Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Confidence – हे मी करणार म्हणजे आत्मविश्वास – तुमची शक्ती

1 Mins read

Confidence – हे मी करणार म्हणजे आत्मविश्वास – तुमची शक्ती

 

 

Confidence – हे मी करणार म्हणजे आत्मविश्वास – तुमची शक्ती

 

 

 

नूतनने घाबरतचं अपर्णाताईंना फोन लावला. तिला फक्त हे सांगायचे होते की तुमचे लेख खूप मनाला उभारी देणारे असतात. मी नेहमी वाचते. हे ती दर वेळा ठरवायची पण प्रत्यक्ष फोन करणं ती काही ना काही कारणाने टाळायची . कारण एकचं मी त्याच्याशी काय बोलू ? मला बोलायला जमेल का ? आलोक पूर्ण तयारीने नोकरीच्या मुलाखतीसाठी गेला पण वेळेवर त्याला भीती वाटली आणि तो मुलाखत तशीच अर्थवट सोडून आला ? हे हो-नाही ,जमेल का असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात त्याचा अर्थ असा की  तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही. तुमचा आत्मविश्वास कमी आहे .ऑफिसमध्ये बरेचं जण असे असतात की त्यानां बऱ्याच गोष्टी जमण्यासारख्या असून फक्त आत्मविश्वास नाही म्हणून ते मागे रहातात. Confidence  आत्मविश्वास म्हणजे तुमचा तुमच्या क्षमतेवर असलेला विश्वास . जमेल का ? असं मनात येणं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. आत्मविश्स्वास हा आपल्या वागण्यातून, कृतीतून , देहबोलीतून जाणवतो,दिसतो. आपला आपल्यावर असलेला विश्वास, हो हे मला जमेल , हे मी करणार म्हणजे Confidence आत्मविश्वास !

यशस्वी होण्यासाठी  ,पुढे जाण्यासाठी ,आपल्या  व्यायसायिक आणि व्यक्तिगत  आयूष्यच्या  वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी एक महत्वाचा घटक आहे आत्मविश्वास.

आत्मविश्वास  वाढवण्यासाठी  आपण काय  करू शकतो ते बघू या –

1. आपली विचार करण्याची प्रकिया ही मनात भीती , न्यूनगंड तयार करणार नाही तर हो का नाही ,मला शक्य आहे अशी हवी.

2. आपला आत्मविश्वास हा आपल्याला शोधायचा असतो तो पण योग्य विचार करून.

3. सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा घटक आहे. असं झालं नाही तर ही भीती मनात येऊ द्यायची नाही.

4. आपले मनोबल हे आपल्याला परिस्थितीला समोर जाण्यासाठी मदत करत.मन शांत ठेवायचे,घाबरून जायचे नाही.

5. कोण काय बोलतय ह्या पेक्षा स्वतःचं सामर्थ्य व क्षमता याची  पुरेपूर जाणीव असणे महत्वाचे.

6. स्वतःबद्दल शंका घेऊ नका .मनात किंतू -परंतू आले म्हणजे जमेल की नाही असे मनात प्रश्न.

7. स्पर्धा,तुलना,अडचणी ह्या प्रत्येकाच्या मार्गात येतात,त्याला सामोरं जाणे आणि न थांबता पुढे पुढे  जात राहणे हे आपल्यातल्या आत्मविश्वासाचे लक्षणं आहे.

8. नवीन गोष्टी शिका,अनुभव घ्या, अपयश आले तरी आपण त्यातून शिकतो ना ? नवीन गोष्टी शिकण्याची  तयारी असू देतं.

9. स्वतःचे सामर्थ्य तुम्हाला नाही तर कोणाला माहिती असणार ? आपला आत्मविश्वास आपल्या जवळ आहे त्याला समजा.

10. पहिले छोटी-छोटी ध्येय( targets ) साध्य करा. त्याने तुमच्या मनाची तयारी होईल.

11. मानसिकता बदला तरचं पुढच्या गोष्टी शक्य होतील. भीती, नकारात्मकता हे तुम्हाला नेहमीचं अडथळे निर्माण करतील.

12. अति आत्मविश्वास आणि कमी आत्मविश्वास ह्यातला मध्य साधा, अति आत्मविश्वास तुम्हाला अपयश देऊ शकतो.

13. आपल्यातल्या उणिवा / कमीपणाची जाणीव ह्यावर काम करा. न्यूनगंडावर मात करा.

14. आपला कामाचा अभ्यास ,पूर्वतयारी हे नीट करा. आपण तयार म्हणजे पूर्ण आत्मविश्वास 

15. स्वतःच्या चुकांवर काम करून सुधारणा करणे, हे ही महत्वाचे.

16. वागण्या-बोलण्यावर काम करा. चार-चौघांत वावरताना न घाबरता बोला. कामात पुढाकार घ्या

17. चांगल्या सवयी ह्या तुम्हाला खूप मदत करतील.त्यावर जिद्द, चिकाटी आणि सातत्याने आपले काम चालू ठेवा.

18. आपला कामाचा अभ्यास ,पूर्वतयारी हे नीट करा. आपण तयार म्हणजे पूर्ण आत्मविश्वास 

19. धैर्याने,संयमाने आणि नियोजनपुर्वक मनातल्या भीतीचा सामना करा.

20. सराव करा सवय होईल ,मग आत्मविश्वास हळूहळू नक्कीचं जाणवेलं.

यश -अपयश हे आपल्या आयष्याचे भाग आहेत . कधी तरी आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो..पण  त्याने डरनेका नही..अजून जोमाने ,नव्या उमेदीने तुमची मनोवृत्ती सकारात्मक  ठेऊन पुढे जाण्यासाठी परत कामाला लागायचे.

आत्मविश्वास  Confidence  असेल तर अवघड काही नाही.  आत्मविश्वास  ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कुठलीही गोष्ट साध्य करण्यास मदत करते. तुमच्या यशाची  चावी जी तुमच्या हातात आहे ती म्हणजे  आत्मविश्वास  !!

मी करू शकतो…. हे आपल्याला मनात एकदा आलं ..तर..अशक्य काहीच नाही.

 

 

 

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

 

Leave a Reply

%d bloggers like this: