Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox MarathiSANSKRITISANSKRITI DHARA

dehu – देहूत शिळामंदिराचं उद्घाटन

1 Mins read

dehu – देहूत शिळामंदिराचं  उद्घाटन झालं. dehu – शिळामंदिर म्हन्जे काय हो? dehu – शिळेचं म्हन्जेच खडकाचं मंदिर. dehu – खडकाचं कस्लं मंदिर? तर मनूवाद्यांनी तुकोबारायाची अनमोल अशी गाथा इंद्रायणीत बुडवल्यावर दु:खीकष्टी होऊन, तेरा दिवस तुकोबाराया इंद्रायनीकाठच्या ज्या खडकावर बसून राहिले त्या dehu – शिळेचं हे मंदिर !

गाथा का बुडवली? तुकोबारायाचा काय गुन्हा होता? तर त्यानं दीनदुबळ्या बहुजनांना गुलामगिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला. अडानीपनाचा फायदा घेऊन, ज्यांना देवधर्म-अंधश्रद्धा-कर्मकांडांत अडकवून लुबाडलं जायचं.. अशा शोषितपिडीतांना तुकोबारायानं जागं करायला सुरूवात केली, हाच त्याचा गुन्हा.

…तुकोबांनी आपल्या अभंगांमधनं वेद-पंडितांच्या पारंपरिक मक्तेदारीला चॅलेंज दिलं. एवढंच नाय, वेदांचा अर्थ जाणून घेन्याचा अधिकार सगळ्या जातीतल्या लोकांना, तसंच स्त्रियांनाही आहे असं ठनकावून सांगीतलं. हळूहळू तुकोबाराया सामान्य जनमानसात प्रचंड लोकप्रिय होऊ लागला ! ‘महाराष्ट्राचा खराखुरा फेवरीट सेलिब्रिटी’ झाला. जळफळाट होऊन जातवर्चस्ववाद्यांनी तुकोबाला धर्मपीठासमोर खेचलं, “आम्हीच श्रेष्ठ आहोत. तू शूद्र असून आम्हाला ज्ञान शिकवतोस काय?” असं म्हणत गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची शिक्षा दिली !

बघा, किती वर्षांपास्नं चालत आलंय हे !
संतांच्या मरनानंतर ह्या लोकांना त्यांचा लै म्हंजी लैच कळवळा येतो. ‘आमी त्यांचे लै मोठ्ठे भक्त. आमी त्यांच्यासाठी टाळ वाजवले, चिपळ्या वाजवल्या आन् घंटा वाजवली.’ अशा खोट्या फकांड्या मारतात. पन तेच संत जिवंत असताना समाजाला शहानं-विवेकी बनवू पहातात, तवा मात्र ह्यांचं रूप वेगळं असतं. मग त्या समाजसुधारकांना धमकावनं… बदनाम करनं… त्यांच्या पोटापान्याच्या कामावर गदा आननं.. त्यांच्या भजनात, व्याख्यानात, चळवळीत अडथळे आननं.. हल्ले करनं… त्यांचे विचार नष्ट करायचा प्रयत्न करनं… आन् अगदीच डोईजड झाले तर त्यांची हत्या करनं.. हज्जारो वर्ष चालत आलंय हे.

तुकोबारायालाबी असाच त्रास दिला यांनी. पन आपला वाघ मागं हटला नाय. “आता मी माझ्या मरनालाबी भेत नाय.” अशी डरकाळीच फोडली त्यानं !

भीत नाहीं आतां आपुल्या मी मरणा । दु:खी होतां जना न देखवे ।।
आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ।।
भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ।।
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ।।

…आता मला माझ्या मरणाचीही भीती वाटत नाही, कारण मला हे लोक दु:खात असलेले पहावत नाही.
…आमची जात लढवय्यांची परंपरा दाखवणारी आहे, हे का तुला ठाऊक नाही देवा?
…पण हे लोक माझ्या भजनात व्यत्यय आणतात हे मला मरणप्राय यातना देतं. लोकजागृतीचा एक क्षणही वाया जाऊ नये असं मला वाटतं.
…शेवटी तुका म्हणे : त्यामुळे जिथे अशा जीवघेण्या आघातांंचा वाराही स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी देवा मला ठाव दे.

…आपल्यासाठी लै लै लै त्रास सहन केला हो तुकोबारायानं. अक्षरश: रक्ताचं पानी केलं.. मारहान सहन केली.. जळते निखारे झेलले.. बदनामीच्या प्रयत्नांना तोंड दिलं… पन मागं हटला नाय. लढत र्‍हायला. “आरं आमची जातच लढवय्याची हाय, आमी पळपुटे नाय” अशी गर्जना केली आपल्या ‘हिरो’नं !
आपल्या आज्ज्या-पनज्यांनी तुकोबाची बुडलेली गाथा तारली. आज, तीच गाथा आनि त्यातला ‘खरा विचार’ पुढच्या पिढ्यांपर्यन्त पोचवन्याचा आपन थोडाजरी प्रयत्न केला, तरी लै मोठ्ठं काम हुईल. त्याचा संघर्ष सार्थकी लागंल… तोच त्या dehu – ‘शिळेचा’ खर्‍या अर्थानं सन्मान आसंल !

ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

– किरण माने.

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!