Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

Mahatma Fule क्रांतीसूर्य महात्मा फुले

1 Mins read

विद्येविना मती गेली
मतीविना निती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले..

असा शिक्षणाचा संदेश देणारे क्रांतीसूर्य Mahatma Fule महात्मा फुले यांना १९५ व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..!

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर जगणं व त्यांचे विचार आत्मसात करून ते कृतीत उतरवणं म्हणजेच पुरोगामी असणं आहे असे मला वाटते. महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार होणे म्हणजे कृतीशील सुधारक होणे होय.

विचार मांडणे/ लिहिणे व ते आपल्या व्यक्तिगत जीवनात अंमलात आणणे यात फरक आहे. आज
अनेक लोक आपल्याच महापुरूषांचा गरजेपुरता वापर करताना दिसतात ही चिंतेची गोष्ट आहे.

मग जेव्हा विषय येतो पुरोगामी चळवळी नामशेष होताहेत का? त्याची कारणे काय ?

तेव्हा त्याचे उत्तर हे आपणच असतो. चळवळीत काम करतो असे म्हणणारेच संत तुकारामांच्या भाषेत दांभिकपणे वागत आहेत असे अनेकदा दिसते.

आपला इतिहास आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही पण तो समजून घेतल्यावर त्यात आजच्या परिस्थितीत आपण काय बदल करायला हवेत ते समजून घेणे व ते कृतीत आणणे म्हणजे परिवर्तन होय.

पण ते प्रत्यक्ष कृतीत आणायला मात्र आपलेच अनेकजण मागे राहातात किंवा घाबरतात. आपला धार्मिक रेटा व हिंदुत्ववादी रेटा इतका प्रखर आहे की तेथे आपले काय वाईट होईल ही रिस्क नको म्हणून अनेक धार्मिक व पारंपारिक गोष्टी आपण करत रहातो.

मग प्रश्न असा येतो की आपण नेमके Mahatma Fule महात्मा फुले यांचे विचार काय समजून घेतलेय..? त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या विरोधात जाऊन प्रसंगी घर सोडून सावित्रीबाईला शिकवले.

मुली शिकल्या तर घर, कुटुंब सुधारेल हे लक्षात घेतले व सर्वांच्या ते आणून दिले. पुढे सावित्रीबाईंनी ‘शिक्षणाने पशुत्व हटते पहा’ अशी अनेक काव्यफुले आपल्या ओंजळीत घातली.

इंग्रजीचे महत्व सांगितले. ती आपली विद्येची देवता झाली. ती घराबाहेर पडली म्हणून आज आपण एक मुक्त व मोकळा श्वास घेत आहोत. दोघां उभयतांचे आपल्या एकूणच स्त्री जातीवर अनंत उपकार आहेत. तरीही आजही आपण न पाहिलेल्या सरस्वतीचे पूजन करण्यात गुंतलो आहोत.

हे वास्तव नाकारतां येत नाही. अनेक शाळा व महाविद्यालयात आजही सरस्वती पूजन केले जाते. ते ज्यांना करायचे ते जरूर करा. पण त्यासोबत सावित्रीची आठवण काढा. तिच्यामुळे आज आपण सर्व क्षेत्रात एक उंच भरारी घेत आहोत याची जाणीव ठेवा.

आपला शिक्षित समाज आजही मानसिक गुलामीत का जगत आहे याचे आश्चर्य वाटते. Mahatma Fule महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म अशी अनेक पुस्तके लिहून आपल्याला सतत जागे करायचा व आपले प्रश्न मांडायचा प्रयत्न केला आहे.

पण आजही आपण त्यावाटेला का जात नाही.? त्यांनी लिहिलेले व त्यांच्यावर अनेकांनी लिहिलेले आपण का वाचत नाही.?

सर्व बहुजनांसाठी यांनी आपले आयुष्य वेचले व विशेषतः ब्राह्मण महिलांसाठी त्यांना अन्याय व अत्याचारातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड काम केले तरीही ते आपले का नाही होऊ शकत ?

 

Also Read : https://postboxlive.com/stock-market-market-outlook-for-this-week-4/

या महापुरूषांना जातीत का बंदिस्त केले जातेय.? यामागचे षडयंत्र समजून घेऊन आपण पुढे जायला हवे.

      बहुजनांसाठी तर त्यांनी प्रचंड काम केले पण ब्राह्मण विधवा महिला/ उपेक्षित/ गरजू/ फसलेल्या महिला यांनाही त्यांना प्रचंड आधार दिला.

आपल्या घरी त्यांची बाळंतपणे केली. मुलं सांभाळली. बालविधवांचे केशवपन थांबावे व ती प्रथा बंद व्हावी म्हणून पहिला न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणला.

हे का विसरायला भाग पाडले जातेय.? तर त्यांनी सनातन्यांविरूध्द सतत बंड पुकारले. मनुवादावर सतत बोलले. इतकेच नव्हे तर अगदी भगवतगीता व संत ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांची त्यांनी चिकित्सा केली.

वर्णवर्चस्ववादावर काही संत का बोलले नाहीत म्हणूनही त्यांनी प्रश्न निर्माण केले. हिंदू धर्मात जन्म होऊनही त्यांनी धर्मातील अनिष्ट चालीरिती व रूढी परंपरांवर भाष्य केले. धर्माची चिकित्सा केली.

त्यांचे परखड व स्पष्ट विचारांमुळे सनातनी व्यवस्थेचा पाया डळमळीत झाला व ती होण्याची सततची भीती यामुळे फुले आजही पटत नाहीत व पचतही नाहीत हे वास्तव नाकारतां येत नाही.

त्यामुळेच आजही राज्यपालांसारखे उच्चपदस्थ लोकही यांना नाकारतांना दिसतात. जातवास्तव, वर्णव्यवस्था व वर्गव्यवस्था आजही जीवंत ठेवायचा प्रयत्न सुरू आहे.

तेव्हा आपण सावध होऊन आपल्याला बदलण्याची व जागृत होण्याची गरज आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

महापुरूषांचे पूजन करून त्यांना अभिवादन करणे अशीच त्यांची जयंती केवळ साजरी करता कामा नये तर त्यांचे विचार समजून घेऊन आपण प्रवाही होणे, कृतीशील होणे म्हणजे जयंती साजरी होणे होय..!!

 

 

ॲड. शैलजा मोळक

मो. 9823627244

Leave a Reply

error: Content is protected !!