Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Maharashtra cm name – महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ?

1 Mins read

Maharashtra cm name – महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ?

 

Maharashtra cm name – महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ? भाग -३ मुलाखत – सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील

 

 

उपेक्षित कलावंतांना
जवळ केले पाहिजे.

सौ. नंदिनीदेवी विजयसिंह
मोहिते-पाटील

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदासाठी सक्षम आणि कणखर नेतृत्व कोण असेल हे जनता आणि भविष्यातील राजकीय घडामोडीच ठरवतील. संपूर्ण महाराष्ट्रात सामान्यपणे

महिला मुख्यमंत्री पदासाठी कोण कसे पात्र ठरेल हे जनता ठरवेल. आम्ही सुरु केलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सक्षम कर्तृत्ववान जबाबदार स्त्रीचे व्यक्तिमत्व

जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एका स्त्री कडे मुख्यमंत्रीपद गेल्यास जनतेला आनंदच होईल, जाणून घेऊया आजच्या

मुलाखतीच्या माध्यमातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सौ नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते – पाटील यांच्याबद्दल. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, ता. माळशिरस

येथे ‘मोहिते पाटील’ याच्या घराण्यातील सहकारमहर्षी कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांचे नाव महाराष्ट्रात कोणास परिचित नाही, असे नाही.

मुलाखतीसाठी मुंबई-अकलूज येथे फोनवर संपर्क साधला. मुद्दाम मुलाखतीसाठी जायचे काही प्रयोजन नव्हतेच. त्यांनी फोनवरच मुलाखत घ्या, सर्व माहिती

तुम्हांला आहेच. अधिक काय बोलावयाचे, ते फोनवरच बोला, असे सांगितले आणि ही आगळीवेगळी मुलाखत फोनवरुन झाली. सौ. वहिनींचे माहेर मांगूर,

ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव, श्री. आप्पासाहेब माने (भीमबहादर) यांच्या त्या कन्या कु. अरुणा. सौ. वहिनींचे आजोळ-रेठरे बुद्रुक, जि. सातारा कॅप्टन शंकरराव मोहिते

( कमिशनर ) त्यांचे मामा. बालपण अगदी साचेबंद खानदानी मराठा कुंटुंबाप्रमाणेच होते. सौ. वहिनींचा विवाह ठरवून झाला, अर्थात अरेंज मॅरेज.

Maharashtra cm name मा. विजयसिंह मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मागील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारात काम पाहिले.

त्यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच होते, सासरे कै. शंकरराव मोहिते-पाटील त्या वेळचे आमदार. सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन व सोलापूर जिल्हा भू-विकास बँकेचे चेअरमन होते. विवाह अकलूज येथे १९७१ साली झाला. महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध नेते, उद्योगपती, तसेच, सर्वसामान्य जनता, जवळ जवळ एक लाख लोक उपस्थित होते. विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व एक लाख लोकांना जेवण्यासाठी आग्रहाने थांबवून व्यवस्था केली होती. त्या वेळी त्या विवाहातील लक्षभोजनाची बातमी बी.बी.सी. लंडन येथून प्रसिद्ध झाली व देशभर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा कै. शंकरराव मोहिते-पाटील म्हणाले होते, “मी ग्रामीण शेतकरी आमदार. मी सर्वांच्या लग्न-प्रसंगी जातीने उपस्थित राहिलो आहे. माझ्या घरी शुभकार्य असल्याने मी सर्वांना बोलावून भोजनास थांबवून घेतले, यात मी भारतीय संस्कृतीचे पालन केले.” मोहिते-पाटील कुटुंबाविषयी जिव्हाळा असल्यामुळेच इतकी मंडळी विवाहास उपस्थित होती. कै. शंकरराव मोहिते-पाटील यांची ज्येष्ठ सून नात्याने त्या घरात प्रवेश केल्यापासून माझ्यावर जबाबदारी पडली. सासूबाई रत्नप्रभादेवी यांची मायेची सावली आहे; परंतु मा. दादाचे बंधू राजसिंह, जयसिंह, मदनसिंह, प्रतापसिंह, उदयसिंह व तीन भगिनी अरुणा, गिरीजा, जयश्री यांची मोठी वहिनी म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी पडली. सासरे कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला-क्रिडा व सहकार या अनेक क्षेत्रांत शक्तीने पर्वतक्षितिजावर आपली मुद्रा कोरली. कोणाचीही दृष्ट लागावी असे सर्वांगसुंदर भव्य काम अल्पावधीमध्ये निर्माण केले. त्यांची सून होण्याचे भाग्य मला लाभले. राजकारणाविषयी व सहकाराविषयी बोलताना त्या म्हणाल्या, Maharashtra cm name “मा. दादांनी अकलूज ग्रामपंचायत सरपंचापासून जिल्हा परिषद अध्यक्ष, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री या पदांवर काम केले. एकाच घरातील चार भाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, सामाजिक कार्य. मा. दादांनी व त्यांच्या सर्व बंधूंनी तितकेच चांगल्या रीतीने पार पाडले. कुठलाही सहकारी संस्था नुकसानीत जाऊ दिली नाही. अनेकांना रोजगार, व्यापार उपलब्ध झाला. हा सर्व व्याप सांभाळताना मला मात्र कुटुंबातील लहानसहान गोष्टींकडे जातीने लक्ष द्यावे लागते.

आमच्या एकत्र कुटुंबातील वातावरणाविषयी बोलावयाचे झाले, तर एकमेकांबद्दल आदर राखणे याबद्दल कटाक्ष असायचा आणि आताही असतो. लहानांनी मोठ्यांसमोर कमीत कमी बोलणे असते. मला मात्र बऱ्याच गोष्टीत मध्यस्थाची भूमिका बजवावी लागते. प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहकारातील व राजकारणातील, व्याप असला तरी त्याची फारशी माहिती घरातील स्त्रियांना नसते. सर्व काही वर्तमानपत्रांतून समजते. मी प्रसिद्धीपासून फार दूर असते. देवावर माझी नितांत श्रद्धा आहे.” सहकारी संस्थांविषयी माहिती देताना माझ्यापुढे किती मोठी यादी करावयाची, हा प्रश्न पडला. मी फक्त मोठ्या संस्थांचीच नोंद घेतली. त्यातील काही संस्था अशा पुढीलप्रमाणे
१) कै. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना.अकलूज
२) शंकर सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर
३) मयूर कुक्कुटपालन सहकारी संस्था लि. अकलूज
४) विजय कुक्कुटपालन सहकारी संस्था लि. अकलूज
५) शिवकृपा कुक्कुटपालन सहकारी संस्था लि. अकलूज
६) शिवामृत सहकारी दूध उत्पादक संघ लि., अकलूज
७) कै. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी सूतगिरणी लि. अकलूज
८) कै. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँक लि.
९) माळशिरस तालुका शिक्षण प्रसारक मंडळ लि.
१०) ग्रीन पब्लिक स्कूल.
११) शिवपार्वती ट्रस्ट
१२) विजयसिंह मोहिते-पाटील ट्रस्ट
१३) प्रताप क्रीडा मंडळ,
सोलापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांसह संचालक मंडळ Maharashtra cm name मा. दादांना मानणाऱ्या राजकीय पुढारयांचे आहे. राजकारणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, या विषयापासून मी तशी दूर नसते. कै. शंकरराव मोहिते-पाटील माझे सासरे व पती मा. दादा यांनी दीर्घकाल सर्व कुटुंबीयांसोबत जनतेचे प्रश्न सोडवून त्यांच्या व्यक्तिगत सुख दुःखात त्यांच्यासोबत राहून तसेच सहकाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे काम केले. मुलगा रणजितसिंह महाराष्ट्र युवक काँग्रेस (राष्ट्रवादी)चा अध्यक्ष व विधान परिषदेचा सदस्य होता. आता भाजपात आहे. त्याने काय करावे कोणत्या पक्षात जावे हे सर्व निर्णय जो तो आपल्या कुवतीप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे घेत असतो. दादा मात्र पवारसाहेबांशी आयुष्यभर साथ देतील. कुठलेही सत्तेत पद असेल-नसेल तरी कार्य करीतच राहावयाचे, असा मोहिते-पाटील कुटुंबीयांचा विचार असतो. या सर्व व्यापामध्ये एकमेकांच्या विचारांनी सर्वांना बरोबर घेऊन चालावयाचे, असे चालले आहे.

“अकलूज ग्रामपंचायतीबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, “येथे सर्व काम कॉम्प्युटरने चालते. महाराष्ट्रातील सर्वात कार्यक्षम ग्रामपंचायत आहे. एक कोट रुपये खर्चुन येथे स्विमिंग पूल बांधलेला आहे. कै. शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन हे १००० प्रेक्षकांसाठी अद्ययावत एअर कंडिशन्ड सभागृह आहे. अगत्याविषयी काय विचारता? सर्वांना घेऊन अकलूज पाहायला या, असे त्यांनी जाहीर आमंत्रणच दिले. सर्वांना कुतूहल असणाऱ्या लावणी महोत्सवाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आपल्या चांगल्या वातावरणात महिलांना लावणी पाहण्याची सोय असलेला हा कार्यक्रम आहे. पारंपरिक कला जपण्यासाठी ट्रस्ट आहे. ट्रस्टमार्फत सर्व कलावंतांना विमा, मुलांना शिक्षण, आजारपणासाठी मदत, त्यांना माणुसकीची वागणूक, सर्व काही केले जाते. कलावंतांना मानाने जगता यावे म्हणून फार प्रयत्न केले जातात. महोत्सवाच्या वेळी माझ्या सासूबाई स्वतः जातीने सर्व तमाशा कलावंताना जेवायला वाढत, त्यांची विचारपूस करत. उपेक्षितांना मायेने विचारपूस करत.  “भव्य समारंभ, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री एका वेळी पाच- पन्नास मंत्र्यांची उपस्थिती, मोठे विवाहसमारंभ यांचे आपल्याकडे नियोजन कसे केले जाते?”, याबद्दल विचारताच त्या म्हणाल्या, ‘आम्हाला त्याची पूर्वीपासून सवय आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी, प्रत्येकास नेमून दिलेले काम. जबाबदारी सर्वजण इतकी व्यवस्थित पार पाडतात, की माझ्यावरच काय कोणावर कसलाही ताण नसतो.’
किती बोलावे? किती ऐकावे? खूप काही लिहीण्यासारखे होते. कितीतरी गौरव अंक निघालेले मोहिते-पाटील कुटुंबीयांविषयी त्याची यादी सुद्धा वहिनींनी सांगितली. खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. कलाकारांची कदर असलेली अकलूज नगरी आणि जीवाला जीव लावणारी मोहिते पाटील कुटुंबाच्या नंदिनी वहिनी कुठे तरी मनाला सतत वाटत होते खरंच जर नंदिनी वाहिनी मुख्यमंत्री झाल्या तर माध्यम क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रात आमूलाग्र बदल तर होतील पण कलाकारांची उपेक्षा या महाराष्ट्रात कधीच होणार नाही. वहिनींशी पुन्हा नवीन विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन देत, कोठे तरी ही न थांबणारी चारचा थांबली पाहिजे, हा विचार करीतच ही मुलाखत मी संपवली.

 

 

 

Postbox India Editorial

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

%d bloggers like this: