Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर

1 Mins read

Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर

 

Gopal Ganesh Agarkar – सुधारकांचे अग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांना विनम्र अभिवादन 

 

 

14 जुलै 1856 रोजी कराड जवळील टेंभू या गावी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. घरच्या कठीण परिस्थितीमुळे शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण घेताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. घरच्या अडचणीमुळे शिक्षणाच्या काळात त्यांनी कारकून , कंपाउंडर अशी नाना प्रकारची कामे केली .उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व एम,ए पास झाले. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणूनही ते कार्यरत होते. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळविणे तेव्हा सहज साध्य होते. परंतु या व्यावहारिक सुखाकडे पाठ फिरवून आगरकरांनी देशसेवेचा निश्चय केला.
आपल्या आईला पत्राद्वारे त्यांनी कळवले की आई तुझा मुलगा खूप शिकला आहे .त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे तुला वाटत असेल, पण आई मी तुला आत्ताच सांगतो मी पोटापुरता पैसा कमवणार व बाकी सर्व पैसा लोकहितार्थ खर्च करणार आहे. देशसेवा करण्यासाठी आगरकरांनी शिक्षणाचा मार्ग निवडला होता. देशात स्वतंत्रपणे विचार करणारे लोक निर्माण झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही असे आगरकरांचे ठाम मत होते .जातीय संस्थेमुळे आपल्या समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. जातिधर्माच्या संकल्पनेमुळे विद्या, कला आणि शास्त्र यांची वाढ खुंटली असून ,सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेचे निर्मूलन करण्यासाठी सर्वांना शिक्षणाची संधी ऊपलब्ध झाली पाहिजे यासाठी ते सतात आग्रही असत. आपल्या वैचारिक लेखाने मराठीतील निबंध साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली.पल्लेदार वाक्य , मुद्देसूद प्रतिपादन ,अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. केशवसुत ह.न. आपटे या सारख्या थोर साहित्यिकांवर आगरकरांचा वैचारिक व भाषिक प्रभाव होता.  परमेश्वरी अवकृपा ,स्वर्ग किंवा नरक यांची प्राप्ती अशा हस्यास्पद कल्पनाचा डोलारा कोसळल्या शिवाय विवेकाचे अधिराज्य निर्माण होणार नाही असा आगरकरांचा आग्रह होता. ज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येत नाही आणि येणे शक्य नाही. अशा सदैव अज्ञात तत्वाचा आधार घेणे ही विचारांची दिवाळखोरी आहे असे Gopal Ganesh Agarkar आगरकर मानत होते. आगरकर देव गुणी होते,पण देव मानत नव्हते. आगरकरांच्या विचार सृष्टीचे पहिले तत्व म्हणजे बुद्धिवाद. दुसरे तत्त्व व्यक्तीस्वातंत्र्य व तिसरे तत्व ऐहिक सुखस्वातंत्र. ही त्यांच्या तत्वदर्शनाची प्रस्थानत्रयी होती. आगरकरांनी समाजजीवनाच्या विविध रंगाचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन केले होते. त्यामुळे ‘सुधारकां’च्या रखान्यातून अत्यंत वास्तव आणि जीवनस्पर्शी असे विचारधन महाराष्ट्राच्या वाट्याला आले.सोवळे ‘ ओवळे , विधवांचे केशवपन, अंत्यविधी ,आणि अंत्यसंस्कार ,स्त्रियांचा पेहराव आणि पुरुषांची हजामत -हे विषय आज गतार्थ वाटले तरी विचारांचा प्रवाह गढूळ करण्याचे काम शतकानुशतके केले गेले होते. आगरकरांचा खरा रोष होता तो मठामठातील महंतावर, लोकांना भजनी लावणाऱ्या सुमार बुद्धीच्या महाराजांवर, आगरकर ज्ञान विज्ञानवादी होते. श्रद्धेपेक्षा ज्ञान आणि ज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. तत्त्व सांगणे सोपे असते .ते आचरणे अवघड असते.आगरकर तत्व आचरणारे विचारवंत होते. त्यांनी आपल्या पत्नीला निक्षून सांगितले होते की माझ्या पश्चात कर्मठांच्या दडपणामुळे सोहळे पाळू नकोस.आगरकरांनी त्यांच्या बालविधवा मामे बहिणीस शाळेत पाठवून स्वावलंबी केले,आणि तिचे लग्न लावून दिले.
आगरकर बुद्धी खेरीज अन्य कोणताही मापदंड मानत नव्हते. Gopal Ganesh Agarkar आगरकरांच्या आठवणी सांगणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिंणीनी आपले दुःख व्यक्त केले आहे ते अशा शब्दातः “आपल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले .घरप्रपंच, पैसा-अडका, मानमरातब कशाकशाची पर्वा केली नाही.. पण काळ विपरीत पडला. त्यांच्या श्रमाचे व्हावे तसे चीज झाले नाही.. लोकांकरिता सतत तडफडणाऱ्या या जीवाचे मोल लोकांनी काही नीट केले नाही.”

अवघ्या 39 वर्षांचे आयुष्य जगणार्‍या आगरकरांची 17 जून 1895 रोजी प्राणज्योत मालवली.
अशा या थोर सुधारकाला विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!