Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

comfort zone challenge – ले-ले पंगा हर limit से

1 Mins read

comfort zone challenge – ले-ले पंगा हर limit से

 

comfort zone challenge – ले-ले पंगा हर limit से

 

 

 

प्रमोदचं सगळं शिक्षण-नोकरी मुबंईत ,कामानिमित्त बाहेर जाणं व्हायचे ते पण अगदी १०-१५ दिवस. त्यामुळे कधी कामासाठी /

राहण्यासाठी मुंबई शिवाय विचारचं केला नव्हता. मग अचानक कंपनीने महाराष्ट्राबाहेर ऑफीससाठी प्रमोदला मॅनेजर म्हणून

पाठवण्याचे ठरवले. अधिकारी ते मॅनेजर ही  नक्कीचं चांगली बढती होती .पगारात सुद्धा चांगली वाढ होती. प्रश्न फक्त प्रमोदच्या

हो म्हणण्याचा होता. छान इथे सगळ्या गोष्टींची घडी बसली असताना ,परत नवीन शहरात जायचे आणि स्वतः:ला परत settle करायचे. ह्याची काही प्रमोदने मनाची तयारी केली नव्हती.

बऱ्याचदा होत काय आपण स्वतःला स्वतःचं  मर्यादा घालून ठेवतो . जे नेहमीचं आहे ते ठीक आहे. चाललंय ना सगळं व्यवस्थित मग कशाला अजून काही वेगळं करा. आता   इथे  छान जम  बसलाय परत कुठे नव्याने सुरवात  करायची ??  खरतर नेहमीची वाट सोडणं कठीणंच असतं .नेहमीची ,माहितीची रुळलेली वाट एकदम सुरक्षित (safe) त्यालाच आपण comfort झोन म्हणतो. आपणं आपली चौकट आखतो आणि त्यातचं समाधानी असतो,त्या असतात आपल्या मर्यादा (Limits).त्याच्या पलीकडे नव्याने गोष्टी करण्याचा आपण बहुतेक विचार पण मनात आणतं नाही. जाऊद्या ना , कशाला जीवाला त्रास ??

जेव्हा आपण स्वतःला  जाणतो,स्वीकारतो ,आपल्या क्षमता ओळखतो तेव्हाच आपण comfort zone challenge भरारी मारू शकू ,बरोबर ना ??तेव्हा आपणं आपल्याला एक संधी देणं महत्वाचे आहे.नेहमीचं , साच्यातलं तर छानच आहे पण मग आपल्याला पुढे कसं जाता येणार ? नवीन कसं शिकता येणार ? आहे तिथेच राहायचे की वाढ , प्रगती ,उन्नती पण बघायची ? सगळं माहितीचं ,रोजचं म्हणजेच एका  सुरक्षित वातावरणांची आपण स्वतःला सवय लावून घेतो. ऑफीसची जागा ,तिथले माणसं सगळीकडे सवयीचे , ओळखीचे त्यातच आपण खूष . नवीन जागा ,नवीन माणसे  ह्यात काही comfortable  वाटतं नाही. आपल्याच कोशात राहायची सवय एक प्रकारे आपली मर्यादा होऊन जाते.

Comfort झोन सोडणे  सोपं नक्कीच नाही पण कठीण ही नाही. comfort zone challenge आपल्या प्रगतीसाठी नवीन जागा ,नवीन माणसे ,नवीन कामे,अतिरिक्त जबाबदाऱ्या , नवी आव्हाने हे सर्व खूप महत्वाचे आहेत. आपली स्वतःची आणि व्यावसायिक  वाढ ही आपल्या सुरक्षित वातावरणाची सवय करून घेतल्यामुळे खुंटू शकते. नाही म्हटलं तरी तो एक प्रकारचा आळसंच ,  नाही का ??त्यामुळेच त्यातून बाहेर पडणायचे काही आपण विशेष प्रयन्त करतं नाही. मुख्य म्हणजे स्वतःला भीती वाटतं असल्यामुळे हिंमत पण करतं नाही .

आपण कुठे अडकून पडतोय ,काय आपल्याला मागे खेचतंय ते बघा /ओळखा . त्यावर काम करा.नाही जमणार ते हो नक्की जमेल असा तो सुंदर प्रवास असणार आहे. जरा वेळ लागेल पण होईल.   नवीन सर्व असुरक्षित वाटेल कारण ते आपल्या सवयीचं नाही. पण मनात लक्षात ठेवा की कि हळूहळू जमण्यासारखं  आहे . अनोळखी वाटणारं सवयीने सुरक्षित ,ओळखीचं वाटेल. नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची माझी  तयारी आहे हे मनांत पक्के  झालं तर मग बिलकुल डरनेका नही, ,एकदम बिनधास्त !

 तेव्हा ,जाणा आपल्या मर्यादा ,ओळखा आपली comfort झोन आणि पडा बाहेर त्यातून . त्यासाठी , ले-ले पंगा हर limit से ! मग त्यानंतर तुम्हाला भरारी मारण्यापासून कोणी थांबवू  शकणार नाही  हे  मात्र नक्की !!

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

HR consultant, Soft skills Trainer and faculty of Entrepreneurship

9321314782 | [email protected]

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: