Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

jawaharlal Nehru ji – पंडित जवाहरलाल नेहरु / अटलबिहारी

1 Mins read

jawaharlal Nehru ji – पंडित जवाहरलाल नेहरु / अटलबिहारी 

 

jawaharlal Nehru ji – स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

 

 

पंडित जवाहरलाल नेहरू jawaharlal Nehru ji यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी मोतीलालजी आणि स्वरूपराणी यांच्या पोटी झाला.


आणि गुप्त असणारी सरस्वती प्रकट झाली .पंडितजी बुद्धिमान ,धनवान, रूपवान ,कीर्तिमान असे कायदेपंडित होते .

बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यातील व्दैत दूर व्हावे म्हणून नियतीने नेहरू नावाचे व्यक्तिमत्त्व घडवले. नेहरू हे वृत्तीने राजकारणी नव्हते .

\विवेकी, भावनावश ,व्यासंगी, तत्वनिष्ठ, एकांतप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अंतर्यामी एक जाण होती .आपण जगतो ते कसे आणि कशासाठी ?

आरामात सुख असेल, पण उत्कर्षाची बिजे असतात का? अन्याय टळावा आणि न्याय मिळावा यासाठी आपण काहीच करावयाचे नसते का ?

देशभर असणारे आपले असंख्य बांधव आपले कोणीच नाहीत का? घराला आतून कडी लावून घेणे पक्वान्नाचा घास खावून सुखशय्येवर पहू उडणे

आणि ‘ मला काय त्याचे ‘- या वृत्तीने कालक्रमणा करणे याला जगणे म्हणावयाचे का ?नेहरूंच्या मनात एका तत्वज्ञाचा निवास होता.

तशातच गांधींजींसारख्या संतांचा सहवास घडला .नेहरूजीना कळून चुकले की आजवर आपणास लिहिणारे आणि बोलणारे भेटले.

वरपांगी जीवनाचा अपव्यय करणारे वांझ बुद्धीची ही माणसे जग लयाला गेले तरी चर्चाच करीत बसणार. व्यर्थ आहे हा सारा वर्तन प्रकार

आणि जीवनव्यापार ! याउलट फकिरी पत्करून तत्वाच्या वाटेने निग्रहपूर्वक चालत राहणारे फाटक्या अंगाचे गांधी हे एक पोलादी पुरुष आहेत. 


ज्यांच्यावर भरवसा ठेवून राहावे असा हा महात्मा आहे.

महात्मा गांधीनी नेहरूंना आपला वारसदार मानले होते. नेहरू जन्माने एका ऐश्वर्यसंपन्न आणि श्रीमंत पित्याचे वारसदार होते. पण आचारविचाराने

ते एका निष्कांचन आणि अपरिग्रह व्रताचा अनुसार करणाऱ्या यतीचे वारसदार होते. jawaharlal Nehru ji नेहरूंनी आपला वसा आणि वारसा दिला

तो दिनांक 19 नोव्हेंबर 1917 या दिवशी जन्माला आलेल्या आपल्या इंदिरेच्या हाती. नेहरू हे काँग्रेसचे आधारस्तंभ होते .1929 मध्ये वयाच्या

चाळीसाव्या वर्षी रावी तीरावर भरलेल्या लाहोर काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. पंडितजी हे काँग्रेस पक्षाचे प्रबोधनकार होते ,राष्ट्राचे शिल्पकार होते .


संपूर्ण स्वातंत्र्य हा त्यांचा ध्यास होता.1935 मध्ये कमला नेहरू कालवश झाल्या .तेव्हापासून पुढची अनेक वर्षे नेहरूंनी पोरकेपण अनुभवले.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून 17 वर्षे नेहरूंनी कारभार पाहिला .जवाहरलाल नेहरूंनी अखिल भारतीय कॉंग्रेस

कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्या अधिवेशनात

जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण राजकीय स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला, तर मोतीलाल नेहरू व इतर नेत्यांनी

ब्रिटिश साम्राज्यातल्या वर्चस्वाच्या राज्याच्या दर्जाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी गांधी यांनी मध्यस्थाची


भूमिका घेतली आणि सांगितले की ब्रिटनला भारत राज्याचा दर्जा देण्यासाठी दोन वर्षे दिली जातील आणि तसे न झाल्यास संपूर्ण राजकीय स्वातंत्र्यासाठी

कॉंग्रेस राष्ट्रीय संघर्ष सुरू करेल. ही वेळ कमी करून एक वर्ष करण्यात यावी अशी मागणी नेहरू आणि बोस यांनी केली. यावर ब्रिटिश सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

लाहोरमध्ये कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले ज्यामध्ये Nehru ji जवाहरलाल नेहरू कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. या अधिवेशनात

‘पूर्ण स्वराज्य नियम’ असा ठरावही मंजूर करण्यात आला. जवाहरलाल नेहरूंनी लाहोरमध्ये 26 जानेवारी 1930 रोजी स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला.

गांधीजीने नागरी अवज्ञा आंदोलन पुकारले चळवळ एक मोठे यश होते आणि ब्रिटीश सरकारने मोठ्या राजकीय सुधारणांची आवश्यकता

स्वीकारण्यास भाग पाडले ब्रिटिश सरकारने निवडणूक कायदा जाहीर केला तेव्हा काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला नेहरू

निवडणुकीपासून दूर राहिले

नेहरू निवडणुकीपासून दूर राहिले परंतु त्यांनी पक्षासाठी देशभर जोरदार प्रचार केला. कॉंग्रेसने जवळजवळ प्रत्येक प्रांतात सरकार स्थापन केली

आणि मध्यवर्ती विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकल्या.

नेहरू १९३६ आणि १९३७ मध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना अटकही झाली.

भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या काळात त्यांनी ब्रिटीश सरकारशी झालेल्या वाटाघाटीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.

१९४९ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेसने भावी पंतप्रधानांना मतदान केले तेव्हा सरदार पटेल यांना सर्वाधिक मते मिळाली.

त्यानंतर आचार्य कृपलानी यांना सर्वाधिक मते मिळाली. पण गांधीजींच्या सांगण्यावरून सरदार पटेल आणि आचार्य कृपलानी यांनी त्यांची नावे मागे घेतली

आणि जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान केले गेले.पंडित जवाहरलाल नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.भारताच्या पुनर्रचनेच्या

मार्गात उद्भवलेल्या प्रत्येक आव्हानांचा नेहरूनी संवेदनशीलतेने सामना केला. जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक भारत घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

त्यांनी नियोजन आयोग स्थापन केले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन दिले आणि सलग तीन-पंचवार्षिक योजना सुरू केल्या.


त्यांच्या धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विकासात नेहरूंची मोठी भूमिका होती.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे प्रथम पंतप्रधान म्हणून भारताच्या विकासासाठी दीर्घकालीन उपयुक्त ठरतील अशा अनेक योजना राबवल्या

पायाभूत सुविधा शिक्षण आणि विज्ञानावर भर देत देशाच्या विकासात्मक उभारणीचा पाया रचलाहह -नांनगल, दामोदर व्हॅली यासारखी प्रचंड

धरणे बांधून विज्ञानयुगातील तीर्थस्थाने नेहरूंनी निर्माण केली. प्रांताप्रांतात असणारी कोयनेसारखी धरणे आणि जलसागर आणि उद्यमशीलतेचे विणलेले जाळे

हे केवळ त्यांचेच कर्तृव आहे. साहित्य, ‘संगीत आणि कला यांच्या अभिवृत्ती साठी नेहरूंनी सिद्धीस नेलेले संकल्प ‘साहित्य अकादमी’

‘ संगीत अकादमी’ ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ या संस्थांच्या रूपात आज राष्ट्रापुढे आहेत. हे जग युद्धाच्या खाईत लोटले जाऊ नये, राष्ट्राराष्ट्रातील सौदार्य अढळ रहावे,

दुरितांचे तिमिर जावे यासाठी नेहरूंनी केलेला पंचशील तत्वांचा पुरस्कार म्हणजे भगवान महावीर , भगवान बुद्ध ,महात्मा गांधी

आणि येशू ख्रिस्त यांना वाहिलेली श्रद्धांजलीच नव्हे काय?


नेहरूंच्या वाट्याला अनेकदा तुरूंगवास आला .त्यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग कारावासाने व्यापला. कारागृह ही नेहरूंची अभ्यासिका होती.

त्यांचे अनेक मौलिक ग्रंथ कारागृहात लिहिले गेले . नेहरूंना खुप चालायचे होते, दूर जावयाचे होते. ते जीवनाचे यात्रिक होते. त्यांना थांबायला वेळ नव्हता.

अनेक कामे अपुरी होती. कितीतरी संकल्प आणि प्रकल्प त्यांच्या आज्ञेची प्रतीक्षा करीत होते; पण काळाला त्यांची कणव आली. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे

हे काळाने जाणले .कर्मयोग याला विश्रांतीची गरज आहे हे ओळखून कालपुरूषाने त्यांना चिरंतनाच्या कुटीरात दाखल करून घेतले.

हा दिवस होता दिनांक 27मे 19 64 दुपारी दोनच्या सुमारास पंडितजी अनंतात विलीन झाले.

समय होता दुपारी दोन वाजण्याचा. आकाशवाणीवरून शोक संगीत सुरू झाले. लोक स्तब्ध झाले. ज्याने त्याने जीवाचे कान केले.

काय झाले? कोण गेले ?आसमंतात शब्द निनादले…..’नेहरू- नेहरू’ सारे राष्ट्र खिन्न झाले .हतबद्द झाले.नियतिचे भान हरपले. भर दुपारी ती ओरडली: ‘अरे !सूर्यास्त झाला !’


जवाहरलाल नेहरूंची ही भावप्रकृती पाहून , त्यांचे अभिजात, सुसंस्कृत, प्रसन्न आणि विलोभनीय व्यक्तिमत्व पाहून रवींद्रनाथ त्यांना ‘ऋतुराज’ म्हणत .

विनोबाजी त्यांना ‘लोकआत्मा’ म्हणत. भारताचे नेहरुनी केलेले वर्णन वाचताना डोळ्यांपुढे उभे राहतात ते भारताशी एकरूप झालेले नेहरू !

ते म्हणतात :आमच्या जीवनात भारत हे एक नित्य, सत्य, सर्वव्यापी स्वप्न होते ,संकल्पना होती, जीवनदर्शन होते.

भारतमय झालेले हे jawaharlal Nehru ji  नेहरू भरतवर्षाचे जीवनस्वप्न होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर


error: Content is protected !!