My page - topic 1, topic 2, topic 3

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

cyber crime Pune – फेसबुक अकाउंट फसवणुकीबाबत.

1 Mins read

cyber crime Pune – फेसबुक अकाउंट फसवणुकीबाबत.

cyber crime Pune – नागरिकांना आवाहन

दि.२८/०९/२०२१

नागरिकांना आवाहन फेक फेसबुक अकाउंट वरून होणान्या फसवणुकीबाबत..
सध्या पुणे शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, व्यावसायीक, शासकीय अधिकारी/कर्मचारी व इतर नामवंत व्यक्तींचे फेक
फेसबुक अकाउंट बनवुन त्यांचे फ्रेंड लिस्ट मधील मित्र-मैत्रीण तसेच नातेवाईक यांना सदर फेक फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड
रिक्वेस्ट पाठवुन त्यानंतर पैशाची मागणी करीत असलेबाबत सायबर पोलिस स्टेशन येथे तकारी प्राप्त होत आहे. असे आपणासोबत
घडल्यास आपण खालील प्रमाणे प्रोसेस करून सायबर पोलीस स्टेशन येथे तकार द्यावी..
• ज्यांची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन बनवलेली फेक प्रोफाईल
शोधा, स्वत:ला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडुन सदर फेक
प्रोफाईलची फेसबुक लिंक (युआरएल) मागवुन घ्या, – cyber crime Pune
त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (:) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा.
तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
• Pretending To be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity.
आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट
करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना-
• प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (:) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा.
तुमच्यासमोर Find Support or Report हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
Fake Account हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity.
आपण मित्राची फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी A Friend हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक
प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
फेसबुक प्रोफाईल सुरक्षीत कसे करावे..
• स्वतःची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसु नये याकरीता.. Settings & Privacy → Setting → How People can
Find And Contact You → who Can See Your Friend List → तिथे only Me करावे.
• स्वत:ची फेसबुक प्रोफाईल फोटो/कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्ती Copy/Download करू नये याकरीता..
Settings & Privacy → Setting → Profile Locking →Lock Your Profile तिथे करावे.
• अनोळखी व्यक्तीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवु नये याकरीता..
Settings & Privacy → Setting → How People Can Find And Contact You → Who Can Send Friend Request  तिथे Friend
Of Friend करावे.
स्वत:चा फेसबुक अकाउंट सुरक्षीत ठेवणे करीता.
Settings & Privacy → Setting → Password and Security → Use Two-Factor Authentication तिथे योग्य पर्याय निवडून
Continue वर क्लिक करावे.
• स्वत:चा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला ई-मेल आयडी कोणास दिसु नये यशकरीता.
Settings & Privacy → Setting → Personal and Account Information → Contact Info. → तेथे नमूद मेल आय.डी. वर क्लिक करा →
who can see your Email Address? → तिथे Only Me करावे.
स्वत:चा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला मोबाईल कमांक कोणास दिसु नये याकरीता.
Settings & Privacy → Setting → Personal and Account Information → Contact Info. → तेथे नमूद मोबाईल क्रमांकावर क्लिक करा
→ who can See This Number? → तिथे only Me करावे.

Also Visit :https://www.postboxlive.com

28.9.2021
CYBER POLICE SATION
(उमेश औदुंबर तावसकर )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण.

cyber crime Pune

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: