Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAWorld News

Kohinoor Dimond – गोष्ट कोहिनूर हिऱ्याची

1 Mins read

Kohinoor Dimond – गोष्ट कोहिनूर हिऱ्याची

 

 

 

३ जुलै १८५० रोजी ’कोहिनूर’ हिरा इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

Kohinoor Dimond – कोहिनूर (अर्थ- प्रकाशाचा पर्वत) हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिर्‍यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला मूळचा भारतीय हिरा आहे.

Kohinoor Dimond – कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला नाही. मात्र त्याने कितीतरी मालक बदलले.

कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे.

काही सूत्रांनुसार Kohinoor Dimond – कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता.

 

Kohinoor Dimond - The story of Kohinoor diamond

Kohinoor Dimond – The story of Kohinoor diamond

सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो भारतातील गोवळकोंडा येथील खाणीत सापडला असावा.

पौराणिक कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा हिरा बरोबर घेऊन शिकारीला गेला होता.

तिथे एका सिंहाने त्याला मारून तो मणी नेला. पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर.

श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली.

श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी वरदक्षिणेत मिळाला.

त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे म्हणतात.

Kohinoor Dimond - The story of Kohinoor diamond

Kohinoor Dimond – The story of Kohinoor diamond

१६व्या शतकामधे आलेल्या बाबर बादशहाचा इतिहास, बाबरनामा (इ. सन १५२६ ते १५३०), यात या हिर्‍याचा उल्लेख येतो. मे १५२६ मधे बाबर जेव्हा आग्रा येथे आला,

तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याने तो दिला असावा. पुढे हिरा बाबराचा मुलगा हुमायून याच्याकडे गेला. पुढील २०० वर्षे तो बाबरचा हिरा म्हणून ओळखला जात असे.

काही सूत्रांनुसार ‘ द ग्रेट मुगल’ आणि Kohinoor Dimond – कोहिनूर हे हिरे एकच होत. पुढे हा हिरा मुगलांचे वारसदार शाहजहान व औरंगजेब यांच्याकडे आला.

पर्शियाचा (सध्याचा इराण) नादिर शहा याने मुगलांची दिल्ली व आग्रा ही शहरे लुटली, तेव्हा तो त्यांचे मयूर सिंहासन व कोहिनूर घेऊन मायदेशी परत गेला.

पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर नादिर शहा आश्चर्याने उद्गारला “”कोहइनूर”” म्हणजे “”प्रकाशाचा पर्वत””. तेव्हापासूनच कोहिनूर हे नाव प्रचलित आहे.

इ.सन १७४७ मधे नादिर शहाचा खून झाला व कोहिनूर आला अफ़गाणिस्तानच्या अहमद-शहा-अब्दालीकडे.

इ.सन १८०९ मधे अफ़गाणिस्तानच्या शाह शुजाला पदच्युत करण्यात आले तेव्हा शुजा कोहिनूर घेऊन पळाला.

Kohinoor Dimond - The story of Kohinoor diamond

Kohinoor Dimond – The story of Kohinoor diamond

शुजाने पंजाबचा महाराजा रणजितसिंग याची मदत घेऊन इ.सन १८३९ मधे अफ़गाणिस्तानची गादी परत मिळवली आणि कोहिनूर रणजितसिंगला कृतज्ञतापूर्वक भेट दिला.

Kohinoor Dimond – कोहिनूरचा पुढील इतिहास रक्तलांछितच आहे. पुढे कोहिनूर पंजाबच्या महाराजा रणजितसिंगचा अल्पवयीन मुलगा दलिपसिंग याच्याकडे गेला.

इंग्रजांनी रणजितसिंगाचा लाहोर येथे पराभव करून Kohinoor Dimond – कोहिनूर जिंकला व तो इतर रत्नांबरोबर लंडन येथे बळजबरीने नेऊन राणी व्हिक्टोरिया हिला नजर केला (इ.सन १८४९).

हिर्‍याबरोबर इंग्रजांनी दलिपसिंगलाही इंग्लंडला नेले.

इ.सन १८५३ मधे व्हिक्टोरियाचा पती, अल्बर्ट याने त्याला पुन्हा पैलू पाडायची टूम काढली. अल्बर्टच्या मूर्खपणामुळे त्याचे काही तुकडे वेगळे होऊन मूळ हिर्‍याचे वजनमात्र १८० कॅरेट वरून १०५ कॅरेट एवढे कमी झाले.

सध्या हा हिरा लंडन येथील राणीच्या खजिन्यात (लंडन टॉवर येथे) पहावयास मिळतो.

एकूणच असे म्हणतात की Kohinoor Dimond – कोहिनूर पुरुषांना लाभत नाही. त्याच्या बहुतेक पुरुष मालकांचे दुःखद मृत्यू झाले आहेत.

स्त्रियांना मात्र त्याचा फारसा त्रास झालेला नाही.

भारताने Kohinoor Dimond – कोहिनूर परत मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले होते.

१९४७ साली स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली Kohinoor Dimond –  कोहिनूरची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली होती.

माधव विद्वांस

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting,
Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.
Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online.
We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.
Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!