Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

maharashtrian woman – सासुरवासापेक्षा भयानक असू शकतो माहेरवास

1 Mins read

Maharashtrian woman सासुरवासापेक्षा भयानक असू शकतो माहेरवास..

अनेकदा maharashtrian woman महिलांचे प्रश्न सोडवताना आपल्याकडे त्यांना पती पासून होणारा त्रास, सासरच्या लोकांकडून होणारा मनस्ताप, सासुर वास या बदल समस्या येत असतात. महिला देखील होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात ताबडतोब पोलीस स्टेशन, कोर्ट, महिला आयोग इथे जायला आणि दाद मागायला तत्पर असतात. कारण महिलांना पती आणि सासरच्या लोकांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल कायदे आहेत आणि ते सर्वश्रुत आहेत. या कायद्यांचा वापर करून स्वतः चा इगो सुखावणं महिलांना समाधान देत.

maharashtrian woman 5

maharashtrian woman 5

पतीकडून पोटगी घेणे का तर त्याच ते कर्तव्य आहे, त्याला ते चुकणार नाही (मग भले संसारात चूक कोणाचीही असो ), तो मला मारतो, तो व्यसन करतो, त्याच्या घरात मला काम करावं लागत, त्याची आई मला स्वयंपाक घरात कायमच टोकत असते, त्यांना माझ्या शिक्षणाची किंमत नाही, मी काही कामवाली आहे का? तसंच मला सासरी स्वतंत्र नाहीये, माझ्या भावना कोणीच सासरी समजून घेत नाही. माझं सासरी माझं कौतुक होत नाही या सारख्या असंख्य तक्रारी महिलांना असतात.
यावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे माहेरी येऊन राहणे आणि पतीला कोर्टात खेचणे हाच आहे यावर महिलांचा दृढ विश्वास असतो.
जसं लग्न झाल्यावर सासरी गेल्यावर नव्याची नवलाई जास्त दिवस टिकत नाही .

maharashtrian woman 4

maharashtrian woman 4

तसंच सासरी त्रास झाला म्हणून रागावून माहेरी आलेल्या आणि मग कायम स्वरूपी माहेरीच राहिलेल्या maharashtrian woman महिलांच्या बाबतीत घडत. सुरुवातीला माहेर चे सगळे सहानुभूती दाखवतात, आपल्या दुःखावर फुंकर घालतात, धावपळ करू लागतात. आपल्या सोबत मुलं बाळही माहेरी आली असतील तर त्यांना पण प्रेमाने जवळ करतात. या महिला व्हिक्टिम मेन्टॅलिटी घेऊन जगत असतात .
सासरी माझाच कसा अतोनात छळ झाला आणि मी कशी बरोबर होते आणि आहे हे सगळ्यांना त्यांनी पुरेपूर पटून द्यायचा प्रयत्न माहेरी आणि नातेवाईक मध्ये चालवलेला असतो.
पण या कालावधीत त्या स्वतः चा प्रॉब्लेम, स्वतः चा दुःख सगळ्यांना सांगत सुटतात आणि स्वतःचीच बदनामी करून घेतात. स्वतः च्याच तोंडाने शेजारी पाजारी नात्यात, मित्र मैत्रिणींना आपल्या तुटलेल्या संसाराची, आपला नवरा कसा व्हिलन आहे याची कर्म कहाणी रडून रडून सांगणाऱ्या महिला हे विसरून जातात, की यातील कोण तुम्हाला तुमच्या समस्येवर अचूक मार्गदर्शन करणार आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या चार चुका दाखवून परत संसाराकडे वळवणार आहे.
आपला समाज एखाद्याची चूक पटकन काढतो पण ती चूक स्वीकारून तिला सुधरवायला खरंच किती जण पुढाकार घेतात?
आपल्याला पळवाट दाखविण्यापेक्ष वाट किती जण दाखवतात हे त्या वेळी ओळखणं सगळ्या maharashtrian woman महिलांना जमत नाही. त्यामुळे हे मंतरलेले माहेरपण जसजसे दिवस पुढे जातात तसतसं त्रासदायक होऊ लागत.

maharashtrian woman 3

maharashtrian woman 3

सासरच्या घरात आणि आपल्यात कोर्ट, कचेरी, फारकत यामुळे बरंच अंतर पडून गेलेलं असत.
प्रत्येक वेळी माहेरचे पहिल्या लग्नाची फारकत झाली म्हणून स्वतः च्या मुलीचे दुसरे लग्न लावायला तयार होतीलच असेही नसते. त्यातून महिलेला पहिल्या पतीपासून मुलं असतील तर ती पण माहेरी राहून आई वडील भाऊ यांच्या सहकार्याने आयुष्य घालवत राहाते. ती कमावती असेल तर दिवस थोडे बरे जातात पण तरी लोकांचे टोमणे, विचित्र नजर, अगदी जवळच्या शेजारच्या maharashtrian woman महिलांचे खोचक बोलणे काहीही केल तरी कानावर पडतेच.
ऑफिस मधील सहकारी महिला देखील याला अपवाद नाहीत.

maharashtrian woman 2

maharashtrian woman 2

मग हा माहेरवास कसा वेदनादायी आहे याची त्या maharashtrian woman महिलेला हळू हळू जाणीव होऊ लागते तरी अजून पुढे पूर्ण आयुष्य कस जाणार यावर काहीही ठोस विचार केला जात नाही. माहेरच्या लोकांना अंगवळणी पडायला लागते की हि आता कायमस्वरूपी आपल्या जवळच राहणार आहे. मग सुरु होते प्रत्येकाने तिला गृहीत धरणे. वास्तविक हिला काय मानसिक त्रास होतोय, हिला आपल्याकडून काही अपेक्षा आहेत का, किंवा हिला दुसरं लग्न करून सेटल व्हायचं आहे का यावर खूपदा आईवडील विचार करत नाहीत. पहिल्याच पतीच्या घरी थोडं मिळतंजुळतं घेऊन हि परत नांदू शकते का यावर विचार करायची तसदी पण मुलीचे आईवडील घेत नाहीत. आता कायम माहेरीच राहायचं म्हटल्यावर तेथील जबाबदाऱ्या पण घ्याव्याच लागतात. आपले आर्थिक योगदान, घरकामात पुढाकार घेणं, आपल्या आई वडिलांना हवं नको पाहणं, त्यांचं उतार वय लागल्यावर त्यांना उपचार तब्येत ची काळजी, घरातील इतर अडी अडचणी सोडवणे यात पर्याय राहत नाही. सासरी ज्या कामांचा आपण अवडंबर करतो तीच काम माहेरी निमूटपणे प्रसंगी दोन शब्द ऐकून करावीच लागतात.

maharashtrian woman 1

maharashtrian woman 1

त्यातून आता इतरांना देखील आपल्या दुखाबाबत काही वाटेनासे झालेले असते. शेजारी, नातेवाईक आता सल्ले देऊन शांत झालेले असतात. आपला संसार तुटलाय याच्याशी कोणाला काहीही घेणंदेणं नसत. आपली मात्र स्वतः शीच वैचारिक लढाई सुरु असते. माहेरी राहून पण ती महिला सुखी समाधानी नसते. जर ऍडजस्ट करायचाच आहे आयुष्यात तर ते सासर च्या माणसांना आपलंस करून का घेऊ नये, शेजारचे, नात्यातले, सहकारी यांचे टोमणे ऐकण्यापेक्षा सासूबाई चा एखादा शब्द का सहन करू नये. समाजातील इतर वाईट नजरांना सामोरं जाण्यापेक्षा आपल्याच हक्काच्या नवऱ्याला गोडीत घेऊन बदलण्याची संधी का देऊ नये, परक्या आणि आपल्याशी काही घेणं देण नसलेल्या लोकांना आपलं सुख दुःख सांगून आपणच आपल्या आयुष्याच् स्टिअरिंग त्यांच्या हातात देण्यापेक्षा आपल्या सासरच्या कायद्याने धर्माने आपल्याला बांधल्या गेलेल्या लोकां समोर का व्यक्त होऊ नये.
यावर प्रत्येक maharashtrian woman महिलेने विचार करावा. 

 

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

शिक्षणमहर्षी - कर्मवीर भाऊराव पाटील

error: Content is protected !!