Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

jay bhim – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 Mins read

jay bhim – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

 

 

jay bhim – धार्मिक सामाजिक वैधानिक आर्थिक व जल व्यवस्थापनाची माहिती

 

 

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूरजवळील महू

या लष्करी छावणीत १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ हे लष्करात सुभेदार होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे हे jay bhim  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव.साताऱ्याच्या शाळेत

बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते.शाळेच्या दप्तरात नोंदवलेले

आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनीडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर,

त्यांनी असे बाळभीमाला सुचविले.

त्याला बाळभीमाने jay bhim लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचे आंबेडकर झाले.

तशी नोंद शाळेत झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले.वडिलांच्या लष्करी पदामुळे इतर जातीचे

लोकांचा विरोध असूनही त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईयेथे एल्फिस्टन हयाकूल मधे प्रवेश मिळाला.

जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे

साहाय्य मिळत नसे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते वर्ष १९०७ मध्ये मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाले.

वर्ष १९०६ मधेच शालेय शिक्षण चालूं असतानाचे दापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.

वर्ष १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी संपादन केली

आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. पुढे बरोडा नरेशांकडून शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरीकेला

कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले.

jay bhim बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ,

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे.त्यांनी वर्ष १९१२ मध्ये बी.ए.,

इ.स. १९१५ मध्ये दोन वेळा एम.ए., वर्ष १९१७ मध्ये पी.एचडी., वर्ष १९२१ मध्ये एम.एस्‌‍सी., वर्ष १९२२

मध्ये बार-ॲट-लॉ, वर्ष १९२३ मध्ये डी.एस्सी., वर्ष १९५२ मध्ये एल्‌एल.डी.,वर्ष १९५३ मध्ये डी.लिट पदव्या मिळवल्या.

शिक्षण चालू असतानाच त्यांना आपल्या समाजासाठी काहीतरी तरी करणे आवश्यक असल्याची जाणीव झाली होती

शिक्षण पूर्ण झालेवर त्यांनी अर्थार्जनाबरोबरच समाजकारणही त्यांनी सुरु केले. १९२६ साली jay bhim

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नियुक्त सदस्य बनले. वर्ष १९२७ च्या सुमारास त्यांनी

अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये

प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. वर्ष १९३० मधे काळाराम मंदिर प्रवेशासाठी

सत्याग्रह केला.

वर्ष १९२७ मध्ये १९ मार्च व २० मार्च रोजी महाड येथे सत्याग्रह झाला. त्या मुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारतात साजरा केला जातो. महाड चवदार तळ्याच्या(तळ्याला चार दारे होती म्हणून चौदारतळे असेही म्हणत) ही दोन मोठी आंदोलने अस्पृश्यते विरोधात त्यांनी उभारली.त्यास मनासारखा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर “हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” असे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथील सभेत जाहीर केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील तमाम मागासवर्गीय समाजाचे दीपस्तंभ म्हणून केलेले कार्य मोठे आहेच.त्याबरोबर भारताची घटना, भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास व रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

भारतात दोन वेळा धार्मिक क्रांती झाली.पहिल्यांदा २३०० वर्षांपूर्वी कलिंगाच्या लढाईत झालेल्या मानवीसंहारामुळे व्यथित झालेल्या सम्राट अशोकाने केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार केला.त्यावेळी राजाश्रय मिळाल्याने बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला.मात्र आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कोणतीही राजसत्ता नसताना आपल्या अनुयायांना वैचारिक पातळीवर एकत्र करून नागपूरच्या दिक्षाभूमीवर धर्मांतर करून प्रचलित जातिव्यवस्थेस मोठा हादरा दिला.ज्यावेळी jay bhim डॉ.आंबेडकरांनी धर्मांतर करायचे ठरविले त्यावेळी त्यावेळी अनेक धर्मगुरू त्यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते . परंतु बाबासाहेबानी या भारताच्याभूमीत वाढलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून भारतीयत्वाची नाळ तोडली नाही.त्यांनी केलेले धर्मांतर हे बौद्ध धर्माचा पूर्ण अभ्यास करून केलेले होते . त्यांनी लिहिलेलं “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म”हे पुस्तक वाचल्यावर त्यांनी केलेला सखोल अभ्यास चकित करणारा आहे.

डॉ आंबेडकरांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा केला अभ्यास व त्यावर लिहिलेला “द प्रॉब्लम ऑफ रुपी” ” हा शोध निबंध लिहिला. ब्रिटन मध्ये अर्थ शास्त्राचे शिक्षण घेत असताना हा प्रबंध त्यांनी सादर केला.या निबंधामध्ये त्यांनी भारतातील रुपयाचे तत्कालीन पाश्चात्य राष्ट्राबरोबर होणाऱ्या विनिमय दरात भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण होत असल्याचे दाखवून दिले,व पाश्चात्य देशांची पूर्वेकडील चीन, भारत यांचेवर लादलेला विनिमय दरामुळे त्यांचे चलनाची किंमतीचे अवमूल्यन होत गेले हे प्रभावीपणे मांडले. पाश्चिमात्य राष्ट्रे त्यांचेकडे असलेल्या सोन्याचे किंमत व साठ्याप्रमाणे चलन वितरित करीत व भारतामधे सोन्याचे भांडवल नसल्याने रुपयाचे चलन अर्थव्यवस्थेत आणताना चांदी विकून सोने खरेदी करावे लागे व त्यावर चलनाचा दर ठरविला जाई.या निबंधामुळे मोठी खळबळ माजली.

इंग्रजांना jay bhim  डॉ.आंबेडकरांचे मार्गदर्शन घेऊन रिझर्व्ह बॅंकेची स्थापना करावी लागली. भारत हा ब्रिटनच्या अधिपत्याखालील देश असला तरी विनिमय दर त्यासाठी वेगळा होता.रुपयाचे मूल्य पौंड-डॉलर-पाश्चात्य राष्ट्रे यांच्या तुलनेत खूपच कमी होते.त्यामुळे भारताची आर्थिक पिळवणूक ब्रिटिश करीत होते हे वास्तव समोर आले.डॉ.बाबासाहेब हे कायद्याचे अभ्यासक व पदवीधर (बॅरिस्टर )होते.तसेच त्यांनी आपल्या अर्थशात्रीय अभ्यासाची चुणूक जगाला दाखविली.त्याच्या “द प्रॉब्लम ऑफ रुपी” या पुस्तकाचे वर्ष १९२३ मध्ये प्रकाशन झाले. वर्ष १९४२ ते १९४६ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मजूर खात्याचे मंत्री होते.

या खात्याव्यतिरिक्त जलसिंचन आणि ऊर्जाविभागसुद्धा याचा कार्यभारही त्यांचेकडे होते. या तिन्ही महत्त्वांच्या विभागाच्या नियोजनाचा पाया डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकाळात घातला गेला.त्यांनी ते प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.बाबासाहेबांनी बहुउद्देशीय धरण प्रकल्पाची संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली. केंद्रीय जल आयोग व केंद्रीय विद्युत आयोग यांची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना झाली.हिराकुड, दामोदर व सोन नद्यांवरील नदीखोरे प्रकल्पांची सुरुवात त्यांच्याच काळात झाली.

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झालेवर लगेचच देशाच्या राज्यकारभारासाठी घटना समिती नेमण्याचे ठरले. ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी jay bhim बाबासाहेबांची एकमताने निवड झाली.त्यांनी त्याच दिवसापासून मसुदा समितीचे कामकाज सुरू केले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजूरी दिली.भारतीय राज्यघटना,बौद्ध धर्म परिवर्तन आणि अर्थशास्त्र या तीन गोष्टींचे जनक असलेल्या डॉ. आंबेडकर यांचे दिनांक ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरीनिर्वाण झाले.

 

 

 

 

लेखक 

माधव विद्वांस
error: Content is protected !!