Also Visit for Trending News & Article  Postbox Live

Uncategorized

Election Result – महाआघाडीचा पत्थर, नवयुतीचे उत्तर – ज्ञानेश महाराव

1 Mins read

लोकशाही व्यवस्थेमध्ये दोन ‘स्पेस’ (जागा) असतात. पहिली सत्ताधार्‍यांची आणि दुसरी विरोधकांची! महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या स्वातंत्र्यकाळापासून तब्बल तीन दशके Election Result ‘काँग्रेस’ पक्षाचा एकछत्री अंमल होता.

विरोधी ‘स्पेस’मध्ये समाजवादी, कम्युनिस्ट आणि जनसंघाचे लोक प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी आपली ‘स्पेस’ टिकवून शरद पवार यांच्या ‘पुलोद’च्या प्रयोगात १९७७ ते ८० अशी अडीच वर्षं महाराष्ट्राची Election Result सत्ता मिळविली.

१९९० नंतर मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांची ‘स्पेस’ समसमान अवस्थेपर्यंत पोहोचली. त्यातूनच राज्याच्या राजकारणात Election Result ‘आघाडी’ आणि ‘युती’ हे शब्द जन्माला आले. ते आजही दिसताहेत.

पुढे आघाडीत Election Result ‘काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असे दोन विभाग झाले; तसेच युतीतसुद्धा ‘शिवसेना’ आणि ‘भाजप’ अशा दोन छावण्या झाल्या.

यांच्या कुरघोड्यांचं चौरंगी राजकारण महाराष्ट्र गेली २०-२५ वर्षे अनुभवतोय. काही संदर्भांमुळे आणि बरीच स्थित्यंतरे घडून गेल्यानंतर राजकारण तिरंगी झाले आहे. त्यातल्या दोन बाजू (‘काँग्रेस’ मिळून एक बाजू आणि दुसरी ‘शिवसेना’) Election Result आज सत्तेत आहेत.

तर एकेकाळी अदखलपात्र असा ‘भाजप’ सर्वाधिक आमदार असूनही Election Result विरोधी ‘स्पेस’मध्ये बसलाय. इतरही छोटे-मोठे पक्ष या छावणीतून त्या गोटात गेल्याचे दिसून येते.

हे छोटे- मोठे पक्ष निर्णायक कधीच नव्हते. मात्र, ते निकाल आणि निर्णयावर प्रभाव टाकतात. हा सारा इतिहास ओझरता आठवूनच राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’च्या ताज्या राजकीय हालचालींकडे पाहिले पाहिजे.

‘मनसे’ स्थापनेला १६ वर्षे पूर्ण झाली. तरीही हा पक्ष राज्यात ‘सत्ता पक्ष’ बनू शकला नाही. मात्र निर्णय किंवा निकालावर प्रभाव टाकणारा संदर्भ बनून राहिला आहे.

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकात Election Result या पक्षाने पदार्पणातच १३ आमदार निवडून आणले होते. हा पक्ष ज्या उजव्या बाजूकडचा म्हणून उल्लेख होतो; त्या ‘भाजप’ आणि ‘शिवसेना’ यांना स्वतंत्रपणे एवढे यश कधी मिळवता आले नव्हते.

मात्र त्यानंतरच्या २०१४ व २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत Election Result ‘मनसे’चा फक्त एकच आमदार निवडून आला. नाशिकसारखी एक मोठी महापालिका या पक्षाच्या ताब्यात आली होती. पण ती राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढच्या Election Result निवडणुकीत टिकविता आली नाही.

पूर्वी आणि आजही राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे स्वरूप हे प्रतिक्रियावादी राहिले आहे. मात्र, वैचारिक भूमिकांबाबत १८० अंशाचे वळण आहे. त्यातही सातत्य नाही. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ची १६ वर्षांपूर्वी जी भूमिका होती, त्याच्या उलट आज बोलताना, वागताना दिसत आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’च्या लेखी ‘शिवसेना-भाजप’ युती आणि ‘दोन्ही काँग्रेस’ आघाडी सारखेच शत्रूस्थानी होते. ‘सत्ताधारी आघाडी आणि विरोधी युती, हे सेटलमेंटचे राजकारण करतात,’ असा त्यांचा आरोप होता. त्यांच्या या भूमिकेमुळे चार छावण्यांमध्ये विभागलेल्या महाराष्ट्रात पाचवी बाजू तयार झाली. पण ही स्थिती अल्पकाळच टिकली.

कांशीराम-मायावती, असदुद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर, अरविंद केजरीवाल यांच्या पक्षांच्या भूमिका सत्ताधारी आणि सत्तेवर दावा सांगणार्‍यांसाठी कधी पूरक तर कधी मारक ठरतात; त्याच ‘मोड’मध्ये ‘मनसे’ गेला.

त्यामुळे राज ठाकरे जी भूमिका घेतात, ती सत्ताधार्‍यांच्या सोयीची की गैरसोयीचे ठरली, हे कळायला काही वेळ जातो. २००९ च्या Election Result निवडणूक निकालांवर नजर टाकल्यास राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या पक्षाची जी रूपरेखा जाहीर केली, ती समजून घ्यायला सोपे होते.

नव्या संदर्भात राज ठाकरे यांना समजून घेता येते. हा नवा संदर्भ असा की, राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी ‘महाविकास आघाडी’ आणि विरोधी ‘भाजप’ अशा दोनच छावण्या आहेत.

१६ वर्षे झाली तर राज ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेत किंवा विरोधात ‘स्पेस’ मिळू शकलेली नाही. १३ आमदार निवडून येऊनही त्यांची स्पेस तरंगतीच राहिली. २००९ मध्ये त्यांनी ‘शिवसेने’ला पर्यायाने युतीला Election Result मोठा धक्का दिला.

Also Read :

Ahttp://Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/

पण राज आणि त्यांचा पक्ष सत्तेत जाऊ शकला नाही. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज यांनी गुजरातचा दौरा केला आणि मोदी व त्यांच्या ‘गुजरात मॉडेल’ची भलावण केली होती. त्याचाही ‘मनसे’ला काहीही राजकीय फायदा झाला नाही.

उलट, २०१४ मध्ये आमदारांची संख्या १३ वरून १ वर आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी २०१४ च्या नेमकी उलटी भूमिका घेत ‘मोदी आणि भाजप’ला जोरदार विरोध करणारा ‘लाव रे व्हिडिओ’चा अभिनव प्रयोग केला.

तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबत जोडला गेला. पण त्याने २०१९ विधानसभा निवडणुकीत Election Result ‘मनसे’ आमदारांची संख्या वाढली नाही. ती ‘एकच’ राहिली.

मोदींची बाजू घेऊन वा मोदींना विरोध करून आणि २००९ मध्ये ‘काँग्रेस आघाडी’च्या विरोधातील मतांचे विभाजन करूनही ‘मनसे’ पक्ष चार घरं पुढे जाऊन, चार- चार घरे पुनः पुन्हा मागे येताना महाराष्ट्राने पाहिला आहे.

राज ठाकरे यांच्या संपूर्ण प्रवासात विशेष नोंद होण्यासारखी बाब अशी की, ज्यांना ज्यांना त्यांनी विरोध केला, तो विरोध तार्किकदृष्ट्या आणि त्याचा संदर्भ लोकांच्या लक्षात राहिला आहे.

ते ज्यांच्या विरोधात बोलले वा व्यंगचित्र रेखाटताना दिसले, त्यामुळे लोकांच्या मतदान करण्यासाठीच्या निर्णयप्रक्रियेवर त्याचा प्रभाव पडला आहे. म्हणूनच राज ठाकरे व त्यांचा पक्ष गेली १६ वर्षे चर्चेत आहे आणि राजकारणात दखलपात्र आहे.

पण पुढे काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतत राहिला आहे. आजही आहे. आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चे राज्य आहे. दोन्ही काँग्रेस ज्या भूमिकेत वर्षानुवर्षे होते, त्या भूमिकेच्या विरुद्ध जो प्रवाह आहे, त्यात अनेक वर्षे ‘शिवसेना’ आघाडीवर होती.

त्यामुळेच दोन्ही काँग्रेस ‘शिवसेना’ बरोबर एकत्र येतील, असे कुणाच्याही कधीच स्वप्नात आले नव्हते. पण ते झाले. दोन बाजूचे पारडे समसमान असूनही विरोधी ‘स्पेस’मध्ये मोठेच भगदाड पडले आहे.

आजच्या घडीला सत्ताधारी बाजू सक्षम आहे. त्यांनी सत्तेची जागा व्यापलीच आहे. विरोधी ‘भाजप’ही आपली जागा व्यापून आहे. पण संख्या असणे वेगळे आणि जागा व्यापून राहणे वेगळे!

Also Visit : https://www.postboxlive.com

‘भाजप’ प्रादेशिक पक्षांच्या आणि स्थानिक मुद्यावर लढणाऱ्या पक्षाशिवाय आजही लंगडाच आहे. पूर्वी ‘शिवसेना’ ही त्यांची गरज होती. आज ‘मनसे’ ही त्यांची गरज बनलीय.

‘भाजप’ची मुंबईत हवा आहे; पण सर्वमान्य होईल असा मराठी चेहरा नाही. राज्यात ‘शिवसेना-राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेस’ यांचे सरकार सत्तेत आल्यावर राज ठाकरे यांची व्यंगचित्रे थांबलीत.

अडीच वर्षे त्यांनी काही व्यंगात्मक रेखाटल्याचे स्मरत नाही. ‘भाजप’वर तर अजिबात नाही. राज्यात ‘महाआघाडी सरकार’ आल्यापासून ‘भाजप’ने ‘मनसे’शी हातमिळवणी करण्याचा पर्याय राखून ठेवला आहे. मात्र ‘शिवसेना’ सोबत आज येईल वा उद्या, अशी वाट पाहण्यात ‘भाजप’ची अडीच वर्षे गेली.

आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ‘भाजप’ प्रचंड शक्तीनिशी निवडणुकीला Election Result सामोरे जाण्याच्या तयारीत असला तरी, एक सक्षम मुंबईकर चेहरा हाताशी असल्याशिवाय त्यांचे काही चालत नाही, हे त्यांनाही माहीत आहे. म्हणून ‘मनसे’ आणि ‘भाजप’ यांची होऊ घातलेली युती आता नक्की होण्याच्या वाटेवर आहे.

ह्या वाटेची दिशा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कच्या सभेतील भाषणातून दाखवून दिली आहे. मुद्दे तेच आहेत. नवीन मुद्दा आहे तो ‘हनुमान चालीसा’!

नारायण ठोसर ऊर्फ रामदास स्वामी यांचे ‘मारुतीस्तोत्र’ कितीही लाडके असले तरी ते भय्या लोकांना अपील होणार नाही, अशी कुजबुज ‘संघ-भाजप’ परिवाराने आतापासूनच सुरू केलीय. राजकारणात परिस्थितीने आणि अनेक कारणांनी ‘शिवसेना’ जर ‘काँग्रेस आघाडी’त सामील होत असेल, तर ‘मनसे’चे ‘भाजप’कडे जाणं स्वाभाविक किंवा प्रतिक्रियास्वरूप ठरते.

त्यावर ‘लाव रे व्हिडिओ’ची साक्ष काढीत टीका होणे अटळ आहे. तथापि, ‘महाविकास आघाडी’ ही एक क्रिया असेल तर ‘मनसे-भाजप’ नवयुती ही प्रतिक्रिया आहे. मात्र, ती ‘४० पैसे प्रती पोस्ट’वाल्या भक्ताड मंडळींना उडवलेल्या थुंक्या चाटून पुसायला लावणारी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: