Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

dada kondke – शाहीर दादा कोंडके यांचे आज पुण्यस्मरण

1 Mins read

Dada kondke – शाहीर दादा कोंडके यांचे आज पुण्यस्मरण

Dada kondke – चहाटळ विनोदाने महाराष्ट्राला हसविणारे शाहीर दादा कोंडके यांचे आज पुण्यस्मरण

 

 

चावटपणा फाजीलपणा हा दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्यात गमंत वाटते हे ओळखून आपल्या द्व्यर्थी चहाटळ विनोदाने महाराष्ट्राला हसविणारे शाहीर दादा कोंडके यांचे आज पुण्यस्मरण.

जन्म ८ ऑगस्ट १९३२ ला मुंबई येथे जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या

ह्या ” कृष्णा ” ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य, नाटके ह्यांनी सुरुवात

केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले.

नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच

पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी

मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या

दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकर पणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरात dada kondke “बँडवाले दादा” ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले.

सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.

कलेची सेवा बँड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रख्यात लेखक

वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वत:ची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना

त्यांच्या ” खंकरपूरचा राजा ” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावीत केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला.

सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात

काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा. ‘ चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफल

मधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

त्यावेळी RK स्टुडियो खालोखाल दादा कोंडके यांचा स्टुडियो सुसज्ज होता dada kondke दादांचे स्टुडियो मधील कॅमेरे अत्यंत आधुनिक होते.

दादांची शाहिरी व काव्य लोकांचे मनाचा ताबा घेत असे . त्यांचे गाण्यावर लोक ठेका धरीत असत. त्यांची गाणी लोकप्रिय झाली.

 

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालिला टिला
तुझ्या कप्पालिला टिला, ग फॅशन मराठी सोभंय तुला
आरं जा जा तू मुला, का सत्तावितंय मला
का सत्तावितंय मला, न जाऊन सांगेन मी बापाला
धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला, पाणी भरायला, ठेवीन घरकामाला
तुझी फॅशन अशी रे कशी, लांब कल्ले तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा, चल जा हो बाजूला
तुझा पदर वार्‍याशी उडतो, अग बघून जीव धडधडतो
तुझी नखर्‍याची चाल, करी जिवाचं हाल, माझे गुल्लाबाचे फुला

काय ग सखू ?
बोला दाजिबा !
काय ग सखू, बोलू का नगू,–घडिभर जरा थांबशील का ?
गोडगोड माझ्याशी बोलशील का ?——-काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही !——-येळच नाही ?
दाजिबा थांबायला येळच नाही !——-डोईवर घेऊन चाललीस काई ?
डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या——तांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईचं ?
काय ग सखू, रागावू नगू,——-घडीभर जरा थांबशील का ?
थांबशील का ग, जातीस कुठं तू सांगशील का ?——रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं——-वागणंच खोटं ?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं ?——पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी, बाई लौकरी,
जाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात—–काय ग सखू, घाबरू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?——-मनात काय तुझ्या सांगशील का ?
सांगू कशी मी कस्‌कसं होतं——मनात माझ्या भलतंच येतं
काय ग सखू तुझ्या मनात येतं ?——-दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत ?——चल चल सखू, चल ग सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा.

 

 

 

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: