचे प्रदर्शन करत असतात…!”
 प्रबोधनकार आजही सत्य ठरताहेत..

आजही तीच परिस्थिती आहे. फरक असेल तर तो एवढाच की या रानटी हिंस्त्र खोटारड्या गुन्हेगार नथुरामाचे सिनेमे काढण्यापर्यंत मजल पोहोचली आहे.

हिंदूंचा आहे तो राम आणि हिंदुत्ववाद्यांचा आहे तो नथुराम.

 देशभक्त नव्हे द्वेष भक्त नथुराम !

– डॉ. प्रदीप पाटील

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!