Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIA

freedom fighters of india – सरदार उधमसिंहजी

1 Mins read

Freedom fighters of india – सरदार उधमसिंहजी

 

२६ डिसेंबर १८९९ – ३१ जुलै १९४०

 

 

“‘ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या टाचेखाली हिंदी लोकांना उपाशी मरतांना मी हिंदुस्थानात पाहिलेलं आहे.

अमृसर येथे जनरल डायरनं ओडवायरच्याच अधिपत्याखाली केलेल्या अमानुष कत्तलीची दृश्यं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत.

या घटनेमुळेच मी ब्रिटिश साम्राज्याचा द्वेष्टा बनलो. (ओडवायरचा वध करून) हा प्रतिशोध मी घेतला नसता,

तर हिंदुस्थानच्या नावाला कलंक लागला असता! माझ्या मातृभूमीसाठी मृत्यूपेक्षा मला कोणता मोठा सन्मान असू शकतो.

तुमच्या दहा, पंधरा वा वीस वर्षांच्या किंवा फाशीच्या शिक्षेची मला पर्वा नाही. वृद्धावस्थेपर्यंत जिवंत राहून काय उपयोग?

तरुणपणी मरण्यातच खरा पुरुषार्थ आहे! मी माझ्या देशासाठी बलिदान करीत आहे”..!

 

Freedom fighters of india – सरदार उधमसिंहजी

 

१९१६ यावर्षी जालियनवाला बागेत हत्याकांड घडले, त्यावेळी freedom fighters of india –  सरदार उधमसिंग तेथे होते.

तेथील सभेत जमलेल्या लोकांना ते स्वतः स्वयंसेवक म्हणून पाणी देण्याचे काम करीत होते. तेथे घडलेला नरसंहार त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता.

त्या संपूर्ण घटनेने ते व्यथित झाले. त्यामुळे परकीय ब्रिटिश सरकारविरुद्ध ते जळफळू लागले अन् त्यांनी प्रतिशोधाचा ठाम निश्चय केला.

सन १९३७ मध्ये उधमसिंग लंडनला गेले. तेथे ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची चळवळ करणाऱ्या freedom fighters of india – क्रांतिकारकांच्या सान्नीध्यात आले.

त्यांपैकी व्हि.के. कृष्णमेनन आणि ‘केसरी’चे लंडनचे वार्ताहर दत्तोपंत ताम्हणकर यांच्याशीदेखील त्यांचा परिचय झाला.

त्यांच्या लंडन येथील सभा आणि व्याख्यानावेळी सरदार उधमसिंग त्यांना साहाय्य करीत असे.

असेच हाईड पार्कमध्ये ताम्हणकर भाषण देत असतांना त्या ठिकाणापासून जवळच राहत असलेला मायकेल ओडवायर तिथून जात असतांना ते भाषण ऐकण्यास थांबला.

ओडवायरला त्यावेळी ताम्हणकरांचा हिंदी स्वातंत्र्याचा प्रचार सहन झाला नाही. ओरडून तेथील वक्त्यांना तो म्हणाला,

“तुम्ही स्वातंत्र्याला पात्र नाही. हिंदुस्थानातील अस्पृश्यांचे काय ते प्रथम बोला.”

उंच तेज स्वरात ताम्हणकर म्हणाले, “तूच स्वतः एक अस्पृश्य आहेस’.

आणि श्रोत्यांकडे वळून त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, “Look at the butcher of jallianwala bagh! अर्थात हाच तो जालियनवाला बागेतील कसाई.

त्यावेळी उधमसिंग शांत होते. पण त्यांच्या मनात असलेल्या प्रतिशोध घेण्याचा विचार त्यावेळी त्यांचा प्रबळ झाला.

तिथे राहत असलेल्या freedom fighters of india –  उधमसिंग यांनी लंडन येथे राहात असलेल्या ओडवायचा पत्ता आणि संपूर्ण माहिती शोधून काढली.

येथील एका ब्रिटिश टाॅमीसोबत त्यांनी मैत्री केली आणि त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काही काडतूसे गोळा केली.

त्यावेळी लंडनच्या कॅक्स्टन हॉल येथे होणाऱ्या एका सभेत ओडवायर सहभागी होणार, असे सरदार उधमसिंग यांना समजले.

त्यासाठी त्यांनी स्वतःची सिद्धता केली. दुपारचे जेवण आटोपून अंगावर सुट चढवला आणि

अमेरिकन बनावटीचे सहाबारी स्मित आणि वेसेन ही रिवाॅल्वर कोटाच्या खिशात टाकत सोबत असलेल्या

चार पिशव्यांमध्ये एकूण २५ जिवंत काडतुसे आणि एक मोठा सुराही ठेवला. मस्तकावर फेल्ट हॅट चढवून सायंकाळच्या ठरलेल्या सभेसाठी कॅक्स्टन हॉलकडे निघाले.

freedom fighters of india – सरदार उधमसिंग सभेस्थळी पोहोचताच त्यावेळी येथील व्याख्यान सुरू होऊन पंधरा-वीस मिनिटे झाली होती.

त्या सभेत मायकल ओडवायर पुढच्या रांगेत डाव्या बाजूच्या खुर्चीवर बसला होता. वाट काढत काढत व्यासपीठापासून पाचव्या खुर्चीच्या रांगेसमोर उधमसिंग पोहोचले.

बऱ्याच वेळेपासून होत असलेल्या व्याख्यानावेळी थोडी मोकळी हालचाल म्हणून ओडवायर जागेवरून उठला असता

उधमसिंग पुढे सरसावले आणि त्यांनी त्वरित आपल्या जवळील असलेले रिव्हॉल्वर बाहेर काढत

केवळ तीन यार्डाच्या अंतरावरून ओडवायरच्या पाठीमागून सलग सहा गोळ्या झाडल्या. पहिल्या दोन गोळ्यांनीच ओडवायरची पाठ भेदून गेली.

आपले कार्य निर्विघ्न पार पडले, अशा समाधानाने ते तिथून जात असता तिथेच त्यांना पोलिसांनी अटक केली.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी लंडन तसेच हिंदुस्तानात सरदार उधमसिंग यांच्या खळबळजनक कृत्याची वार्ता पसरली.

पंजाबातील सत्ताधाऱ्यांनी ओडवायरचे गोडवे गाऊन उधमसिंग यांचा निषेध केला तर गांधींनी नेहमीप्रमाणे ‘माथेफिरुपणाचे लक्षण’

असे म्हणत उधमसिंग यांच्या पराक्रमी कृत्याचे अशा प्रकारे वर्णन केले. वास्तविक उधमसिंगांचा या कृत्यातील हेतू हा राष्ट्रीय प्रतिशोध घेणे हाच होता.

आणि त्यास धक्का न पोचता त्यात ते यशस्वी देखील झाले होते.

त्यांच्या हेतूत दहशतवाद नसतांना त्यांच्यावर तसा आरोप लादून त्यांनी केलेले कृत्य संपुष्टात आलेल्या मतप्रणालीचे आहे,

असे म्हणणे एका महान देशभक्तावर किती मोठा अन्याय होता. या अन्यायाला वाचा फोडणारे एकच देशभक्त भारतात १९४० मध्ये होते.

ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. निषेध करणाऱ्या आणि दुःखितांमध्ये जर उधमसिंगांविषयी प्रशंसा करता येत नसेल तर निंदा तरी करू नका,

अशा वक्तव्यांनी सावरकर तळपत होते.

freedom fighters of india – सरदार उधमसिंग यांचेवर २१ मार्च १९४०ला अभियोग भरविण्यात आला.

तिथे सरदार उधमसिंग यांनी हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्यातील अत्याचाराचे वर्णन करून म्हणाले, “ब्रिटिश राज्याखाली हिंदुस्तानात अनन्वित अत्याचार झालेत.

पंजाबच्या अमृतसर येथील जनरल डायरने केलेल्या हिंदी लोकांची हत्या ही अमानुष होती. ती मायकल ओडवायरच्या अधिपत्याखालीच घडलेली होती.

तेथील वृत्तांत ऐकून मी ब्रिटिश साम्राज्याचा द्वेष्टा बनलो. हिंदुस्तानात मरणाऱ्या तेहतीस कोटी लोकांच्या नावाने मी हा प्रतिशोध घेतला नसता,

तर हिंदुस्थानाच्या नावाला कलंक लागला असता. आणि म्हणूनच मी या दृष्ट ओडवायला ठार मारले.”

या वक्तव्यापश्चात freedom fighters of india – सरदार उधमसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

दिनांक ३१ जुलै या दिवशी सकाळी नऊ वाजता पेंटलव्हिल या कारागृहात ३१ वर्षे आधी क्रांतिकारक मदनलाल धिंग्राजी यांना फाशी दिली,

त्याच ठिकाणी नि त्याच वधस्तंभावर महान क्रांतिकारक सरदार उधमसिंग यांना फासावर चढवले.

वधस्तंभावर चढताच वीर हिंदू हुतात्माच्या शौर्याप्रमाणे त्यांनी स्वतःच आपली मान फासात अडकवली आणि एका क्षणात मृत्यूच्या दरीत लोंबून त्यांचा अनमोल देह ते सोडून गेलेत.

अशाप्रकारचे हिंदुस्थानाबाहेर हिंदुस्तानी राष्ट्राच्या वतीने एका कुविख्यात इंग्रजावर प्राणाच्या मूल्याने प्रतिशोध घेणारे मृत्युंजयी वीर ठरलेले

सरदार उधमसिंग यांचे नाव भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अमर राहील.

अशा freedom fighters of india – अमर हुतात्मा क्रांतिकारी सरदार उधमसिंह यांना त्यांच्या आज बलिदान दिवसानिमित्त शतशः दंडवत नमन..!

 

 

शब्दांकन : शिरीष श. पाठक

संदर्भ : मृत्युंजयाचा आत्मयज्ञ
लेखक : वि. श्री. जोशी

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!