My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & Order

e chalan – ट्रॅफिक चलन बाबत तक्रार अशी करा !

1 Mins read
  • e chalan - ट्रॅफिक चलन बाबत तक्रार अशी करा

e chalan – ट्रॅफिक चलन बाबत तक्रार अशी करा !

बऱ्याच लोकांना आपले चलन चुकीचे आहे हे माहीत असून सुधा त्याबाबत दाद कशी मागायची हे माहीत नाही.

आपणास स्पीड लिमिट बाबत किंवा इतर कोणतेही e chalan चलन ची नोटीस मेसेज द्वारे आले तर घाबरु नका.

पोलिसांनी ऑटोमॅटिक पद्धतीने सॉफ्टवेअर द्वारे e chalan चलन तयार होऊन ते ग्राहकांना/नागरिकांना मिळेल असे केले आहे.

प्रत्येक वेळी e chalan चलन आले म्हणजे नागरिक चुकीचेच आहेत असे नाही.

तेव्हा आपण खालील पद्धतीने यावर दाद (ग्रिवेन्स) मागू शकता.

१) प्रथम आपण गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन mahatrafficapp हे ॲप डाऊनलोड करा जर ते डाऊनलोड केले नसेल तर. 

e chalan - 1

e chalan – 1

२) त्यानंतर आपण मोबाईल नंबर द्वारे रजिस्ट्रेशन करा. आपल्याला एक OTP येईल त्याद्वारे हे होईल.

३) ॲप मध्ये my vehicles हे बटण आहेत त्यात आपल्या कडे असणाऱ्या सर्व गाड्यांची नोंद करा.

e chalan - 2

e chalan – 2

४) त्यानंतर my E-Challans हे बटण दाबले की आपणास कोणत्या गाडीचे बाबत माहिती हवी आहे

त्या गाडीचे नंबर वर आलेल्या लिंक वर दाबले की किती चलन आहेत हे समजेल.

५) त्यानंतर आपण सदर e chalan चलन नंबर वर क्लिक केले की आपल्याला कोणत्या कारणासाठी चलन भरायचे आहे ते दिसेल

६) आपण सदर पेज वर इमेज असे लिहिले असेल तिथे क्लिक केले की आपणास फोटो दिसेल

७) फोटो पाहून आपण त्यात किती स्पीडने जात आहोत/ हेल्मेट / झेब्रा क्रॉसिंग / सिग्नल तोडला इत्यादी माहिती बरोबर आहे का हे तपासा.

८) चुकीचा फोटो आहे, चुकीचा गाडी नंबर आहे किंवा काही चुकीची माहिती असेल तर आपण दाद मागू शकता

९) दाद मागण्यासाठी आपण या ॲप मध्ये सुरवातीच्या पेजवर डाव्या कोपऱ्यात खाली grievance म्हणून बटण आहे ते दाबा

१०) आपण grievance बटण दाबले की उजव्या कोपऱ्यात खाली अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करा

e chalan - 3

e chalan – 3

११) e chalan चलन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल, भरा

१२) कारण निवडा, (आपले कारण त्यात नसेल तर other निवडा)

१३) रिमार्क कॉलम मध्ये थोडक्यात तक्रारीची माहिती भरा.

e chalan - 4

e chalan – 4

१४) गाडी नंबर, चासी नंबरचे शेवटचे चार अंक टाकून एक चौकोनी बॉक्स वर टिक करा आणि सबमिट बटण दाबा

१५) आपणास एक मेसेज येईल त्यात आपली विनंती मिळाली आहे आणि एक युनिक रेफरन्स नंबर मिळेल.

e chalan - 5

e chalan – 5

१६) आपण या व्यतिरिक्त जेव्हा सदर ॲप उघडता त्यात सर्वात खाली सेंटर ला contact us येथे क्लिक केले की आपणास एक ईमेल आयडी दिसेल

१७) [email protected] हया ईमेल वर आपण सविस्तर तक्रार दाखल करा. त्यात हवे ते पुरावे पण द्या.

e chalan - 6

e chalan – 6

कोणतेही मापन करणारे यंत्र/मशीन हे परिपूर्ण असेल याची खात्री नाही. (इथे वेग मोजणारे स्पीड गन)

त्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या भारतातील संस्थेने प्रत्येक मापन यंत्र हे NABL लॅब मध्ये कॉलिब्रेट (प्रमाणित) केलेले

असावे तरच ते बरोबर मापन करते असे प्रमाणित होते.

e chalan - 7

e chalan – 7

यंत्रात मापन करताना किती दोष आहे हे प्रमाणित करताना दाखल्यासह दिले जाते.

दर सहा महिन्यांनी प्रमाणीकरण केले पाहिजे त्यामुळे प्रत्येक वेळी किती फरक पडतो आहे ते समजते.

त्यामुळे यंत्रावर दाखवलेला स्पीड हा बरोबर आहे हे सिद्ध होत नाही त्यात दोष असू शकतो आणि नागरिक म्हणून,

ग्राहक म्हणून आपणास कॅलीबरेशन सर्टिफिकेट मागणे म्हणजे गुन्हा नाही.

पोलीस यंत्रणेने पण मागणी केल्यावर असे सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे त्यामुळे नागरिकांचा यंत्रणेवर विश्वास बसेल.

तेव्हा नागरिकांनी सजग राहावे. आपले हक्क समजून घ्या, आपले कर्तव्य पण समजून घ्या. नियम मोडू नका. दुसरे मोडत आहेत म्हणून आपण मोडू नका.

नियम हे आपल्या भल्यासाठी केलेले आहेत. त्यात त्रुटी असतील तर ते बदलण्यासाठी प्रयत्न करा, सरकार कडे हरकत नोंदवा.

लोक अदालतची नोटीस आपणास विधी प्राधिकरण कडून आली असेल तरी घाबरु नका.

लोक अदालत मध्ये जे खटले दाखल होतात त्यात दोन्ही पार्टीना मंजूर असतील तरच त्यावर न्याय दिला जातो अन्यथा ते नेहमीच्या न्यायालयात वर्ग होतात.

आपणावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. कोर्टात आपण सामने वाले कडून हवी ती माहिती कायद्याने मागवू शकतो.

 

विजय सागर

Pros

  • +e chalan - ट्रॅफिक चलन बाबत तक्रार अशी करा

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: