Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

inferiority complex treatment – न्यूनगंडाचा – बागलबुवा

1 Mins read

inferiority complex treatment – न्यूनगंडाचा – बागलबुवा

 

 

inferiority complex treatment – न्यूनगंडाचा – बागलबुवा

 

 

 

 

अमृता नेहमी ऑफिसच्या कामात ,पुढाकार घेण्यात मागे रहायची. तिला नेहमी वाटायचं तिची सहकारी कालिका ही  नेहमी तिला कामात पुढे  जाऊ देत नाही.सर्व जण तिची बाजू घेतात.तिचंच कौतुक होतं. कामाचं सर्व श्रेय नेहमी तिलाच मिळतं. माझ्यात तिच्यासारखा Smartness नाही  .हे सर्व तिचं वाटणं ,ती स्वतःचं ठरवायची. ह्याचं एकच कारण तिला स्वतःबद्दल नेहमी आपण कमी पडतो असं वाटायचं . आपल्यात काही तरी कमी आहे ह्याची सतत बोच आपल्या मनात असते,ज्याला आपण न्यूनगंडा ( Inferiority Complex treatment ) ,म्हणू शकतो. आपण स्वतःसाठी मत बनवणं आणि त्या अनुशंगाने स्वतःला नेहमी दोष देत राहणे ह्या कडे बरयाचदा अश्या व्यक्तींचा कल असतो.

लहानपणी कायम तुला जमणार नाही , राहू दे, असं बऱ्याचदा मानसिक खच्चीकरणं झालं असल्यामुळे खूपदा मोठं झाल्यावर सुद्धा हे मला जमणार नाही हेंच त्या व्यक्तीच्या डोक्यांत राहतं . स्वतःची नकारा त्मक image / प्रतिमा ती व्यक्ती स्वतःचं नकळत  तयार करते . काही जण  आपले दिसणे,वागणे,बोलणे , भाषा  ,व्यतिमत्व ,उंची,रंग ,देहबोली याची कायम इतरांची तुलना करत राहतात .कधीतरी जे नेहमीचे मापदंड/परिमाणं आहे किंवा आपणं सामाजिक काही मोज-माप म्हणू शकतो ह्यात नेहमी स्वतःला तोलत  रहातात  . काहीजण आपले राहणीमान , मिळकत ,सामाजिक स्थान ,शिक्षणं ,आपणं कोणत्या भागातून आलोय ,आपला समुदाय , एकूणच पार्श्वभूमी ह्या सर्वांचा कुठेतरी स्वतःचं न्यूनगंड बाळगतात . काम पूर्ण करण्यापेक्षा ते मध्येच सोडावंसं वाटतं. नेहमीचं चिंता आणि नैराश्य ह्यांचा ह्या लोकांना सामना करायला लागतो. आपल्या स्वत:च्या निवडी करण्यात ह्यांना बरयाचदा अडचण येते. ( inferiority complex treatment ) 

न्यूनगंडाचा बागलबुवा न करता आपण त्यावर मात  केली पाहिजे:

 • स्वतःला लेबल लावू नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःवर प्रेम करा .

 • स्वतःचा आदर करा,तुम्हाला तुमची किंमत आणि योग्यता माहित आहे. तुम्ही अमूल्य आहात

 • मनातली असुरक्षितता काढून टाका.

 • प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, मग तुलना का करावी ??

 • प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. सतत स्वत: वर टीका करू नका.

 • एक आत्मविश्वास असलेली व्यक्ती म्हणून आपली छबी तयार करा.

 • न्यूनगंड नेहमी तुम्हाला मागे खेचेल ,तेव्हा वेळीच ह्यातून बाहेर या.

 • Self talk हे सकारात्मक असू देत.

 • जे आपल्याला प्रोत्सहान देतात अश्या लोकांसोबत राहा.

 • जिथे स्वतः मध्ये बदल हवे,सुधारणा हवी तिथे नक्की करा .

 • स्वतःला शिकण्यासाठी तयार ठेवा. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 • आपण आपल्या कामाने ,कर्तृत्वाने ओळखले जातो .

 • स्वतःवर विश्वास ठेवा, हार मानू नका .तुमचे विचार तुम्हाला घडवतात.

 • स्वतःला दोष देऊ नका. स्वतःवर काम करा ,स्वतःला समजून घ्या.

 • पहिले तुम्ही स्वतःला स्वीकारा आहे तसे, मग इतर तुम्हाला स्वीकारतील. आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारणं महत्त्वाचं आहे.

 • मनातल्या शंका ,संशय ह्यांना दूर ठेवा.

 • आपली शक्तीस्थानं / बलस्थानं समजा /ओळखा ,त्यावर कामं करा.

कुठल्या  कारणांमुळे आपल्या मनात  न्यूनगंडाची भावना तयार inferiority complex treatment  झाली आहे ते बघा . त्यानंतर त्यावर उपाययोजना शोधा. आपण काही केलं / बोललं तर आपलं आपलं हसं होईल हा समज मनातून काढून टाका. आपला आपल्यावर विश्वास असेल तर कोणाच्या बोलण्याने काही फरक पडत नाही,हे लक्षात ठेवा. आपल्या कामाची जबाबदारी घ्या . नव्याने स्वतःला शोधा . कोणीच परिपूर्ण नसतं ,आहे त्यात आपण उत्तम कसं देऊ शकतो ते महत्वाचे ! मी जसा आहे सर्वोत्तम आहे , हे आपण एकदा स्वतःला सांगितले की त्यावर काम सुरु करायचं . आपली वाढ आणि विकास हे आपल्याच हातात ( मनात)  असतं. विचारांचे अडथळे नका तयार करू तर पुढे जाण्याचा मार्ग शोधा . न्यूनगंडावर आपल्या दृढनिश्चय, समर्पण आणि शिस्त ह्याने मात करा.

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

मेघना धर्मेश
9321314782

Leave a Reply

%d bloggers like this: