Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

history of peshwa – नाना फडणवीस यांचे पुण्यस्मरण

1 Mins read

history of peshwa – नाना फडणवीस यांचे पुण्यस्मरण

history of peshwa – नाना फडणवीस यांचे पुण्यस्मरण

 

 

१३ मार्च २०२१ नाना फडणवीस साडेतीन शहाण्यापैकी अर्धा शहाणा अर्थात नाना फडणवीस यांचे पुण्यस्मरण (दिनांक १३ मार्च १८००).नाना फडणीसांचचा जन्म सातारा

येथे १२ फेब्रुवारी १७४२ रोजी झाला.त्यांचे कारभारी शिक्षण नानासाहेब पेशवे यांचे बरोबरच सातारा येथेच झाले. इतिहासकार गमतीने उत्तरपेशवाईतील ४ प्रमुख मुत्सद्यांना

साडेतीन शहाणे म्हणत.त्यापैकी नाना फडणवीस-अर्धा कारण ते तलवारबहद्दर नव्हते म्हणून अर्धे मानले जायचे पण ते मुत्सद्दी होते.

काहींच्या मते १) महादजी शिंदे २) सखारामबापू ३) हरिपंत फडके आणि १/२) नाना फडणीस असे साडेतीन आहेत.

तर काहींच्या मते १) महादजी शिंदे २) सखारामबापू ३) विट्ठ्ल सुंदर आणि १/२) नाना फडणीस असे साडेतीनआहेत.’जिवाजीपंत चोरघडे यांचेही नाव घेतले जाते.

history of peshwa नाना फडणवीस हे बाणकोट जवळील वेळास गावातील भानू घराण्यातले.बाळाजी विश्वनाथ यांना जंजिऱ्याचे सिद्दीने तुरुंगात टाकले होते त्यावेळी भानूंचे कुटुंबाने त्यांना

सोडविण्यासाठी खटपट केली त्यामुळे बालाजीचे आणि भानू कुटुंबाचे संबंध दृढ झाले. पुढे बाळाजीचे बरोबर कोकणातून नशीब जमवण्यासाठी जी कुटुंबे आली

त्यात रामजी महादेव भानुपण सातारला आले.बालाजी विश्वनाथ पेशवे झालेवर हरी महादेव भानू याना फडणविसी म्हणून नेमणूक केली.त्यांच्या घराण्यात कर्तृत्वाने

हि फडणविसी चालू राहिली ती नाना फडणविस यांच्या अखेर पर्यंत. नानासाहेब पेशव्यांचे कारकिर्दीत नाना फडणीवीसपदी २९ नोव्हेंबर १७५६ रोजी आले.

नाना फडणवीस यांचे कर्तृत्व बारभाईंचे कारस्थानात दिसून आले. रघुनाथरावाने कारस्थानाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न हणून पाडण्यासाठी पेशवाईतील

१२ मुत्सद्दी एकत्रित आले व रघुनाथरावांचे मनसुबे उधळले गेले.यामधे नाना फडणीस, हरिपंत फडके, मोरोबा फडणीस, महादजी शिंदे, तुकोजीराव होळकर,

सखारामबापू बोकील, त्रिंबकराव पेठे, भगवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे, रास्ते, फलटणचे निबाळकर आणि बाबुजी नाईक,ही प्रमुख मंडळी होती.

राघोबासपदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई होणाऱ्या मुलास पेशवा करून नावाने कारभार करावा असे ठरविणेत आले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.

नाना अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते.त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध होती.त्यांची लेखणी हीच त्यांची तलवार होती.सवाई माधवरावांचे जन्मापासूनच पेशवाईचा कारभार

ते सांभाळत होते.त्यांचे स्वतःचे हेरखाते होते.लढाई नाही पण राजकारण व त्यातील शह काटशह यात ते तरबेज होते.महादजी शिंदे आणि त्यांचा सलोखा होता.

नानांनी व महादजींनी मराठी सत्तेवरील इंग्रजी आक्रमणाची लाट २५ वर्षे थोपवून धरली,यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते.

काही कठोर निर्णयामुळे त्यांनी शत्रूही निर्माण केले होते. history of peshwa इंग्रज टिपू आणि निजाम यांचे बरोबर त्यांनी मुत्सेद्देगिरीने राजकारण केले . महादजी शिंदे यांचे निधनानंतर मात्र

त्यांना एकाकीपण आले.रघुनाथरावाचा मुलगा बाजीराव पेशवेपदी आलेवर नानाचे त्याचे जमले नाही.बाजीरावाने त्यांना नगरचे किल्ल्यात बंदिवान केले.नानांना नवकोट

नारायण असेही म्हणत.बऱ्याचश्या गोष्टी पैश्याचे जोरावर करीत.बाजीरावाने त्यांचे घर व संपत्तीची जप्त केली होती. इंग्रजांनी सर्व संपत्ती त्यांच्या पत्नीस परत दिली तसेच

बाजीरावास तिला पेन्शन पण द्यायला लावली.

नानांनी एकूण नऊ लग्ने केली होती.मात्र त्यांना एक मुलगा झाला,व तोही अल्पायुषी होता.शेवटची पत्नी जिऊबाई त्यांच्या निधन समयी फक्त ९ वर्षांची होती.

नानांचे निधनानंतर ती ५४ वर्षे जगली.काही दिवस लोहगड नंतर कोकणात व अखेरीस वाई जवळील मेणवली येथे नानांनी बांधलेल्या वाड्यात राहणेस आली.

 

 

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: