Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Culture of Maharashtra कृष्णकांत जाधव – शाहिरांचा हिरा खरा खरा.

1 Mins read

लेखक : ज्ञानेश महाराव
 

Culture of Maharashtra संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ ज्यांच्या गाण्यांनी गाजत राहिला, त्या ‘महाराष्ट्र शाहिर’ आत्माराम पाटील यांच्या तालमीत तयार झालेले शाहिर कृष्णकांत जाधव यांचे नुकतेच (८ मे२०२२) निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

गेली ३ वर्षे ते मुंबई सोडून आपल्या मूळगावी राजापूर-धोपावे (धूतपापेश्वर) येथे राहात होते. हृदयविकार आणि पक्षाघातामुळे त्यांनी गेले दिड वर्ष अंथरुण धरले होते. फोन/ विडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी माझा संपर्क होता.

तीन दिवसांपूर्वीच (५मे) त्यांच्याशी व त्यांच्या पत्नीशी विडिओ कॉलवर बोललो होतो. त्यांची तब्येत खूपच खालावली होती. मोठ्या मुश्किलीने ते चार-पाच शब्द बोलले. चार महिन्यापूर्वी मी सहकार्यांसह धोपावेला जाऊन भेट घेतली होती. त्या भेटीवर मी लिहिलं होतं. ते वाचून कृष्णकांतजी खूष झाले होते. त्या लेखाची ही पुनर्भेट.

   

Culture of Maharashtra ‘सिंह जसा वनात, तसा कलावंत जनात’ उठून दिसतो. शाहीर कृष्णकांत जाधव हे देखील असे आपल्या अभिनय संपन्न गाण्याने एकाच वेळी हजारो लोकांना जिंकणारे कलावंत! माझ्या लिखित-निर्मित ’जिंकूया दाही दिशा’ या नाटकाने (२००६ मध्ये) शाहिरांशी माझी जवळीक होती, ती आणखी वाढली.

‘जिंकूया’मध्ये विवेक ताह्मणकर आणि निशांत शेख हे तरुण-गुणी शाहीर-गायकही होते. प्रत्येकाची गाण्याची धाटणी वेगळी होती. पण कृष्णकांतजी Culture of Maharashtra

’महाराष्ट्र शाहीर’ आत्माराम पाटील यांची ’जाती विसर्जनाची लावणी’ सादर करीत; तेव्हा ’हाऊसफुल्ल थिएटर’ नाटक विसरून त्यांच्या गाण्याला हमखास ’वन्समोअर’चा धोषा करीत. मात्र, या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले, तरी शाहिरांनी कधीही ’वन्समोअर’ घेतला नाही. विंगेत आल्यावर विचारणा केली, तर म्हणत, ”नाटक आणि नाटकातला विचार महत्त्वाचा! माझ्या गाण्यासाठी नाटक थांबवायचं नाही!”

       ह्या गाण्याच्या अखेरीस शाहूराजांची एन्ट्री होती. ती ‘वन्समोअर’ घेण्यासाठी रोखणे चुकीचे, ह्याचे भान शाहिरांनी कायम राखले होते. कलेशी कमालीचे प्रामाणिक असल्याने अडीअडचणी आल्या तरी एकही प्रयोग चुकवला नाही.

देशात १९९० पासून अयोध्येतील मंदिर-मशीद वाद तापू लागला; तशी बहुतेक शाहिरांची तोंडं ‘अफझलखानाच्या कोथळा फाड’ पोवाड्यानी वाजू लागली होती. कृष्णकांतजी तेव्हा ‘शिवरायांचा सर्वधर्मसमभाव’ गात होते.

   

Culture of Maharashtra पण धार्मिक उन्मादात टिकून राहण्यासाठी ते ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ही गाऊ लागले होते. ते वळण माझ्या ‘जिंकूया’मुळे तुटले आणि माझ्या ‘भोंदू बुवा आणि राजकारणी’ यांच्या राष्ट्रघातकी युतीचा समाचार घेणाऱ्या ‘घालीन लोटांगण’ (२०१०) नाटकातील –

उठा उठा हो, बंधूजन हो।
काळ नव्हे, हा निजण्याचा –
झोपेखाली जीवन गेले।
नाश जाहला राष्ट्राचा॥१
     देव-दैव ह्या, अफाट थापा।
     पतनाची ती नशा असे –
     बुद्धी पुढती सर्व फिके हो।
     स्वादावीण पक्वान्न जसे ॥२
     हे गाणं स्वतंत्र कार्यक्रमातूनही गाऊ लागले.

   

Culture of Maharashtra शाहीर पूर्वीचे ’नॉनमॅट्रिक’. कोकणातील राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराच्या जवळ त्यांचं घर. हे घर खूप उंचावर व अवघड ठिकाणी आहे. तिथून ये-जा करून, प्रतिकूल परिस्थितीशी टकरा देत, त्यांनी तिथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

’हायस्कूल’चं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून मॅट्रिक (पूर्वीची अकरावी) पर्यंतचा अभ्यास केला. मॅट्रिकला नापास झाले. पोटापाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत नोकरीला लागले. लोअर परळला झोपडीवजा बैठ्या घरात राहायचे. तिथल्या जवळच्या चाळीत, Culture of Maharashtra

ज्यांच्या गाण्याने ’संयुक्त महाराष्ट्र’ची चळवळ गाजत-जागत राहिली, ते आत्माराम पाटील राहायचे. तिथे त्यांच्या शाहिरी पथकाच्या तालमी व्हायच्या. कृष्णकांत जाधव कामावरून परतल्यावर त्या तालमी पाहण्यात रमू लागले. हळूहळू उपजत आवडीने ढोलकी वाजवू लागले.

      ह्या ढोलकी वादनाने त्यांची पु.ल.देशपांडे यांनी आपल्या ’वार्‍यावरची वरात’ नाटकासाठी निवड केली. कृष्णकांत जाधव यांच्या ढोलकी वादनावर ‘पुलं’ कमालीचे खूश होते. त्यांनी जाधव यांना ’पुणे आकाशवाणी’वर कलाकार म्हणून नोकरीत दाखल होण्याची ’ऑफर’ दिली. पण जाधव यांना मुंबई सोडणे शक्य झाले नाही.

Culture of Maharashtra ’पती गेले ग काठेवाडी’ या नाटकासाठी त्यांना मोहन वाघ यांनी घेतले. त्यात शाहीर मनोहर जोशी गायचे. एकदा ते काही कारणामुळे प्रयोगाला येऊ न शकल्यामुळे मोहन वाघ यांनी कृष्णकांत जाधव यांना ढोलकी वादनासह गाण्यास उभे केले. वाघांची निवड सार्थ ठरली. कृष्णकांत यांनी प्रेक्षकांना जिंकले. तेव्हापासून त्यांच्या नावापुढे ’शाहीर’ ही पदवी लागली.

दरम्यान, आत्माराम पाटील यांच्या पथकातले आघाडीचे गायक सिकंदर शेख हे मुंबई सोडून पुण्याला गेले. दुसरे गायक मधू मोरे हे नोकरीत अधिक गुंतले. त्यांची जागा कृष्णकांत जाधव यांनी घेतली. ते खुल्या-खड्या आवाजात स्पष्ट शब्दोच्चारात गात. ‘काळी चार’ ही त्यांच्या आवाजाची पट्टी.

विशेष म्हणजे, ते एकपाठी होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात ’मुंबई दूरदर्शन’वरून कवी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांची कविता गाण्याची संधी मिळाली. शाहीर अनंत फंदी (मूळ नाव: अनंत भवानीबावा घोलप, संगमनेर.

जीवनकाळ : १७४४ ते १८१९) यांच्या ’बिकट वाट वहिवाट नसावी’ या फटक्यावर कुसुमाग्रजांनी ’पन्नाशीची उमर’ गाठली, हे काव्य बेतले होते. ५० कडव्यांची ही ’स्वातंत्र देवतेची विनवणी’ पुढे खूप गाजली. आजही त्याच्या आठ ओळी रेशनिंग कार्डाच्या मलपृष्ठावर आहेत.

     ‘बिकटवाट..’ हा फटका शाहीर साबळे यांनी गाऊन गाजवल्याने, ‘दूरदर्शन’ने कुसुमाग्रजांचं काव्यही गाण्यासाठी त्यांच्याकडे नेले. ते सादर करण्यासाठी फक्त एक दिवसाचा अवधी होता. ‘पाठांतरासाठी पुरेसा नाही’ असे सांगून शाहीर साबळे यांनी कृष्णकांत जाधव यांचं नाव सुचवलं.

ते कृष्णकांतजींनी खात्रीशीर ठरवलं आणि समोर कागदाचा एक कपटाही न धरता कृष्णकांतजींनी मोठ्या झोकात कुसुमाग्रजांची ’स्वातंत्र्य देवतेची विनवणी’ १५ ऑगस्ट १९९७ रोजी सादर केली. (मात्र ’सह्याद्रीच्या पाऊलखुणा’ वा Culture of Maharashtra ‘स्मृतिगंध’मध्ये ती कधी दिसली नाही. बहुधा गायक ’जाधव’ असल्याने ती टेप वेळीच पुसून टाकली असावी.)

    ते ’रेडिओ आणि टीव्ही स्टार’ झाले. दरम्यान, मुलीसह त्यांचे तीनही मुलगे गायक-वादक झाले. पण त्यांनी कृष्णकांत जाधव यांच्यासारखे रंगमंच गाजवण्याऐवजी नोकरीचे मार्ग पत्करले. माझ्या ’जिंकूया दाही दिशा’ नाटकात कृष्णकांत आले (२००६) तेव्हा त्यांच्या सेवानिवृत्तीची १० वर्षं उलटली होती. सत्तरी गाठली होती. त्यांचे शाहिरीचे कार्यक्रमही कमी झाले होते.

ती उणीव त्यांनी ’जिंकूया’वर आपला ठसा उमटवून भरून काढली होती. शाहिरीचा- विशेषत: आत्माराम पाटील यांच्या लेखनाचा आणि सादरीकरणाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्याचा लाभ ’मुंबई विद्यापीठा’च्या ’अमर शेख लोककला अकादमी’च्या विद्यार्थ्यांना झाला.

त्यांच्या सहवासामुळे माझाही Culture of Maharashtra लोकशाहिरीचा अभ्यास झाला. त्यांच्याप्रमाणेच हार्मोनियम वादक सुभाष खरोटे, ढोलकीपटू ज्ञानेश्वर ढोरे यांनी मला शाहिरी गीतं गायला शिकवली. हे तिघेही मी लिहिलेल्या ’संगीत घालीन लोटांगण’ ह्या ’बुवा आणि राजकारणी’ यांच्या युतीवरील नाटकातही होते. दोन्ही नाटकांचे महाराष्ट्र-गोव्यात मिळून ३०० हून अधिक प्रयोग आम्ही केले.

     डोळ्यातला मोतीबिंदू, कमी ऐकू येणं आणि हाताला येणारा कंप यामुळे शाहिर जाधव यांनी वयाच्या ८० नंतर कार्यक्रम करणे थांबवले होते. शारीरिक अस्वास्थ्यामुळे त्यांचा दोनदा अपघातही झाला. दोन वर्षांपूर्वी ’लॉकडाऊन’च्या आधी ते शरीरस्वास्थ्यासाठी आपल्या मूळ गावी धूतपापेश्वर मंदिरालगत असणार्‍या ‘धोपावे’ गावी गेले. तिथे त्यांची शंभरीच्या जवळपास असलेली आई आहे.

सोबतीला पत्नी-सुहासिनी. पण दीडेक वर्षांपूर्वी त्यांना ’पॅरालिसीस’चा अॅटॅक आला. उपचार झाले. पण शाहिरांनीच अंग टाकले. त्यातून थोडं सावरल्यावर त्यांनी पत्नी सुहासिनी यांना मला फोन करायला सांगितले. त्यांनी आजाराची माहिती दिली. शाहीरही बोलले. आवाज पूर्वीसारखाच खणखणीत होता. स्मरणशक्तीही मजबूत होती. ती तशीच असणार, ह्या खात्रीने मी त्यांना भेटण्यासाठी राजापूर-धोपावेला गेलो.

     धूतपापेश्वर मंदिराचा हा परिसर उंच टेकडीवरचा आणि अवघड वळणांचा. मुक्कामी पोहोचल्यावर मनात आलं, ’शाहीर कुठून कुठे पोहोचले?’ गाणं आणि ढोलकी वादनाच्या बळावर ते महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात पोहोचले. महाराष्ट्रातलं प्रत्येक Culture of Maharashtra  नाट्यगृह त्यांनी माझ्या ’जिंकू या दाही दिशा’ ह्या नाटकाच्या माध्यमातून गाजवलं.

मैदानावरच्या खुल्या प्रयोगात चार-पाच हजार रसिकांना आपल्या बुलंद गाण्याने जिंकलं. हे सगळंच धूतपापेश्वरच्या उंचावरल्या झर्‍यातून कोसळणार्‍या धबधब्यासारखं झालं होतं. धूतपापेश्वरचं पाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं.

     माझी भेट अवचित होती. पत्ता विचारण्यापुरताच मी फोन केला होता. घरात शिरताक्षणी त्यांना ’हाक’ देताच, पलंगावर झोपलेल्या ८५ वर्षांच्या कृष्णकांत जाधव यांनी माझे नाव घेत प्रतिसाद दिला. पण नजर हरवलेली होती. सोबत आलेले कलावंत मयुरेश कोटकर आणि ’प्रतिबालगंधर्व’ विक्रांत आजगावकर यांचेही नाव सांगताच त्यांनी ओळखलं.

स्वागतासाठी हात उंचावला, तर तो वर-खाली जोरदार गतीने हलू लागला. ते ’या’ म्हणतात की ’जा’ ते कळेना. सुहासिनीबाईंनी तो हात धरून पोटावर ठेवल्यावर हलायचा थांबला. गाताना हजारो प्रेक्षकांच्या टाळ्या आणि हशा ‘हुकमी’ वसूल करणार्‍या शाहिरांची ही अवस्था पाहताना मन गलबलं.

परंतु, पंचाहत्तरीच्या सुहासिनीबाई ज्या आस्थेने त्यांच्या सेवा-शुश्रूषा करीत होत्या; औषधोपचाराची काळजी घेत होत्या, ते पाहून अस्वस्थता लपवावी लागली.

     शाहीर नोकरी आणि कार्यक्रमाच्या धावपळीत व्यग्र असताना सुहासिनीबाईंनी घर-संसार आणि मुलांचं शिक्षण केलं. त्यांचे संसारही मार्गी लावले. आर्थिक ओढाताणीतून मार्ग काढण्यासाठी शिलाईकामं केली. आताही त्यांच्या ’धोपावे’च्या घरात शिलाई मशीन उघडी होती.

त्या मशीनवर एक सुबक टोपली आणि रोवळीही होती. ती बाईंच्याच हस्तकौशल्याची करामत होती. मुंबईत राहणार्‍या मुलांशी त्यांचा संपर्क असतो. पण ‘त्यांनी त्यांचा संसार सांभाळावा, आम्ही आमचं पाहू,’ म्हणत त्यांनी आता Culture of Maharashtra शाहिरांसह धोपावेलाच राहण्याचं पक्कं केलं होतं. ते सांगत बाईंनी शाहिरांची तब्येत ठणठणीत असताना मुलांसह कृष्णकांजींनी आत्माराम पाटील लिखित ‘रेकॉर्ड’ केलेला ’शिवाजीराजांचा पोवाडा’ ऐकवण्यासाठी ’पेनड्राइव्ह’ काढला. स्पीकरला लावला.

     पोवाड्याची ढोलकी वाजू लागली, तसे शाहीर उठण्याचा प्रयत्न करू लागले. सुहासिनीबाईंनी त्यांना हात देऊन बसवलं. शाहीर दिसायला ’सिनेस्टार’ वसंत शिंदे यांच्यासारखे; आणि त्यांच्यासारखेच मिस्कील. त्यांनी खुणेने सांगितलं, Culture of Maharashtra ‘पोवाडा सुरू असताना शाहीर झोपून कसा चालेल?’ स्पीकरवर पोवाडा सुरू झाला. तसे शाहीर त्यातील जमेल तसे शब्द पुटपुटू लागले. पोवाडा सुरू असताना विक्रांत आजगावकर यांचे लक्ष फळीवरल्या ’हार्मोनियम’- बाजाच्या पेटीकडे गेले. त्यांनी ती पेटी उतरवली आणि वाजवू लागले. तसं, शाहिरांनी ’स्पीकर’वरचा पोवाडा थांबवायला सांगून विक्रांत आजगावकरांना गाण्यासाठी खुणावले.

     आजगावकरांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांची ’महाराष्ट्राची लावणी’ आपल्या खड्या मधुर आवाजात सुरू केली. त्यातील शब्द-सूरांना शाहीर मान डोलावून दाद देऊ लागले. शाहिरांच्या आग्रहास्तव सध्या सुरू असलेल्या आमच्या ‘संत तुकाराम’ नाटकातील ‘बा रे पांडुरंगा’ हा अभंगही आजगावकरांनी गायला. त्याने खूश झालेल्या शाहिरांना आजगावकर गाण्यास सांगू लागले. पण शाहीर काही दाद देईनात.

मी काही गाणी सुचवू लागलो, तसे ते तयार झाले. पण सूर सापडेना. ते गद्यात गाऊ लागले. तशा सुहासिनीबाई गाऊ लागल्या. बाईंचं गानकौशल्य मला ठाऊक नव्हतं. ‘शाहिरांसारखी शेकडो गाणी मलाही चालीसह तोंडपाठ आहेत,’असं म्हणत त्या सुरात गाऊ लागल्या. तसा शाहिरांनी हाताचा ठेका धरला आणि गाण्याचा प्रत्येक शब्द पुटपुटू लागले.

     ’मिसळ झाली मुंबई’ हे गीत गाताना सुहासिनीबाई अडखळल्या. तसे शाहीर पटकन म्हणाले,
राजकारणामंदी झालीया मिसळ
पुढारी-पेंढारी सारखंच दिसंल –
    शाहिरांनी आपण शब्दाला पक्के असल्याचा दाखला दिला ; पण आता शाहिरांचं गाणं सुहासिनीबाई झाल्या होत्या. जणू चांदणी चंद्रांचं तेज दाखवत होती. मग शाहिरांनी मला गायला सांगितलं. ५० वर्षांपूर्वी मानवाचा ‘पाय चंद्राला लागला’ तेव्हा आत्माराम पाटील यांनी ‘मुंबई आकाशवाणी’वर सादर केलेलं गाणं मी गायलं. त्यातील विनोदावर शाहीर मनसोक्त हसले.

      शाहीर आत्माराम पाटील यांनी असंख्य पोवाडे, मुजरा आणि विविध प्रकारातील शाहिरी गीतं लिहिली. पण Culture of Maharashtra ‘गण’ एकच लिहिला. ‘सभांगणी तू जनगण सारा, तूच गणपती खरा खरा’- या गणाच्या ५ कडव्यांतून त्यांनी मानवी जीवनाचा पट मांडलाय. हा ’गण’ मला कृष्णकांत जाधव यांनी शिकवला होता. ते गाऊन ’आजची मैफल’ संपवतो म्हटल्यानंतर ‘म्हणा’ म्हणाले. मी ’गाऊ’ लागलो, तसे तेही मोकळ्या आवाजात ‘गण’ बोलू लागले. या गणाचे शेवटच्या कडव्यातील शब्द आहेत –
देहोदेही देश दिसतसे।
देशचि ह्या देवांचा देव-
मी जाईन परी ह्या देवांना।
ठेवीन अक्षय शाहिरी ठेव –

    यातली शेवटची ओळ मी गात असताना शाहिरांनी मूठ आवळली. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर, त्यांच्या डोळ्यांत हरवलेली नजर सापडलेली दिसली. ती पाहत मी शेवटच्या दोन ओळी म्हटल्या –
वाहीन यांना चिर घमघमता।

आत्मफुलांचा तुरा तुरा –
   ‘गण’ संपवताना माझ्या प्रमाणेच कृष्णकांत जाधव यांचेही डोळे भरून आले होते. सुहासिनीबाईंनी शाहिरांचे डोळे पुसले. त्यात कर्तव्य कठोरपणाचा लवलेश नव्हता. आपुलकी आणि सन्मान ह्यांचा ’प्रीतसंगम’ होता. पंधरा-वीस मिनिटांत भेट संपवून निघायचे असे ठरवून गेलो होतो. पण दोन तास कसे भुर्रकन गेले, ते कळलंच नाही.

     निरोप देताना सुहासिनीबाई म्हणाल्या, ”तुम्ही याल याची मला आणि शाहिरांनाही खात्री होती. आता तुमच्या ह्या भेटीच्या आठवणीत आमच्या दोघांचे दोन महिने आनंदात जातील!” माणसाला आनंदात जगण्यासाठी काय हवं असतं ?… तो जे जगला, ते त्याच्या अवतीभोवती असावं, एवढीच तर अपेक्षा असते! मात्र, ह्या अपेक्षापूर्तीसाठी एखादं ’लोकोपयोगी’ कला-कौशल्य अंगी असावं लागतं. ते शाहीर कृष्णकांत जाधव यांच्याकडे खच्चून होतं आणि आहे. त्याचा ‘यथायोग्य’ प्रसारही त्यांनी केला.

ती अक्षय ठेव जपण्यासाठी कृष्णकांत जाधव हे आत्माराम पाटील यांची शाहिरी मनापासून गाताना निश्चयाने ठणकावत –

अखंड गुण गायनी जाहला।
जरी माझा अंत-
पुन्हा जन्मुनि गातच राहीन।
महाराष्ट्र गीत –
     हा त्यांचा ‘नेक-निश्चय’ आपणा सर्वांचा व्हावा, यासाठीच अवतीभवती संकट-सावल्या दाटल्या असताना मी लखलखता ‘शाहिरी हीरा’ दाखवला आहे. तो आता आठवणीचा झालाय.

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

%d bloggers like this: