Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHealth

Environment – आई – वडिलांची साद चांगली , पर्यावरणाचा नाद सांगली !

1 Mins read

Environment – मुलाच्या स्मरणार्थ आई – वडिलांची साद, पर्यावरण संवर्धनाचा नाद

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

जागतिक पातळींवर प्रदूषण मुक्त Environment – पर्यावरण हि काळाची गरज आहे आणि आपल्या आजूबाजूला प्लॅस्टिक, वाढती सिमेंटची जंगले, कारखानदारी, मोबाईल टॉवर, ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन च्या थरात होणारे बदल अशा आणि विविध कारणांनी Environment – पर्यावरणाचा समतोल ढासळत असतो.

आपण माणूस म्हणून प्रचंड स्वार्थी जीवन जगताना आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि घटनांकडे सहजच दुर्लक्ष करतो.

 

Environment – पर्यावरण आणि मानवाचे घट्ट नाते आहे, पर्यावरणाचा समतोल राहिला तर मानव या पृथ्वीवर राहिला, नाहीतर आपण लवकरच लुप्त होण्याच्या मार्गावर आहोत.

भविष्यातील पर्यावरणाचे हेच महत्व आणि दूरदृष्टी ठेवत “सेव्ह मॅंग्रोज ॲंड नवी मुंबई एक्झिस्टंन्स (सामने)” या संस्थेच्या माध्यामातून Environment – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा विडा जणू सुकुमार आण्णाप्पा किल्लेदार यांनी उचलला.

environment - sukumar killedar & family

environment – sukumar killedar & family

समाजसेवेचा वारसा आणि वसा घेतलेले किल्लेदार यांनी नवी मुंबईतील मँग्रोज वाचविण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली होती.

पर्यावरण आणि समाज कार्य याची स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी दखल घेत त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी त्यांच्या कार्यातून स्वतःला सिद्ध केले.

किल्लेदार यांनी याच तत्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी, आकाश, जल, वायु आणि अग्नी (एनर्जी) अशी पंचमहाभूते आपल्या संस्कृतीमध्ये सांगितली आहेत आणि ह्या तत्वांवर आपले जीवन अवलंबून असते.

मात्र सध्या मानव निर्मित वायु, जल, जमीन, ध्वनी अश्या प्रदूषणाच्या राक्षसाने ह्या सर्व तत्वांचा समतोलच बिघवडवून टाकला आहे आणि ह्याचे परिणाम आपण सर्वजण भोगत आहोत.

काही महिन्यांपूर्वी सुकुमार किल्लेदार यांच्या विवेक या इंजिनियर असलेल्या तरुण मुलाचे ऐन उमेदीत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले,या धक्क्यातून सावरत किल्लेदार यांनी आपले रिटायरमेंट चे आयुष्य शेती आणि Environment – पर्यावरण संवर्धन साठी देत आहेत.

आजच्या तरुण पिढीला आपल्याला वाचविणे आणि शिक्षित करणे हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणून Environment – पर्यावरण प्रदूषण सुद्धा आपल्याला नियंत्रित करावे लागणार हे सुद्धा किल्लेदार आपल्या कार्यातून लोकांना जागृत करतात.

environment - sukumar killedar & son vivek

environment – sukumar killedar & son vivek

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

प्रदूषण रोखण्यासाठी भारत सरकारने Environment – पर्यावरण सुरक्षा कायदा, १९८६, वायु प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१, जल प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, भारतीय जंगल कायदा १९२७, जंगल संवर्धन कायदा १९८० असे अनेक वेगवेगळे कायदे केले आहेत

आणि मा. सर्वोच्च न्यायालायने तसेच विविध उच्च न्यायालयांनी वेळोवेळी अनेक निर्णय देऊन हे कायदे सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण फक्त कायदे करून Environment – पर्यावरण वाचविता येत नसते,

त्या साठी लोकशिक्षण आणि लोकसहभाग हा देखील तितका आवश्यक आहे हे अण्णांनी अचूक हेरले होते. म्ह्णूनच त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ Environment – पर्यावरणाला साद दिली, आणि त्यांच्या या उपक्रमाला लोकांनी साथ दिली.

हक्क आणि कर्तव्ये ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. प्रदूषणमुक्त Environment – पर्यावरण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असे जेव्हा कायदा म्हणतो तेव्हा त्याच कायद्याने Environment – पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवण्याचे घटनात्मक कर्तव्य (कलम ५१-ग) देखील आपल्यावरच ठेवलेले आहे ह्याची जाण प्रत्येकाने ठेवावी.

मा. सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालये ह्यांचे बहुतांशी निर्णय हे राज्य घटनेच्या कलम -२१ भोवती फिरताना दिसतात. “राइट टू लाईफ” म्हणजेच जगण्याचा मूलभूत हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि ह्या हक्कामध्येच “प्रदूषणमुक्त Environment – पर्यावरणाचा” समावेश मा. सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

त्यामुळे सर्वाच्च न्यायालयाचे ऋण आणि आपले कर्तव्य याचा अनोखा मिलाप व्हावा हि इच्छा सुद्धा किल्लेदार यांना होती, याच हेतूने गट क्रमांक २५९, धामणी रस्ता , हातनूर, सांगली या जागेची सुकुमार किल्लेदार यांनी Environment – पर्यावरण दिन आणि मुलाच्या स्मरणार्थ अनोख्या प्रयोगासाठी जागा निवडली.

जागतिक Environment – पर्यावरणाचा दिवस त्यांनी त्यांच्या या ” सुंदर-आण्णा ॲारगॅनिक फार्म, हातनुर, सांगली येथील फार्म मध्ये पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आणि मधमाशा, पक्षांचा अधिवास निर्माण करण्यासाठी घनवन ( High density forest ) निर्माण करून साजरा करण्यात आला.

अकिरा मियावाकी पद्धतीने घनवन (High density forest) याची निर्मिती करण्यात आली. यासाठी सुकुमार किल्लेदार यांचे पर्यावरण मित्र धनंजय शेडबाळे, इकॅालॅाजिस्ट सौ. मोनाली शहा व देवराई फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे जिल्हास्तरावर च न्हवे तर राज्य स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

 

environment - sukumar killedar & Team

environment – sukumar killedar & Team

घनवनासाठी बकुळ, कांचन, शिवन, मोह, अर्जुन, पळस, मेडशिंगी, जांभूळ, तगर, मुचकुंद, टेटू, आईन, हादगा, बेहडा, बेल, सोनचाफा, रानजाई, गुलमेंडी, धावडा, फणस, सिताअशोक व कवठ इत्यादीसह एकूण ४०० रोपे यांची लागवड करण्यात आली.

यानिमित्ताने सौ. संगिता किल्लेदार, सुकुमार किल्लेदार, शांतादेवी किल्लेदार, निलेश किल्लेदार, अमोल पवार, प्रकाश पाटील, संदिप किल्लेदार, प्रमोद कोरे, रविकांत शिवपूजे, तनिका कुंभोजे व दशरथ माने सह इत्यादी उपस्थित होते.

शब्दांकन
वैभव जगताप

 

GTA 5 FULL GAME DOWNLOAD 40MB 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!