Also Visit for Trending News & Article  Postbox Live

News

eknath khadse news – महाराष्ट्रात भाजपाचे खडसे लागले

1 Mins read

eknath khadse news – महाराष्ट्रात भाजपाचे खडसे लागले

 

 

eknath khadse news – महाराष्ट्रात भाजपाचे खडसे लागले राष्ट्रवादीच्या गळाला

 

 

भाजपाचे खडसे लागले राष्ट्रवादीच्या गळाला, भाजपातील अनेक नेत्यांच्या हवा टाईट झाल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

४० वर्ष महाराष्ट्रात सामान्य कार्यकर्ता ते सरपंच आणि महसूल मंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या एकनाथ खडसे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे त्यांना

किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर समस्त राजकीय विश्लेषकांना हेच वाटत होते. मोदी लाटेवर अनेक जणांनी आपले इमले उभे केले आणि

काहींनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे उध्वस्त सुद्धा केले त्यापैकी एकनाथ खडसे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन लॉबी भाजपात लॉबिंग करून

घात करते याचा प्रत्यय खडसे ना आला. खरे तर देवेंद्र फडणवीस आपल्या मार्गात येणाऱ्या बहुजन समाजातील नेत्यांचे पत्ते सफाईने दूर करतात.

प्रमोद महाजन यांचा वारसा असणाऱ्या पूनम महाजन यांना युवा मोर्च्यांबाहेर मोठे होऊ न देणे हे सुद्धा यामागचे कारस्थान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री

पदावर दावा स्पष्ट करणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपातील पुरुषप्रधान कपट राजकारणाने बळी जावा लागला, त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा

हात च न्हवे तर लाथ होती अशी चर्चा परळी मतदार संघातील खुद्द त्यांच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये होती. देवेन्द्र फडणवीस यांचा अहंकार मोडून

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

काढत, सत्ता पालट करून दाखवत शरद पवारांनी ते महाराष्ट्राच्या मातीतले तेल लावलेले पैलवानांच न्हवे तर आखाड्यात नवीन डाव निर्माण करणारे अवलिया ठरले.

इतर पक्षातून आयात झालेले नेते कार्यकर्ते आता महाराष्ट्रातील भाजपाच्या भविष्यावर साशंक झालेत आणि पुन्हा लवकरच ते स्वगृही परतीच्या मार्गावर निघाले

तर नवल समजू नये. भाजपातील तळागाळातून वर आलेले नेते पुढे आले की ते आपल्या आजूबाजूच्या स्पर्धक नेत्यांचेच पत्ते कट करत नाहीत तर पक्षातील

वरिष्ठ नेत्यांना केराची टोपली दाखवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अटल बिहारी वाजपेयी यांची उदाहरणे केंद्रीय स्तरावर

आहेतच. महाराष्ट्रात भाजपाला हवा तसा एकही चेहरा विश्वासाचा आता राहिलेला नाही, बाकी सेटलमेंट आणि आयात करून आणलेले काही करिश्मा

करू शकतात हा भ्रम सुद्धा आता दूर झाला असेलच, त्यामुळे खोगीर भरती करून फक्त सत्ता मिळवता येईल, उपभोगता येईल पण ती सत्ता

कायम ठेवून लोकांचा विश्वास जिंकणे आता शक्य नाही. eknath khadse news एकनाथ खडसे सारखा नेता भाजपाने गमावला याचा तोटा

भाजपाला महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रात आणि इतर राज्यात सुद्धा होण्याची शक्यता आहे. एका बाजूला मोदी लाट ओसरत असताना मन की बात

चे डिसलाईक बटन काढून टाकण्याची नौबत आली असताना अशी गळती थांबवण्यासाठी केंद्रातून सीबीआय, ईडी इत्यादी सारख्या अस्त्रांचा

वापर खुबीने करण्यात येऊ शकतो याची जाणीव एकनाथ खडसेंना असल्यामुळेच पक्षातील अनेकांच्या कुंडल्या घेऊन ते फिरत आहेत.

नवी मुंबई भूखंड घोटाळा आणि इतर अनेक भूखंड घोटाळ्यांची इत्यंभूत माहिती एकनाथ खडसे यांच्या कडे असल्यामुळे भाजपातील

अनेक नेत्यांच्या हवा टाइट असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

भाजपात देवेंद्र फडणवीस यांच्या त्रासामुळेच कंटाळून आणि त्यांच्यावर खंजीर खुपसण्याचे गलिच्छ राजकारण करण्याचा आरोप ठेवत

एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठी दिली. भाजप नेत्यांचे भूखंड घोटाळे बाहेर काढण्याची धमकीच देत त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम आज झाला. ४० वर्ष ज्या पक्षाला तन मन धन दिले त्या

दिवसांच्या आठवणी मनात दाटून आल्यावर एकनाथ खडसे भावूक झाले होते. जळगाव जिल्ह्यातच न्हवे तर महाराष्ट्रात भाजपपेक्षा राष्ट्रवादीचा

मोठा विस्तार करण्याचा शब्द एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना दिला. भाजपमध्ये मला जाणीवपूर्वक टार्गेट केले गेले होते, रोहीणी खडसेंना

मी तिकीट मागितले नसताना सुद्धा तरीही त्यांना दिले असल्याचे गलिच्छ राजकारण केले गेले असेही खडसे म्हणाले.अनेक कार्यकर्ते आणि समर्थक

राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत eknath khadse news असे ही खडसे यावेळी म्हणाले.पण तांत्रिक अडचणी असल्यामुळे अनेकांना थेट

प्रवेश घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण लवकरच वर्षभराच्या आत नक्कीच बदल जगाला दिसेल. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये

सत्तांतर करुन दाखवेन असे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. माझ्या मागे “विनाकारण अँटीकरप्शनचा ससेमिरा लावण्यात आला होता,

राणेंच्या मागे लावण्याची भीती दाखवून पक्षात कसे सामील केले जाते याची आठवण सुद्धा त्यानी यावेळी केली, माझ्यामागे भूखंडाची घोटाळ्यांची

चौकशी लावली गेली, पण थोडे दिवस जाऊ द्या भूखंडांचे विषय आणतो, हे जाहीर करताच गिरीश महाजन यांच्यापासून आयात नेत्यांच्या

पायाखाची जमीन सरकली गेली असल्याचे लवकरच दिसेल. मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधीही कुणाच्या पाठीत

खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, ज्येष्ठ म्हणायचं आणि खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षांच्या सेवेच्या बदल्यात

मला पक्षाने काय दिलं ? मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. असे म्हणत खडसे यांनी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रातून भाजपा संपवतील

त्यामुळे आता यापुढे सकारात्मक राजकारणावर भर देणार असल्याचेही खडसे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

 

Editorial 
www.postboxindia.com

www.postboxindia.com

 

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: